Join us   

आपण 'हेल्दी' समजून खातो असे ६ जंकफूड, आहारतज्ज्ञ सांगतात पिझ्झा- बर्गरसोबतच 'हे' पदार्थही टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2024 9:19 AM

Junk Food And Its Consumption: पौष्टिक समजून आपण असे बरेच पदार्थ खातो आणि मुलांनाही खाऊ घालतो. पण ते पदार्थ म्हणजे एकप्रकारचं जंकफूडच आहेत, असं आहारतज्ज्ञ सांगतात. (Camouflaged junk food which pretends to be healthy but isn’t.)

ठळक मुद्दे स्वत:चं आणि कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी असे hidden junkfood ओळखा आणि ते खाणंही बंद करा, असं ऋजूता दिवेकर सांगतात. 

पिझ्झा, बर्गर, नूडल्स, कोल्ड्रिंक हे पदार्थ जंकफूड आहेत आणि ते आपण खाणं टाळलं पाहिजे. किंवा मुलांनाही ते कमीतकमी प्रमाणात दिले पाहिजेत, हे आपल्याला माहिती आहे (Junk food and its consumption). पण असेही बरेचसे पदार्थ आहेत जे आपल्याला हेल्दी वाटतात म्हणून आपण ते खातो आणि मुलांनाही खाऊ घालतो. स्वत:चं आणि कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी असे hidden junkfood ओळखा आणि ते खाणंही बंद करा किंवा कमीतकमी खा, असा सल्ला सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर देत आहेत. (Camouflaged junk food which pretends to be healthy but isn’t.)

 

याविषयीचा एक व्हिडिओ ऋजुता यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये त्या म्हणतात की हल्ली नाश्त्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन रिच धान्यांचे पॅक आणतो.

रोपांना द्या बटाट्याच्या सालींचं सुपरफूड, बघा कसा करायचा वापर- रोपांची होईल भरघोस वाढ

किंवा आरोग्यदायी म्हणून फळांचे पॅक ज्यूस पितो. हे देखील जंकफूडचाच प्रकार आहेत. हे पदार्थ टाळायलाच पाहिजेत. तसेच हल्ली प्रोटीन्स असणारे किंवा धान्यांपासून तयार झालेले बिस्किट बाजारात मिळतात. पौष्टिक म्हणून आपण ते खातो आणि मुलांनाही देतो. पण वास्तविक पाहता, हे पदार्थही जंकफूड आहेत. 

 

मुलांना दुधात टाकून देण्यासाठी ज्या वेगवेगळ्या पावडर मिळतात, प्रोटीन्स बार किंवा डार्क चॉकलेट मिळतात, ते सगळे पदार्थही जंकफूडचाच एक प्रकार आहेत.

उन्हाचा पारा वाढतोय- उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून ५ गोष्टी करणं कटाक्षाने टाळा

बहुतांश आई आपल्या मुलांना जॅम, जेली, टोमॅटो सॉस, केचअप, मेयोनिज, चीजस्प्रेड असं खाऊ घालतात. काही मुलं तर अगदी रोजच्या रोज हे पदार्थ खातात. पण हे सगळे पदार्थ खाणंही टाळायला पाहिजे. कारण त्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यामुळे हे पदार्थ खाण्याचं प्रमाण एकदम कमी करा. कारण मुलांच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी हे पदार्थ अतिशय हानिकारक आहेत, असं ऋजूता दिवेकर सांगतात. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्नलहान मुलंजंक फूड