थंड दूध पिणे हा रोजच्या आहाराचा भाग असणे फायद्याचे ठरते, खास म्हणजे पित्ताचा त्रास असणाऱ्यांसाठी. उन्हाळ्यात तर थंड दूध शरीराला लगेच ताजेतवाने करते, पण योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने घेतले तर ते आरोग्यासाठीही उपयुक्त ठरते. (A glass of cold milk is the simple remedy for acidity, this home remedy is easy and effective )थंड दूध शरीराला थंडावा देणारे, पोषणमूल्यांनी भरलेले आणि काही विशिष्ट तक्रारींमध्ये आराम देणारे मानले जाते.
थंड दूध पिल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. विशेषतः उन्हामुळे अंगाची आग होणे, जळजळ होणे किंवा सतत तहान लागणे अशा स्थितीत थंड दूध शीतल परिणाम देते. त्यामुळे शरीर शांत होते आणि ताजेपणा जाणवतो. हिवाळ्यात दुपारच्या वेळी बोचट उन्हाचा त्रास होतो. इतर थंड पेय प्यायल्याने घसा खवखवतो. त्यामुळे थंड दूध पिणे फायद्याचे ठरते. पचनसंस्थेच्या दृष्टीने पाहिले तर, आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांना थंड दूध काही प्रमाणात दिलासा देऊ शकते, कारण ते पोटातील आग कमी करण्यास मदत करते.
थंड दूध कॅल्शियम, प्रथिने, व्हिटॅमिन बी १२ आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असते. यामुळे हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. लहान मुले, किशोरवयीन मुले तसेच वाढत्या वयातील व्यक्तींच्या हाडांचे आरोग्य जपण्यासाठी दूध उपयुक्त ठरते. थंड दूध प्यायल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळते आणि थकवा कमी झाल्यासारखा वाटतो, म्हणून काही लोक व्यायामानंतर किंवा दिवसभराच्या कामानंतर थंड दूध पिणे पसंत करतात.
थंड दूध पिण्याचा मेंदूवरही सौम्य परिणाम होतो. काही जणांना थंड दूध प्यायल्यावर शांतता जाणवते आणि चिडचिड कमी होते. त्यामुळे तणावाच्या काळात किंवा उष्णतेमुळे अस्वस्थ वाटत असताना थंड दूध उपयोगी ठरू शकते. तसेच काही लोकांना रात्री झोप न लागण्याचा त्रास असेल तर थोड्या प्रमाणात दूध घेतल्याने झोपेस मदत होते, मात्र ते खूप थंड नसावे. साधेच असावे.
थंड दूध कधी प्यावे हेही महत्त्वाचे आहे. सकाळी उपाशीपोटी फार थंड दूध पिणे सर्वांना मानवतेच असे नाही. ज्यांची पचनशक्ती जरा कमकुवत आहे, कफाचा त्रास आहे किंवा सर्दी-खोकला होण्याची प्रवृत्ती आहे, त्यांनी सकाळी किंवा रात्री खूप थंड दूध टाळलेले बरे. दुपारी किंवा संध्याकाळी, शरीर गरम झाल्यानंतर थंड दूध पिणे अधिक योग्य मानले जाते. उन्हाळ्यात बाहेरून आल्यानंतर लगेच थंड दूध न पिता थोडा वेळ थांबून मग घेतले तर ते शरीराला अधिक मानवते.
Web Summary : Cold milk cools the body, aids digestion, and provides essential nutrients. It reduces heat, acidity, and stress, promoting bone health and better sleep. Best consumed in the afternoon or evening.
Web Summary : ठंडा दूध शरीर को ठंडक पहुंचाता है, पाचन में मदद करता है और आवश्यक पोषक तत्व प्रदान करता है। यह गर्मी, एसिडिटी और तनाव को कम करता है, हड्डियों के स्वास्थ्य और बेहतर नींद को बढ़ावा देता है। दोपहर या शाम को सेवन करें।