Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

6 Reasons to Swap Morning Tea with Desi Ghee : सकाळी रिकाम्या पोटी चहामध्ये एक गोष्ट घालून प्या; आरोग्याला मिळतील असंख्य फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2024 04:37 PM2024-07-08T16:37:52+5:302024-07-08T18:48:23+5:30

6 Reasons to Swap Morning Tea with Desi Ghee : सकाळी रिकाम्या पोटी चहामध्ये एक गोष्ट घालून प्या; आरोग्याला मिळतील असंख्य फायदे

6 Reasons to Swap Morning Tea with Desi Ghee | पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

पावसाळ्यात चहा हवाच, पण ॲसिडिटी-गॅसेसचा त्रास छळतो? चहात मिसळा १ सोनेरी गोष्ट, पाहा फरक

अनेक सेलिब्रिटी आणि फिटनेस फ्रिक प्रेमींना त्यांच्या सकाळच्या कॉफीमध्ये तूप किंवा बटर मिसळून प्यायला आवडते (Health Tips). काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर कॉफीमध्ये तूप घालून पिण्याचा ट्रेण्ड आला होता (Ghee in Tea). कॉफीनंतर सोशल मीडियावर लोकांमध्ये चहामध्ये तूप मिसळून पिण्याची क्रेझ वाढत आहे. प्रत्येकाला सकाळी एक कप चहा प्यावासा वाटतो. पण चहा दुध आणि साखरेचा पिण्याऐवजी तूप घालून प्या. तुपाचा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुपाचा चहा पिण्याचे फायदे किती?

इंडिअन एक्स्प्रेस. कॉम या वेबसाईटनुसार, तुपात भरपूर अँटीऑक्सिडंट्स तसेच हेल्दी फॅट्स असतात, जे शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. तुपामध्ये असे काही गुणधर्म आहेत जे पोषक द्रव्ये शोषण्यास प्रभावी आहेत. याशिवाय पोटाचे पीएच संतुलनही राखते(6 Reasons to Swap Morning Tea with Desi Ghee).

- सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास अनेक वेळा ॲसिडिटीची समस्या उद्भवते. अशावेळी चहामध्ये थोडं तूप घातलं तर ते दुधात असलेले ऍसिडिटी गुणधर्म कमी करते. यामुळे जळजळ आणि अपचनाची समस्या दूर होते.

ना केमिकल - ना कोणतं प्रॉडक्ट, कांदा - लसणाचा सोपा उपाय; पाली धूम ठोकतील

- तूप पोटाचे आरोग्य सुधारते. तुपाच्या चहामध्ये हळद घातल्याने चहा अधिक आरोग्यदायी बनते. तुपाचा चहा शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवू शकते.

- ज्यांना अपचनाचा त्रास आणि गॅसेसचा प्रॉब्लेम आहे. त्यांनी कोमट पाण्यात तूप घालून प्यावे. याचा आरोग्याला अधिक फायदा होईल. जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर दुधात तूप घालून प्या.

- दुधात तूप मिसळून प्यायल्याने युरिक ॲसिडची पातळीही कमी होते. हे शरीरातील फॅट्स घटवण्यास मदत करते. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, तुपाचा चहा जरूर प्या.

आजपासून रोज करा फक्त ३ गोष्टी, महिनाभरात थुलथुलीत पोट आणि कंबरेची साइज होईल कमी

- ज्यांचे वजन आधीच जास्त आहे. त्यांनी तुपाचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे. ज्यांना वजन कमी करायचं आहे. त्यांनी हर्बल टीमध्ये तूप घालून प्यावे.

Web Title: 6 Reasons to Swap Morning Tea with Desi Ghee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.