Join us

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 13:15 IST

6 Effective Health Benefits Of Holy Tulsi Helpful In Preventing Many Diseases : 6 Most Useful Health Benefits of Tulsi Plant : Uncovering the Powerful 6 Health Benefits of Tulsi Leaf : Health Benefits of Tulsi Uses and Remedies : बहुगुणी औषधी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात...

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते(6 Effective Health Benefits Of Holy Tulsi Helpful In Preventing Many Diseases).

तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने चावून खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती वाढते, श्वसन संस्थेस ( 6 Most Useful Health Benefits of Tulsi Plant) मदत होते आणि पचनसंस्था सुधारते. या सर्व कारणांमुळेच तुळशीची पाने चावून खाणे ही एक नैसर्गिक आणि सुरक्षित  सवय ठरते. तुळशीच्या पानांत नैसर्गिक औषधी गुण असून सर्दी-खोकला आणि ताप यांपासून (Uncovering the Powerful 6 Health Benefits of Tulsi Leaf) संरक्षण मिळते, तसेच त्वचेचे आणि पचनाचे कार्य सुरळीत चालण्यास मदत करते. तुळशीमध्ये जीवनसत्त्वे सी, ए, के आणि बी-कॉम्प्लेक्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम असे विविध (Health Benefits of Tulsi Uses and Remedies) पोषक घटक असतात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. यासाठीच, अशा या बहुगुणी औषधी तुळशीची पाने चावून खाण्याचे फायदे कोणते आहेत ते पाहूयात... 

तुळशीची पाने चावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे... 

१. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी :- तुळशीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ती रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. तुळशीचा अर्क रोगप्रतिकारक पेशींची क्रियाशीलता वाढवतो, ज्यामुळे शरीराचे संक्रमण आणि रोगांपासून संरक्षण होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण तुळशीच्या ताज्या पानांचा रस रोज पिऊ शकता. 

Teeth Whitening : घरगुती औषधी घटक वापरुन करता येतं हर्बल दंतमंजन, केमिकलवाल्या टूथपेस्टपेक्षा भारी आणि दातांसाठी चांगले...

२. बीपी आणि शुगरच्या रुग्णांसाठी फायदेशीर :- तुळस त्याच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे, रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर मानली जाते. क्लीव्हलँड क्लिनिकनुसार , संशोधनातून असे दिसून आले आहे की तुळशीचा रक्तातील साखर कमी करणे आणि रक्तदाब सुधारणे यासह अनेक चयापचय प्रक्रियांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

लघवीतले ‘हे’ ४ बदल सांगतात किडनीच्या आजाराची लक्षणं, पाहा तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना...

३. हृदयाचे आरोग्य वाढवते :- तुळशीची पाने हृदयाशी संबंधित अनेक समस्या टाळण्यास देखील मदत करतात. तुळशीची पाने रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्टेरॉल सुधारून हृदय निरोगी ठेवतात.

रात्री वारंवार लघवीला उठावे लागते, झोपमोड होते ? डॉक्टर सांगतात ४ उपाय, झोप लागेल शांत...

४. स्ट्रेसपासून मिळेल आराम :- तुळशीची पाने चावून खाल्ल्याने आपले मानसिक आरोग्य सुधारण्यास देखील मदत होईल. खरंतर, तुळशीमध्ये अ‍ॅडॉप्टोजेन गुणधर्म असतात. तुळशीतील हा असा एका नैसर्गिक गुणधर्म आहे, जे शरीराला ताणतणावाचा सामना करण्यास आणि मानसिक संतुलन वाढविण्यास मदत करतात.

५. शरीरातील एनर्जी वाढवण्यासाठी :- शरीरातील थकवा दूर करण्यासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. तुळशीमुळे शरीरातील ऊर्जा वाढते, यासाठी रोज तुळशीचे पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे तर होतात सोबतच शरीरातील एनर्जी देखील वाढते. 

६. सर्दी आणि खोकल्यापासून आराम :- आयुर्वेदात, तुळशीला खोकला, सर्दी आणि दमा यांसारख्या श्वसनाच्या आजारांवर प्रभावी उपाय मानले जाते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सइनडोअर प्लाण्ट्सहोम रेमेडी