Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चाळिशीनंतरही राहायचे असेल फिट आणि तरुण, आहारात असायलाच हवेत ७ पदार्थ - मेनोपॉज, वाढत्या वजनाचा त्रास टाळा...

चाळिशीनंतरही राहायचे असेल फिट आणि तरुण, आहारात असायलाच हवेत ७ पदार्थ - मेनोपॉज, वाढत्या वजनाचा त्रास टाळा...

7 healthy foods every woman should eat in their 40s : healthy foods for women in their 40s : foods to stay fit and healthy after 40 for women : महिलांनी वयाच्या ४५ ते ५० दरम्यान 'मेनोपॉज' सारख्या संवेदनशील काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणते पदार्थ नियमितपणे खावेत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2025 14:17 IST2025-12-26T14:01:50+5:302025-12-26T14:17:37+5:30

7 healthy foods every woman should eat in their 40s : healthy foods for women in their 40s : foods to stay fit and healthy after 40 for women : महिलांनी वयाच्या ४५ ते ५० दरम्यान 'मेनोपॉज' सारख्या संवेदनशील काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणते पदार्थ नियमितपणे खावेत...

7 healthy foods every woman should eat in their 40s healthy foods for women in their 40s foods to stay fit and healthy after 40 for women | चाळिशीनंतरही राहायचे असेल फिट आणि तरुण, आहारात असायलाच हवेत ७ पदार्थ - मेनोपॉज, वाढत्या वजनाचा त्रास टाळा...

चाळिशीनंतरही राहायचे असेल फिट आणि तरुण, आहारात असायलाच हवेत ७ पदार्थ - मेनोपॉज, वाढत्या वजनाचा त्रास टाळा...

वयाची चाळिशी ओलांडली की, शरीराच्या गरजा बदलू लागतात. हे वय, स्वतःच्या आरोग्याकडे अधिक सजगतेने पाहण्याचे आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली प्रकृती उत्तम राहण्यासाठी आहारात योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक असते. विशेषतः महिलांच्या बाबतीत बोलायचे झाले तर, मासिक पाळी, गर्भधारणा, पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज यांसारख्या विविध टप्प्यांतून जात असताना शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. या बदलांचा थेट परिणाम महिलांच्याआरोग्यावर होतो. म्हणूनच, शरीरातील या अंतर्गत बदलांनुसार आपल्या रोजच्या डाएटमध्ये बदल करणे गरजेचे असते(7 healthy foods every woman should eat in their 40s).

हार्मोन्समध्ये होणारे बदल, मेटाबॉलिझम मंदावणे, हाडांची ताकद कमी होणे, वजन सहज वाढणे तसेच त्वचा-केसांवर परिणाम दिसू लागतात. या टप्प्यावर केवळ कमी खाणे नव्हे, तर योग्य आणि पोषक आहार घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. चाळीशीनंतर शरीराला कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि चांगल्या फॅट्सची गरज वाढते, जे संपूर्ण आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. साधारणपणे वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिला 'पेरिमेनोपॉज' (मेनोपॉजच्या आधीचा काळ) च्या दिशेने वळू लागतात आणि वयाच्या ४५ ते ५० दरम्यान 'मेनोपॉज' (रजोनिवृत्ती) सुरू होते. या संवेदनशील काळात स्वतःला फिट ठेवण्यासाठी कोणत्या खास गोष्टींचा (foods to stay fit and healthy after 40 for wome) आहारात समावेश करावा? याबद्दल आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट राधिका गोयल सविस्तर माहिती देत आहेत. 

वयाची चाळिशी ओलांडल्यानंतर महिलांनी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा... 

आहारतज्ज्ञांच्या मते, वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर शरीरातील पोषणमूल्यांची गरज वाढते. अशा वेळी खालील पदार्थांचा आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर ठरते. 

१. अळशीच्या बिया (Flax Seeds) ओमेगा-३ फॅटी ॲसिड्सचा उत्तम स्रोत आहेत. अळशीच्या बियांचा आहारात समावेश केल्याने पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. या बिया हार्मोन्स संतुलित राखण्यासाठी आणि मेनोपॉजच्या लक्षणांना कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. त्वचा सतेज ठेवण्यासाठी आणि केसांच्या आरोग्यासाठी अळशी गुणकारी ठरते. 

२. तिळामध्ये (Sesame Seeds) कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गुड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हे हाडांची घनता टिकवून ठेवतात आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राखतात. चाळिशीनंतर नियमितपणे तिळाचा आहारात सामावेश केल्यास वाढत्या वयाची लक्षणे लवकर दिसत नाहीत.

मल्लिका शेरावतसारखी स्लिम - ट्रिम फिगर हवी! फ्लॅट टमीसाठी करा तिची फेवरिट २ योगासनं - नव्या वर्षात दिसाल फिट... 

३. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी नाचणी अत्यंत फायदेशीर मानली जाते. हे स्नायूंच्या आरोग्याला सुधारते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

४. शेवग्याचा पाला किंवा मोरिंगा पावडरमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे शरीर नैसर्गिकरित्या डिटॉक्स करते. शरीरातील सूज किंवा अंतर्गत जळजळ कमी करण्यास मदत करते. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चकाकी येते.

शुगर वाढण्याची भीती विसरा! रोज फक्त १ कप 'ब्लॅक कॉफी', मधुमेहावर रामबाण उपाय -  रहाल कायम फिट... 

५. टोफू हा प्लांट बेस्ड प्रथिनांचा (Plant-based Protein) एक उत्तम स्रोत आहे. टोफू खाल्ल्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.जर तुम्हाला वाढत्या वयासोबत वजन नियंत्रित ठेवायचे असेल, तर टोफू हा एक उत्तम पर्याय आहे, कारण यामुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते.

६. मेथीचे दाणे महिलांच्या आरोग्यासाठी औषधासारखे काम करतात. चाळिशीनंतर बिघडलेले हार्मोन्स संतुलित करण्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत गुणकारी आहेत. यामुळे पचनशक्ती सुधारते आणि शरीर नैसर्गिकरीत्या 'डिटॉक्स' होते, परिणामी वजन कमी होण्यास मदत होते.

७. हळदीचे पाणी वयाची ४० वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिलांनी नियमितपणे हळदीचे पाणी पिणे फायदेशीर ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे शरीरातील अंतर्गत सूज आणि सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. सकाळी कोमट पाण्यात हळद घालून प्यायल्याने पचनक्रिया अधिक सक्रिय आणि सुलभ होते.


Web Title : 40 के बाद फिट रहने और मेनोपॉज से बचने के लिए खाएं ये 7 चीजें।

Web Summary : 40 के बाद महिलाओं को कैल्शियम, प्रोटीन और एंटीऑक्सीडेंट की जरूरत होती है। अलसी के बीज, तिल, रागी, मोरिंगा, टोफू, मेथी और हल्दी का पानी हार्मोनल संतुलन, हड्डियों के स्वास्थ्य और वजन प्रबंधन के लिए फायदेमंद है।

Web Title : Eat these 7 foods after 40 to stay fit, avoid menopause.

Web Summary : After 40, women need calcium, protein, and antioxidants. Flax seeds, sesame, ragi, moringa, tofu, fenugreek, and turmeric water are beneficial for hormonal balance, bone health, and weight management.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.