Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय

शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय

7 Symptoms of Vata Dosha: शरीरातला वात खूप वाढला असेल तर पुढील लक्षणं शरीरात दिसू लागतात. ती वेळीच ओळखायला हवीत...(how to control vata dosha?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2026 17:01 IST2026-03-24T17:01:07+5:302026-03-24T17:01:45+5:30

7 Symptoms of Vata Dosha: शरीरातला वात खूप वाढला असेल तर पुढील लक्षणं शरीरात दिसू लागतात. ती वेळीच ओळखायला हवीत...(how to control vata dosha?)

7 symptoms of increase in vata dosha, how to control vata dosha, home remedies to reduce vata dosha in body | शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय

शरीरात वात वाढण्याची ७ लक्षणं वेळीच ओळखा, दुर्लक्ष करणं पडेल महागात, त्रास वाढण्याआधीच करा 'हे' उपाय

Highlightsपुढीलपैकी काही लक्षणं तुम्हाला सतत जाणवत असतील तर तुमच्या शरीरातला वात वाढला आहे हे लक्षात घ्या.

वात, पित्त आणि कफ अशा तीन प्रकृती असतात. यापैकी एक कोणतीही आपली प्रकृती असू शकते. प्रत्येक प्रकृतीच्या लोकांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. त्यांना होणारे आजारही वेगवेगळे असतात. प्रकृतीनुसार कोणते अन्नपदार्थ कोणाला जास्त पाचक असतील हे देखील ओळखता येतं. पित्त असो, वात असो किंवा कफ असो... यापैकी काहीही गरजेपेक्षा जास्त होणं शरीरासाठी त्रासदायकच असतं. आता यापैकी वात प्रकृतीविषयी आपण पाहूया.. वात प्रकृती असणाऱ्या काही जणांना शरीरातला वात वाढण्याचा त्रास होतो. पण त्यांचं अनेकदा त्याकडे दुर्लक्ष होतं. कारण त्याची लक्षणंच माहिती नसतात (how to control vata dosha?). म्हणूनच ही काही लक्षणं बघा आणि आपल्या शरीरातही वात वाढलेला नाही ना हे वेळीच ओळखा..(7 symptoms of increase in vata dosha)

 

शरीरातला वात वाढण्याची प्रमुख लक्षणं

पुढीलपैकी काही लक्षणं तुम्हाला सतत जाणवत असतील तर तुमच्या शरीरातला वात वाढला आहे हे लक्षात घ्या.

१. शरीरातला वात वाढला की त्वचेतला ओलावा कमी होतो. त्यामुळे ओठ आणि त्वचा सतत कोरडी पडते.

एवढीशी खारीक शरीराला देते ४ मोठे फायदे! घरातल्या सगळ्यांसह आईने तर खायलाच हवी कारण..

ओठ फाटतात. त्यांच्यावर भेगा येतात. तसेच त्वचाही कोरडी दिसू लागते.

२. केस तुटतात. केसही अगदी कोरडे झाडूसारखे दिसू लागतात.

३. सांध्यांचं दुखणंही वाढतं. त्यामुळे मग उठताबसता गुडघे, पाय, घोटा दुखतो. पाठ, कंबर, मानदेखील सतत दुखते. 

 

४. या लोकांना इतरांपेक्षा जास्त थंडी वाजते. आणि त्यांना सतत उब हवीहवीशी वाटते.

५. पचनक्रिया बिघडते. पोट फुगल्यासारखं वाटतं. बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. भूक मंदावते. 

ऐन हंगामातही मोगऱ्याला फुलंच नाहीत? लगेच करा 'हा' उपाय- ८ दिवसांत फुलांनी डवरून जाईल

६. लवकर झोप लागत नाही. मनात सतत विचार असतात. चिडचिड होते, उगाच भीती वाटते.

७. लवकर दम लागतो. जास्त बोलल्यावर खोकला येतो किंवा थकल्यासारखं होतं. स्नायुंची उर्जा कमी होते. सतत थकवा येतो. 

 

शरीरातला वात कमी करण्यासाठी उपाय

१. रामदेव बाबा नेहमी सांगतात की अनुलोम विलोम हे प्राणायाम नियमितपणे केल्यास शरीरातला वात कमी होतो.

२. याशिवाय रोज ताजं, गरम अन्न खा. शिळे अन्न वारंवार खाणे टाळा.

डोकं खूप ठणकतंय? फ्रिजमधला बर्फाचा तुकडा घ्या आणि चटकन करा 'हा' उपाय- डोकेदुखी पळून जाईल

३. गोड, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ खाणं टाळायला हवं. तसेच नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण या वेळा पाळा.

४. रोज थोडा वेळ काढून व्यायाम करायला हवा. 

५. मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल लावून आठवड्यातून एकदा संपुर्ण अंगाला मालिश करणे. यामुळेही वात दोष बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 


Web Title : शरीर में वात बढ़ने के 7 लक्षणों को समय रहते पहचानें।

Web Summary : वात बढ़ने से त्वचा में सूखापन, बालों का झड़ना, जोड़ों का दर्द और पाचन संबंधी समस्याएं हो सकती हैं। अनुलोम विलोम प्राणायाम, गर्म भोजन, नियमित व्यायाम और तेल मालिश जैसे समय पर उपाय वात दोष को प्रबंधित करने और परेशानी को कम करने में मदद कर सकते हैं।

Web Title : Recognize 7 symptoms of increased Vata in the body early.

Web Summary : Increased Vata can cause dry skin, hair fall, joint pain, and digestive issues. Timely remedies like Anulom Vilom pranayama, warm food, regular exercise, and oil massages can help manage Vata dosha and alleviate discomfort.