कान हा आपल्या ज्ञानेंद्रियातील सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे. आपल्यापैकी अनेकांना हेडफोन किंवा इअरफोन वापरण्याची सवय असते. (Natural Earwax Removal Methods) ज्यामुळे कानातील मेण बाहेर पडण्यापासून रोखले जाते आणि ते कानात जमा होते. बाहेरील प्रदूषणाचा आपल्या अवयवांवर परिणाम होतो. (Home Remedies for Earwax Build-up) केस धुताना अनेकदा कानात पाणी जाते, ज्यामुळे आपल्याला ऐकू येत नाही. पण यामुळे केसातील घाण आपल्या कानात साचण्याची शक्यता अधिक असते. कानात मळ साचणे ही एक कॉमन समस्या आहे. कानात मळ साचल्यानंतर आपण अनेक उपाय करुन मळ काढतो. (Best Home Remedies for Ear Health)
कधी कधी कानातील मळ काढला नाही तर कानात इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. (Earwax Removal Tips) कान दुखणे किंवा ऐकू येण्याच्या समस्या देखील वाढतात. कानातील घाण बाहेर काढताना आपल्या कानाला काही इजा तर होणार नाही ना असं अनेकांना वाटतं.(How to Safely Remove Earwax at Home) अनेकदा कान साफ करताना आपण इअरबड्स किंवा पिनचा वापर करतो. जे आपल्या कानासाठी हानिकारक आहे. पण काही सोपे घरगुती उपाय केले तर कानातील घाण सहज साफ होऊ शकते.
शिळे अन्न आरोग्यासाठी घातक! चुकूनही खाऊ नका ४ पदार्थ, पोटदुखी- ॲसिडिटीचा त्रास वाढेल
कान स्वच्छ करण्यासाठी उपाय
1. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइल
कानात जमा झालेली घाण काढण्यासाठी नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब कोमट करुन घाला. १० ते १५ मिनिटे ठेवा. यानंतर कान कोमट पाण्याने धुवा. यामुळे कानात जमा झालेली घाण मऊ होऊन काढून टाकण्यास मदत होईल.
2. हायड्रोजन पेरोक्साइड
कानात मळ साचला असेल तर हायड्रोजन पेरोक्साइडचे १ ते २ थेंब टाका. यामुळे कानातील घाण आपोआप वर येईल. ज्यामुळे कान साफ करण्यास मदत होईल. याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की विचारा.
3. कोमट पाणी आणि मीठ
कानाच्या वेदना असाहय्य होत असतील तर एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा मीठ मिसळा. यात कापूस भिजवून त्याचे २ ते ३ थेंब कानात घाला. ज्यामुळे कानातील घाण बाहेर येईल.
4. मोहरीचे तेल
कानात २ ते ३ थेंब कोमट मोहरीच्या तेल घाला. यामुळे कानात जमा झालेली घाण मऊ होण्यास मदत होईल. तसेच ती हळूहळू बाहेर पडेल. ज्यामुळे कानाचे दुखणे कमी होईल.
5. लसूण आणि मोहरीचे तेल
मोहरीच्या तेलात २ ते ३ लसूण पाकळ्या गरम करा. तेल कोमट झाल्यावर त्याचे २ थेंब कानात टाका. यामुळे कानातील संसर्ग दूर करण्यास मदत होईल. कान दुखण्याचा त्रास कमी होईल.
6. कान स्वच्छ करताना या गोष्टी लक्षात ठेवा.
- कान स्वच्छ करताना कधीही तीक्ष्ण वस्तूंचा वापर करु नका. यामुळे कानाच्या पडद्याला नुकसान होऊ शकते.
- कान जास्त प्रमाणात स्वच्छ केल्याने कानातील नैसर्गिक संरक्षण यंत्रणा नष्ट होऊ शकते.
- कानात पाणी गेले तर संसर्ग टाळण्यासाठी ते लगेच साफ करा.
- कान दुखणे, खाज येणे किंवा ऐकू येण्यास अडचण येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.