सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला आरोग्याची काळजी घेता येत नाही.(Heart attack issue) लठ्ठपणा, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका या आजारांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. (Health tips) हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला काही प्रमाणात संकेत देते. ज्याकडे आपण वारंवार दुर्लक्ष करतो. (Heart attack warning signs on face)
हल्ली हृदयविकाराचा झटका हा कोणत्याही वयात येऊ शकतो. (Early signs of heart attack)जेव्हा आपले हृदय कमकुवत किंवा आजारी असेल तेव्हा त्याचे लक्षण फक्त छातीत दुखण्यापर्यंत मर्यादित नसते. (Facial symptoms of heart issues) आपल्या चेहऱ्यावरील लक्षणांवरुन देखील हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीच ओळखू शकतो. तोंडाच्या असे काही बदल होत असतात ज्याकडे आपण दुर्लक्ष करतो ज्यामुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल.(Heart disease awareness) अनेकदा आपण तोंडाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणं किंवा दात दुखणे यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या समस्या या कधीकधी हृदयरोगाशी संबंधित असू शकतात. जाणून घेऊया हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीर आपल्याला कसे संकेत देतात. (Doctor tips on heart health)
ग्लोइंग त्वचेचं खास सिक्रेट! हळदीत 'ही' पांढरी गोष्ट मिसळून लावा-चेहरा चमकेल सोन्यासारखा..
1. हिरड्यांमधून रक्त येणे
जर आपल्या हिरड्या लाल होत असतील किंवा वारंवार त्यातून रक्तस्त्राव होत असेल तर आपण काळजी घेणे आवश्यक आहे. हे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचे एक लक्षण असू शकते. यातील जीवाणू रक्तप्रवाहात प्रवेश करुन हृदयाच्या नसांना नुकसान पोहोचवतात.
2. दात दुखणे
अचानक दात दुखू लागला किंवा दात हलू लागले की याकडे आपण दुर्लक्ष करतो. औषधे किंवा काही घरगुती उपाय करुन दातांचे दुखणे थांबवतो. परंतु जर हा त्रास वारंवार होत असेल तर शरीरातील जळजळ वाढते. ज्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते.
3. तोंडातून दुर्गंधी येणे
अनेकदा ब्रश करुनही आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. असं वारंवार होत असेल तर शरीर आपल्याला काही संकेत देतात. हे शरीरातील आतील आजारांचे लक्षण असते. हे आपल्याला हृदयासाठी धोकादायक आहे.
4. तोंडाला छाले पडणे
आपल्यापैकी अनेकांना वारंवार तोंड येत असते. अनेकदा हा अल्सर लवकर बरा होत नाही. आतून तोंड पूर्ण लालसर होणे, तोंडात पांढरे डाग येऊन जळजळ वाढते. अशक्तपणा किंवा रक्ताभिसरण खराब होते. काही खाताना तोंडातील आतील भागात वेदना होतात. हे हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वीचे लक्षण असू शकते.
5. वारंवार तोंड कोरडे पडणे
जर आपले तोंड वारंवार कोरडे पडत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असू शकते. आपल्या शरीरातील रक्तप्रवाह पुरेशा प्रमाणात होत नसेल तर हृदयविकाराचा धोका अधिक वाढतो. सतत तोंड कोरडे पडल्यामुळे शरीराला रक्तपुरवठा होत नाही. अनेकदा काही औषधे खाल्ल्यामुळे देखील हा त्रास आपल्याला होतो.
6. जबड्यात वेदना
जर खालच्या जबड्यात अचानक वेदना होऊ लागल्या किंवा या वेदना मानेपासून छातीपर्यंत होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नका. महिलांमध्ये या प्रकारच्या वेदना या हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण मानले जाते.