Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी! वेळीच द्या लक्ष, उशीर नको व्हायला...

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी! वेळीच द्या लक्ष, उशीर नको व्हायला...

6 Changes On Face That Can Indicate Serious Health Problems Doctor Warns : What Your Face Can Tell You About Your Health : What Does Your Face Say About Your Health : 6 things your face could be saying about your health : Warning signs on your face that indicate something's wrong with your health : स्वतःकडे लक्ष देणे फार आवश्यक असते. तब्येत बिघडू नये म्हणून घ्या काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2025 11:35 IST2025-06-24T18:27:58+5:302025-06-25T11:35:01+5:30

6 Changes On Face That Can Indicate Serious Health Problems Doctor Warns : What Your Face Can Tell You About Your Health : What Does Your Face Say About Your Health : 6 things your face could be saying about your health : Warning signs on your face that indicate something's wrong with your health : स्वतःकडे लक्ष देणे फार आवश्यक असते. तब्येत बिघडू नये म्हणून घ्या काळजी

6 Changes On Face That Can Indicate Serious Health Problems Doctor Warns Warning signs on your face that indicate something's wrong with your health 6 things your face could be saying about your health | चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी! वेळीच द्या लक्ष, उशीर नको व्हायला...

चेहऱ्यात दिसणारे ६ बदल सांगतात, आरोग्याच्या तक्रारी! वेळीच द्या लक्ष, उशीर नको व्हायला...

चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर चेहरा बघून आपण एखाद्याचा मूड कसा आहे याचा अंदाज देखील (6 Changes On Face That Can Indicate Serious Health Problems Doctor Warns) लावू शकतो. याचबरोबर, चेहऱ्यात होणारे सूक्ष्म बदल हे आपल्या आरोग्यासंबंधित वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देखील देतात. आपल्या चेहऱ्यामध्ये होणारे लहान - मोठे बदल आपण बरेचदा ( 6 things your face could be saying about your health) चुकीच्या स्किनकेअर रूटीनचा परिणाम किंवा ऋतूमानातील बदल मानून दुर्लक्ष करतो. अनेकदा आपल्या त्वचेचा रंग बदलतो, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात, डोळ्यांना सूज येते असे अनेक बदल दिसतात, परंतु अनेकजणी या बदलांकडे कानाडोळा करून वेळ मारून नेतात(Warning signs on your face that indicate something's wrong with your health).

डार्क सर्कल्सपासून ओठांना भेगा पडण्यापर्यंत हे बदल तुमच्या शरीरातील पोषणाची कमतरता किंवा इतर आरोग्याच्या समस्यांचे संकेत देखील असू शकतात. नुकतेच, डॉक्टर सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये यासंदर्भात अधिक माहिती शेअर केली आहे. या व्हिडिओत त्यांनी चेहऱ्यावर दिसणाऱ्या अशा सहा गोष्टींबद्दल सांगितले आहे ज्या आपल्या पचनक्रिया, पोषण, हार्मोन्स आणि एकूण आरोग्याविषयी संकेत देतात. आपल्या चेहऱ्यावर दिसणारे हे सहा बदल नेमके कोणते आहेत ते पाहूयात. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जर तुम्हाला चेहऱ्यावर दिसणाऱ्या या संकेतांना ओळखता आलं, तर तुम्ही वेळेत तुमच्या आरोग्याची  काळजी घेऊ शकता आणि योग्य ती काळजी घेऊन आरोग्यासंदर्भात गंभीर समस्या टाळू शकता.

चेहऱ्यात दिसतात हे ५ बदल मग.... 

१. डार्क सर्कल्स (Dark Circles) :- डोळ्यांखालील डार्क सर्कल्स केवळ कमी झोपेचे लक्षण नाही, तर शरीरातील आयर्नच्या कमतरतेचे (ॲनिमिया) देखील लक्षण असू शकते.

कोरडा खोकला खूप? नागवेलीच्या पानांच्या घरगुती औषधाने ढास होते कमी, घ्या डॉक्टरांचाही सल्ला...

२. डोळ्यांना सूज येणे (Puffy Eyes) :- सतत सूजलेले डोळे यकृत किंवा किडनीच्या कार्यातील अडथळ्यांचे मुख्य लक्षण असू शकते. तसेच शरीरातील अधिक मिठाचे प्रमाण किंवा पाणी टिकून राहण्याचा (Water Retention) त्रास असण्याची शक्यता असते.

३. कोरडी त्वचा (Dry Skin) :- त्वचेचा कोरडेपणा ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्सच्या कमतरतेमुळे किंवा डिहायड्रेशनमुळे होतो. तसेच थायरॉईडच्या असंतुलनाचेही ते लक्षण असू शकते.

शुगर कायमच वाढलेली असते? ६ सोप्या गोष्टी करा- शुगरचं टेंशन विसरा-वाढवा ताकद...

४. ओठ फुटणे (Chapped Lips) :- सतत ओठ फुटणे हे शरीरातील व्हिटॅमिन 'बी', 'झिंक' यांसारख्या सूक्ष्म पोषकद्रव्यांच्या कमतरतेचे संकेत देतात. 

५. दाह व पुरळ (Acne and Inflammation) :- चेहऱ्यावर वारंवार पुरळ येणे पचनसंस्थेशी संबंधित समस्या, हार्मोनल असंतुलन किंवा जास्त साखर व प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ अधिक प्रमाणांत खाण्याचे लक्षण असू शकते. 

६. डोळे लालबुंद होणे (Bloodshot Eyes) :- सतत वरचेवर डोळे लालबुंद होणे हे लिव्हर स्ट्रेस, मद्यपान किंवा डोळ्यांवरील ताण यांसारख्या समस्यांशी संबंधित असू शकते. त्यामुळे अशा लक्षणांची वारंवारता असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Web Title: 6 Changes On Face That Can Indicate Serious Health Problems Doctor Warns Warning signs on your face that indicate something's wrong with your health 6 things your face could be saying about your health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.