जेवणानंतर चमचाभर बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते. काही जण त्याला व्यसनच समजतात तर काही म्हणतात रोज कशाला खायची? खरेतर रोज जेवणानंतर साधी बडीशेप खाणे आरोग्यासाठी फार चांगले ठरते. बडीशेप ही आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारी असली तरी ती अत्यंत उपयुक्त आहे. तिच्या सुगंधामुळे आणि गोडसर चवीमुळे ती विविध मसाल्यांमध्ये वापरली जाते. (A glass of fennel water fills the body with new energy, it is good for the stomach )पण तिचे औषधी गुणधर्मही तितकेच महत्त्वाचे आहेत. बडीशेपेत कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, झिंक, जीवनसत्त्व ए असते. एवढेच नाही तर जीवनसत्त्व सी आणि बी सारखी इतरही अनेक जीवनसत्वे असतात. याशिवाय त्यात फायबर, प्रथिने आणि आवश्यक अँटी ऑक्सिडंट्सही असतात, जे शरीराच्या मजबूतीसाठी उपयुक्त ठरतात. बडीशेप भाजून खा तसचे जेवणात वापरा, मात्र बडीशेपेचे पाणी पिणे हा एक साधा आणि परिणामकारक उपाय आहे जो नक्की करायला हवा. कारणे हे पाणी अनेक आरोग्य समस्यांवर नैसर्गिक औषधासारखे कार्य करते.
बडीशेपेचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. पचायला जरा जड असलेले अन्न खाल्ल्यानंतर पोटात होणारे गॅस किंवा अपचन कमी करण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते. शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी ते मदत करते आणि त्यामुळे त्वचेचा निखार वाढतो. यामध्ये असलेले अँटी ऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. बडीशेप थंड प्रवृत्तीची असल्यामुळे तिचे पाणी पोटाला आणि शरीराला गारवा देऊन उष्माघातापासून संरक्षण करते. महिलांसाठी हे विशेष फायदेशीर मानले जाते कारण मासिक पाळीतील वेदना कमी करण्यात आणि हार्मोन्स संतुलित ठेवण्यात त्याचा उपयोग होतो. तसेच लोह आणि इतर खनिजांमुळे रक्तवाढीस मदत होते.
नियमित बडीशेपेचे पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यात मदत होते. कारण ते भूक नियंत्रित ठेवते आणि मेटाबॉलिझम वाढवते. याशिवाय रक्तदाब संतुलित ठेवण्यात आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यातही त्याचा उपयोग होतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व ए उपयुक्त असून ते दृष्टीसाठी चांगले ठरते. इतक्या विविध पोषक गुणधर्मांमुळे बडीशेपेचे पाणी हे नैसर्गिक टॉनिक मानले जाते. रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात भिजवून ठेवायचे. काही तासांनी बडीशेपेचे पाणी प्यायचे. ज्यांना पित्ताचा त्रास होतो त्यांनी तर दिवसातून दोनदा असे पाणी प्यायले तरी चालेल.
Web Summary : Fennel seed water boosts digestion, detoxifies, and strengthens immunity. It cools the body, aids women's health, and supports weight loss by controlling appetite and boosting metabolism. Rich in nutrients, it's a natural tonic for overall well-being.
Web Summary : सौंफ का पानी पाचन क्रिया को बेहतर बनाता है, विषैले तत्वों को बाहर निकालता है और प्रतिरक्षा प्रणाली को मजबूत करता है। यह शरीर को ठंडा रखता है, महिलाओं के स्वास्थ्य में सहायक है, और भूख को नियंत्रित करके वजन घटाने में मदद करता है। पोषक तत्वों से भरपूर, यह संपूर्ण स्वास्थ्य के लिए एक प्राकृतिक टॉनिक है।