Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सततच्या ॲसिडिटीने नको जीव केलाय? करपट ढेकर, जळजळही? ‘हे’ चमचाभर मिश्रण चघळा, पटकन वाटेल बरं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 20:05 IST

acidity home remedies : how to relieve acidity naturally : Ayurvedic remedy for acidity : benefits of fennel seeds and mishri : जेवणानंतर बडीशेप खडीसाखरेचे मिश्रण खाल्ल्याने पोट शांत राहतं - गॅस, ढेकर, जळजळ यासारखे त्रास कमी होतात.

सध्याच्या काळात बदलत्या आहारपद्धती आणि अनियमित खाण्याच्या सवयींमुळे ॲसिडिटीची समस्या अनेकदा आपल्याला सतावते. वरवर पाहता ॲसिडिटीची समस्या ही फार कॉमन असली तरी जेवणानंतर छातीत जळजळ, ढेकर येणे, तोंड कडू होणे, मळमळणे असे होऊ लागले तर जीव कासावीस होऊ लागतो.  ॲसिडिटीचा त्रास सुरु झाला की तो ज्या व्यक्तीला होतो तीच व्यक्ती (Ayurvedic remedy for acidity) तो त्रास अनुभवू शकते. ॲसिडिटी झाल्यानंतर काही सुचत नाही, कशातही लक्ष लागत नाही. शक्यतो जेवणांनंतर किंवा काही अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर सतत होणारी ही ॲसिडिटी म्हणजे अनेकांसाठी डोकेदुखीच ठरते(benefits of fennel seeds and mishri).

भारतीय स्वयंपाकघरात आणि पारंपरिक उपचारांमध्ये ॲसिडिटी कमी करण्यासाठी एक साधा, सोपा आणि अत्यंत असरदार असा नैसर्गिक उपाय सांगितला आहे. आयुर्वेदात पचन सुधारण्यासाठी आणि ॲसिडिटीवर नैसर्गिक उपाय म्हणून खडीसाखर आणि बडीशेप एकत्रित खाण्याचा सल्ला दिला जातो. जेवणानंतर थोडीशी बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने पोट शांत राहतं, आम्लपित्त नियंत्रणात राहतं आणि गॅस, ढेकर, जळजळ यासारखे त्रास कमी होतात.  खडीसाखर आणि बडीशेप एकत्र खाल्ल्याने ॲसिडिटीपासून कसा अराम मिळतो आणि याचे नेमके फायदे काय आहेत ते पाहूयात... 

ॲसिडिटी कमी करण्यासाठी बडीशेप आणि खडीसाखर कशी खावी ? 

बडीशेप हलकी भाजून घ्यावी आणि त्यात समान प्रमाणात खडीसाखर मिसळा. जेवणानंतर खडीसाखर आणि बडीशेपचे एकत्रित मिश्रण चमचाभर घेऊन  चघळून खाल्ल्यास किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्यास फक्त ॲसिडिटीच नाही तर अपचन आणि जडपणा यांसारख्या तक्रारी देखील दूर होतात. बडीशेपमध्ये शरीराला नैसर्गिक थंडावा देणारे गुणधर्म असतात जे पोटात वाढलेल्या ॲसिडला संतुलित करते. बडीशेपचे दाणे चघळल्याने तोंडात लाळेचा स्राव वाढतो, जो अन्न पचवण्यास मदत करतो. त्याचबरोबर, बडीशेपमध्ये असलेले एनेथोल नावाचा घटक गॅस, सूज आणि पोटदुखी कमी करते. खडीसाखरेचा गोडवा आणि थंडपणा पित्त दोषाला शांत करतो, जो ॲसिडिटीचे मुख्य कारण असते. 

तुम्ही फक्त स्वत:च्या ५ सवयी बदला, शुगर वाढण्याचे टेंशन विसरा-खाऊनपिऊन राहा आनंदी-डायबिटिस नियंत्रणात...

करिना कपूरसारखं फिट आणि सुंदर दिसण्याचं सिक्रेट, आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगतात स्वत:ला ३ सवयी लावा...

जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर एकत्रित खाणे हा भारतीय संस्कृतीतील फार जुना आणि अत्यंत फायदेशीर असा पारंपरिक घरगुती उपाय आहे. हे मिश्रण फक्त मुखशुद्धीसाठीच नाही, तर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि ॲसिडिटी तसेच पोटाच्या इतर समस्या दूर ठेवण्यासाठी वरदान ठरते.

ब्रेस्ट इम्प्लाण्ट काढून टाकण्याचा शर्लिन चोप्राचा निर्णंय, सुंदर दिसण्याच्या नादात झाला मोठा घोळ...

१. बडीशेपमध्ये नैसर्गिक तेल असल्यामुळे आणि खडीसाखरच्या गोडव्यामुळे, हे मिश्रण जेवणानंतर तोंडातील दुर्गंधी दूर करते आणि तोंडाला एक फ्रेशनेस  देते. २. खडीसाखर नैसर्गिकरित्या कार्बोहायड्रेट पुरवते, ज्यामुळे जेवणानंतर लगेच हलकीशी एनर्जी मिळते. ३. हे मिश्रण पचनमार्गाच्या स्नायूंना आराम देते, ज्यामुळे अन्न पचणे आणि पुढे जाणे सोपे होते. ४. हे मिश्रण खाल्ल्याने अन्न पोटात जास्त वेळ न थांबता पुढे सरकते, ज्यामुळे अपचन आणि पोट जड वाटणे या तक्रारी दूर होतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Beat Acidity: Chew this mix for quick relief from heartburn.

Web Summary : Acidity troubles? Fennel seeds and mishri offer a natural remedy. This Ayurvedic mix aids digestion, reduces heartburn, gas, and bloating. Chew after meals for quick relief.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सघरगुती उपायहोम रेमेडी