Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > छातीत सारखी जळजळ, ॲसिडिटीवर औषधे घेताय? Gut Health वर होतोय परिणाम, सोपा उपाय- तज्ज्ञ म्हणतात..

छातीत सारखी जळजळ, ॲसिडिटीवर औषधे घेताय? Gut Health वर होतोय परिणाम, सोपा उपाय- तज्ज्ञ म्हणतात..

Acidity problem solution: Chest pain due to acidity: Improve gut health naturally: ॲसिडिटीच्या समस्येवर आपल्यापैकी अनेकजण Antacid सारखी औषधे घेतात. अशावेळी काय करायला हवे? आपली गट हेल्थ कशी सुधाराल? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2025 13:07 IST2025-05-18T13:05:47+5:302025-05-18T13:07:22+5:30

Acidity problem solution: Chest pain due to acidity: Improve gut health naturally: ॲसिडिटीच्या समस्येवर आपल्यापैकी अनेकजण Antacid सारखी औषधे घेतात. अशावेळी काय करायला हवे? आपली गट हेल्थ कशी सुधाराल? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून

acidity problem, Chest pain, constipation issue taking medication for acidity Gut health is affected home remedies experts say | छातीत सारखी जळजळ, ॲसिडिटीवर औषधे घेताय? Gut Health वर होतोय परिणाम, सोपा उपाय- तज्ज्ञ म्हणतात..

छातीत सारखी जळजळ, ॲसिडिटीवर औषधे घेताय? Gut Health वर होतोय परिणाम, सोपा उपाय- तज्ज्ञ म्हणतात..

काहीही खाल्ल्यानंतर आपल्या छातीत सारखी जळजळ होते, अपचनाचा त्रास होत असेल तर आपण त्यावर वारंवार काही उपाय करत असतो. काही घरगुती उपाय करतो तर काही वेळेस औषधे घेतो.(Improve gut health naturally)  बाजारात पेट सफा, चूर्ण, याकूल यांसारखे अनेक पदार्थ आहेत जे पोट साफ करण्यास मदत करतात. परंतु, कितीही काही केले तरी अपचन,बद्धकोष्ठतेचा त्रास काही कमी होत नाही. (Side effects of acidity medicine)
अनेकदा जळजळ-बद्धकोष्ठतेच्या समस्यांवर आपल्याला दही खाण्याचा सल्ला दिला जातो. (Gut health and acidity) तर पाणी बसून प्या, जेवताना पाणी पिऊ नये, जेवल्यानंतर पाणी प्या किंवा दिवसभरात ८ ते ९ ग्लास पाणी प्या असे देखील म्हटले जाते. परंतु, हे सगळे उपाय करुन देखील आपली गट हेल्थ काही सुधारत नाही. (Home remedies for constipation and acidity) ज्यामुळे ॲसिडिटीची समस्या कायमच राहते. ॲसिडिटीच्या समस्येवर आपल्यापैकी अनेकजण Antacid सारखी औषधे घेतात.(Stomach acid imbalance)यामुळे आपल्याला काही प्रमाणात आराम मिळतो परंतु पुन्हा हा त्रास आहे तसाच. अशावेळी काय करायला हवे? आपली गट हेल्थ कशी सुधाराल? जाणून घेऊया तज्ज्ञांकडून (Probiotic foods for digestive health)

अनियमित मासिक पाळी- PCOS ने वैतागलात? हार्मोनल त्रास कमी करते 'हे' पाणी, बदला जीवनशैली

आहारातज्ज्ञ अमिता गद्रे यांनी आपल्या एका मुलाखतीत म्हटलं की, गट हेल्थ ही आपला दुसरा मेंदूच जर ती चांगली नसेल तर आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यामुळे आपल्याला सतत ॲसिडिटी, पोटदुखी, बद्धकोष्ठतेचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीची त्याच्या शरीरानुसार गट हेल्थ वेगळी असते. गट हेल्थ ही आपल्या संपूर्ण आरोग्य आणि स्टूल यावर अवलंबून असते. 

आहारात आपण असे अनेक पदार्थ खातो जे आपल्या पचनक्रियेवर परिणाम करतात. सतत मैद्याचे पदार्थ, जंकफूड खाल्ल्याने आपल्या आतड्यांना त्रास होतो. गट हेल्थचा सगळ्यात जास्त परिणाम आपल्या इम्युनिटी सिस्टिमवर होतो. गेट हेल्थ चांगली नसेल तर आपण सतत आजारी पडण्याची शक्यता असते. यामुळे चेहऱ्यावर सतत पिंपल्स येणे, केस गळणे, अस्वस्थ वाटणे यांसारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. जेलोसिन किंवा अँटाॲसिड सारख्या औषधांमुळे ॲसिडिटी ही काही वेळासाठी शांत होते. परंतु, यामुळे गट हेल्थ खराब होते. 

 

गट हेल्थ सुधारण्यासाठी आपल्याला प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक सारख्या घटकांवर अधिक लक्ष द्यायला हवे. शिजवलेल्या अन्नांमधून आपल्याला प्रोबायोटिक घटक जास्त प्रमाणात मिळत नाही. यासाठी आपण आहारात जास्ती जास्त कच्चे अन्न खायला हवे. दही, ताक, सलाद सारखे पदार्थ खाऊन आपण गट हेल्थ सुधारु शकतो. आहारात तूप खा. रात्री झोपण्यापूर्वी चमचाभर तूप पाण्यात मिक्स करुन प्या. तसेच आहारात फायबर असणारे पदार्थ खा, आपली जीवनशैली बदला, वेळेवर झोप घ्या आणि भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने आपली गट हेल्थ नक्की सुधारण्यास मदत होईल. 

 

Web Title: acidity problem, Chest pain, constipation issue taking medication for acidity Gut health is affected home remedies experts say

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.