कॅन्सरसारखा घातक आजार टाळणं कोणच्याही हातात नसलं तरी योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे हा धोका नक्कीच टाळता येऊ शकतो. कॅन्सरचा आजार टाळण्यासाठी आपण काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुम्ही कसं खाता काय खाता यावर तुमचा मोठ्या आजारांपासून बचाव होणार की नाही ते अवलंबून असते. (Foods That Prevent From Cancer)
अमेरिकन इंस्टिटयूट फॉर कॅन्सरच्या रिसर्चच्या रिपोर्टनुसार जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुका कॅन्सरचा धोका पसरण्याचं मोठं कारण आहे. रोजच्या आहारातले कोणते असे पदार्थ आहेत जे नियमित खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका टाळता येतो ते समजून घेऊ. (7 Super Foods That Reduce Risk Of Cancer)
बेरीज- स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी आणि रास्पबेरी यांत एंटी ऑक्सिडेंट्स असतात. जे पचनक्रिया मजबूत करून कॅन्सरसारख्या आजारांशी लढण्यास मदत करतात.
भाज्या- ब्रोकोली, फुलकोबी, पत्ता कोबी यांसारख्या भाज्यांमध्ये इंडोल-३ कार्बिनोल असते ते कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यास मदत करते.
नट्स- अक्रोड, बदाम यांसारखे इतर सुक्या मेव्याचे पदार्थ फायबर्सचा चांगला स्त्रोत आहेत. स्नॅक्सच्या स्वरूपात तुम्ही याचे सेवन करू शकता.
भाज्या आणि शेंगा- हे सर्वात प्रभावी आणि परवडणारे असे सुपरफूड आहे. शेंगांमध्ये फ्लेवोनोईड्स असतात जे कॅन्सरशी लढण्यासाठी सुरक्षा प्रदान करतात.
धान्य- ओट्स आणि ब्राऊन राईसचे सेवन केल्यानं कोलोरेक्ट कॅन्सरचा धोका कमी होतो. रोज १० ग्रॅम फायबर खाल्ल्यानं कॅन्सरचा धोका ७ टक्क्यांनी कमी होतो.
हिरव्या भाज्या- पालक, केल यांसारख्या भाज्यांमध्ये कॅराटीनॉईड असते ते स्तन मुत्राशय आणि फुफ्फुसांच्या कॅन्सरशी लढण्यास मदत करते.
लसूण - लसणात एलिसिन नावाचे कम्पाऊंड्स असतात. ज्यामुळे कॅन्सरपासून बचव होण्यास मदत होते. म्हणून लसणाचा आहारात समावेश करा.
कॅन्सरचा धोका टाळण्यासाठी काही आरोग्यदायी सवयी
आहारात धान्य आणि कडधान्य खा यामुळे आतड्यांचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो. यात कॅटेचिन्स असतात जे पेशींचे रक्षण करतात. दिवसातून १ ते २ कप ग्रीन टी घेणं फायदेशीर ठरतं. लठ्ठपणामुळे शरीरात हॉर्मोन्सचे असंतुन ज्यामुळे अनेक प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. जर तुम्हाला कोणताही जुनाट आजार असेल किंवा औषधं सुरू असतील. तर आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
Web Summary : Certain foods can help reduce cancer risk. Berries, cruciferous vegetables, nuts, legumes, whole grains, green leafy vegetables, and garlic are beneficial. Maintaining a healthy lifestyle and diet is crucial for prevention.
Web Summary : कुछ खाद्य पदार्थ कैंसर के खतरे को कम करने में मदद कर सकते हैं। जामुन, क्रूस वाली सब्जियां, नट्स, फलियां, साबुत अनाज, हरी पत्तेदार सब्जियां और लहसुन फायदेमंद हैं। स्वस्थ जीवनशैली और आहार बनाए रखना महत्वपूर्ण है।