लहानपणी जेव्हा आई आपली काळजी घ्यायची तेव्हा ना केस गळायचे ना वजन वाढायचं. काही तरी जादू आहे, आईच्या उपायांमध्ये ज्यांमुळे लहानपण अगदी सुदृढ गेले. (6 benefits of applying 2 drops of oil to the navel every night)नंतर हळूहळू तारुण्यात आईचे ते उपाय नको वाटायला लागले. बाजारात मिळणाऱ्या अनैसर्गिक अशा गोष्टी चांगल्या वाटायला लागल्या. आता अनेकविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. आईच्या उपायांपैकी एक होता, नाभिला तेलाने मालीश करणे. झोपताना आई साध्या खोबरेल तेलाचे काही थेंब आपल्या नाभीत टाकायची. (6 benefits of applying 2 drops of oil to the navel every night)आणि आपल्याला छान झोप लागायची. नक्की काय होतं असं नाभीमध्ये तेल टाकल्याने? जाणून घेऊया. भारत योगा, तसेच डॉ. रुपाली जैन यांसारख्या आयुर्वेदिक माहिती देणार्या पेजेसवर नाभीला तेल लावण्याचे फायदे सांगितलेले आहेत.
नाभी शरीराचा असा भाग आहे जो विविध शरीर संस्थांशी जोडलेला असतो. तो थोडा पातळ असा अवयव आहे. त्यामुळे तेल शरीरात पटकन मुरते. (6 benefits of applying 2 drops of oil to the navel every night)
१. नाभीत तेल लावल्याने पचन व्यवस्था सुरळीत चालते. पोटात अडकलेला गॅस निघून जातो. तसेच जर पोट साफ होत नसेल तर, पोटही साफ होते. पोट फुगण्याचा त्रास असेल तर तो ही नाहीसा होतो.
२. शरीराला जर कोरड पडत असेल. तर ती पडणं बंद होते. नाभीतील तेल पटकन शरीरात जिरते. त्वचा आतून चांगली ठेवण्याचे काम करते.
३. शरीरातील मज्जातंतुंसाठी ही क्रिया फार फायदेशीर ठरते. तेलामुळे ते चांगले राहतात. तसेच संतुलित राहतात.
४. नाभीत तेल घातल्याने मानसिक शांतता मिळते. मनातील नको ते विचार नाहीसे होतात. त्यामुळे झोपताना नाभीला तेल लावायचे. झोपही छान व शांत लागते. शरीराचाही दिवसभराचा थकवा नाहीसा होतो. डोकं व शरीर शांत होते.
५. पोट दुखत असेल तर पोटाला तेल लावा. नाभीला तेलाने मालीश करा. त्यामुळे पोटाचे दुखणेही काही वेळात कमी होते.
६. बेलीफॅट्स कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो. ओटीपोटाला आलेला फुगवटा नाहीसा होतो.
नाभीला मालीश करण्यासाठी खोबरेल तेल वापरू शकता. तसेच बदामाचे तेल बाजारात मिळते. त्याने मालीश केल्याने आराम मिळतो. ऑलिव्ह ऑइलचाही वापर करु शकता. वजन कमी करण्यासाठी ऑलिव्ह ऑइलचा जास्त फायदा होतो.