'जिरे' हा भारतीय स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाचा मसाला आहे. जेवणाला चविष्ट करण्यासोबतच, जिरे वजन कमी करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी एक उत्तम घरगुती उपाय मानले जाते. जिऱ्यामध्ये लोह, अँटीऑक्सिडंट्स आणि अनेक औषधी गुणधर्म असल्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. जिरे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी देखील ते प्रत्येकीसाठीच उपयोगी असेलच असे नाही. विशेषतः महिलांना काही ठराविक आरोग्य समस्या असतील तर जिरे खाणे फायाद्यापेक्षा धोकादायकच ठरू शकते. काही आरोग्य स्थितींमध्ये जिरे खाल्ल्यास आजारपण वाढू शकते किंवा त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो(6 types of women who should not eat cumin seeds jeera).
काही महिलांसाठी जिरं खाणं मर्यादित ठेवणे किंवा पूर्णपणे बंद करणे चांगले असते, कारण याचा त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होतो. काहीवेळा हा परिणाम हळूहळू दिसून येतो, म्हणून याला 'स्लो पॉयजन' असेही म्हणतात. शक्यतो आपण नेहमीच्या वेगवेगळ्या पदार्थांमध्ये जिरं हमखास घालून खातो, परंतु कोणत्या अशा ६ समस्या आहेत, ज्यामुळे महिलांना जिरे खाणे धोक्याचे ठरू शकते ते पाहूयात.
महिलांनी 'या' ६ शारीरिक समस्या असतील तर चुकूनही जिरं खाऊ नये...
१. ॲसिडिटी आणि छातीत जळजळ :- जिरे कधीकधी पचनाच्या स्नायूंना अधिक जास्त प्रमाणात रिलॅक्स करते. यामुळे पोटातील ॲसिड पुन्हा अन्ननलिकेत येते, ज्यामुळे छातीत तीव्र जळजळ आणि ॲसिडिटीची समस्या वाढते.
२. लो ब्लड शुगर :- जिरं शुगर लेव्हल कमी करू शकते, त्यामुळे मधुमेह असलेल्या महिलांसाठी हे फायद्याचे ठरते. पण ज्या महिलांची शुगर लेव्हल आधीच कमी असते, त्यांनी जास्त प्रमाणांत जिरे खाल्ल्याने अशक्तपणा, चक्कर किंवा शरीर थरथरणे यासारख्या समस्या येऊ शकतात.
जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...
३. लिव्हर संबंधी समस्या :- दीर्घकाळ आणि जास्त प्रमाणात जिरे खाल्ल्याने लिव्हरवर अनावश्यक दबाव पडू शकतो आणि टॉक्सिसिटी होऊ शकते. अशा परिस्थितीत, लिव्हरच्या कोणत्याही जुन्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलांनी चुकूनही जिरे खाऊ नये.
४. वारंवार मळमळ किंवा चक्कर येणे :- जास्त जिरे खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. हे पचन संस्थेच्या संतुलनाला बिघडवू शकते, ज्यामुळे वारंवार मळमळणे आणि हलके डोकेदुखी किंवा चक्कर येऊ शकते.
५. श्वासोच्छ्वासासंबंधी समस्या :- जिऱ्याचे तेल किंवा जिरे काही महिलांमध्ये श्वासोच्छ्वासासंबंधी समस्यांचे प्रमाण वाढवू शकतात. यामुळे त्यांना खोकला, श्वास घेण्यास त्रास किंवा अस्थमासारखी लक्षणे जाणवू शकतात.
६. ॲलर्जिक रिॲक्शन :- काही महिलांना जिऱ्याची ॲलर्जी असू शकते. जिरे खाल्ल्याने त्यांच्या त्वचेवर लाल चट्टे, खाज किंवा सूज यांसारखे ॲलर्जिक रिॲक्शन होऊ शकतात.
