Join us

१ चमचा खोबरेल आणि चिमूटभर कापराचा खास उपाय-डोक्यापासून पायाच्या नखापर्यंतच्या अनेक आजारांवर असरदार इलाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2025 16:09 IST

A special remedy, mix coconut oil and camphor, an effective treatment for many diseases : खोबरेल तेल आणि कापूर एकत्र करुन तयार करा औषधी मिश्रण. पाहा किती फायद्याचे आहे.

अनेक शारीरिक मानसिक समस्यांनी आपण कायम भेडसावलेले असतो. या समस्या कमी करण्यासाठी आपण उपाय शोधत फिरतो मात्र अनेकदा त्याचे उपाय आपल्या स्वयंपाकघरातच मिळतात. (A special remedy, mix coconut oil and camphor, an effective treatment for many diseases)असे अनेक घरगुती उपाय आहेत जे वर्षानुवर्षे केले जात आहेत. त्याचे काही दुष्परिणाम नाहीत आणि करायलाही सोपे असतात. असाच एक उपाय म्हणजे खोबरेल तेल आणि कापूराचे मिश्रण वापरणे. विविध त्रासांवर हे फायद्याचे ठरते. शिवाय खोबरेल तेल आणि कापूर हे दोन्हीही घरोघरी सहज मिळणारे आणि उपयोगी घटक आहेत. खोबरेल तेल मुळातच थंड आणि पोषक असते. त्यामुळे डोक्याला तेल केसांच्या वाढीसाठी आणि शांत झोपेसाठी लावले जाते. तर कापूरात जंतुनाशक आणि थंडावा देणारे गुण असतात. कापूर जाळला जातो कारण त्यामुळे हवा शुद्ध होते. थंड वातावरणात तसेच ऑक्सिजन कमी असणाऱ्या ठिकाणी कापसाची पुरचुंडी घेऊन जाणे फायद्याचे ठरते. श्वसन मार्गासाठी तो फायद्याचा ठरतो. दोन्ही घटक फार औषधी असल्यामुळे हे मिश्रण डोकं ते पाय विविध समस्यांवर उपयोगी ठरते.

१. डोक्याला खोबरेल तेलात कापूर चुरुन लावल्याने तणाव कमी होतो, डोके शांत होते आणि झोप छान लागते. डोक्याला होणारा त्रास जसे की डोके दुखणे कमी करण्यासाठी हे तेल फायद्याचे. केसांच्या आरोग्यासाठीही हे मिश्रण फायदेशीर आहेच. कोंडा कमी करणे, खाज येऊ न देणे आणि केसांना नैसर्गिक चमक देणे या सगळ्या गोष्टी हे तेल करते. नियमित मालिश केल्यास केस गळती कमी होऊन मुळे मजबूत होतात.

२. त्वचेच्या समस्या जसे की कीटक चावल्यावर येणारी खाज, लहान पुरळ, लालसरपणा किंवा सूज, डाग आदी त्रास होत असतील तर अशा वेळी हे मिश्रण लावल्यास थंडावा मिळतो. त्वचेची आग कमी होते. काही जणांना पायांना सतत जडपणा किंवा सूज जाणवत असेल, तर पायांवर हलक्या हाताने हे तेल चोळल्यास आराम मिळतो. सर्दी-खोकला सतत होतो तर छातीवर किंवा पाठीवर हे मिश्रण चोळल्याने श्वास घ्यायला सोपे जाते. आरामही मिळतो.  

टॅग्स : होम रेमेडीहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकेसांची काळजी