Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Heart Attack आणणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा जिवाचा धोका टाळा!

Heart Attack आणणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा जिवाचा धोका टाळा!

Yellow Foods That Reduce Bad Cholesterol : वाढलेलं कोलेस्टेरॉल जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं, तेव्हा ब्लड फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. याच हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:23 IST2025-05-20T11:20:48+5:302025-05-20T11:23:09+5:30

Yellow Foods That Reduce Bad Cholesterol : वाढलेलं कोलेस्टेरॉल जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं, तेव्हा ब्लड फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. याच हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो.

5 yellow fruits to reduce high cholesterol bad cholesterol | Heart Attack आणणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा जिवाचा धोका टाळा!

Heart Attack आणणारं हाय कोलेस्टेरॉल कमी करतात 'ही' पिवळी फळं, रोज खा जिवाचा धोका टाळा!

Cholesterol Control: कोलेस्टेरॉल शरीरात जमा होणारा मेणासारखा एक चिकट पदार्थ असतो. शरीरात दोन प्रकारचे कोलेस्टेरॉल असतात, एक म्हणजे गुड कोलेस्टेरॉल जे शरीरात सेल्स आणि हार्मोन्स तयार करण्यास मदत करतात. पण जेव्हा शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं तेव्हा त्याला बॅड कोलेस्टेरॉल म्हटलं जातं. वाढलेलं कोलेस्टेरॉल जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतं, तेव्हा ब्लड फ्लोमध्ये अडथळा निर्माण होतो. याच हाय कोलेस्टेरॉलमुळे हार्ट अ‍ॅटॅकचा धोका वाढतो. अशात कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी आहारात बदल करणं खूप गरजेचं असतं. आहारात बदल केला तर बॅड कोलेस्टेरॉल कमी करून गुड कोलेस्टेरॉल वाढवण्यास मदत मिळते. अशात डॉ. सलीम जैदी यांनी सांगितलं की, डाएटमध्ये काही पिवळ्या फळांचा (Yellow Foods That Reduce Bad Cholesterol ) समावेश करून तुम्ही बॅड कोलेस्टेरॉल कमी करू शकता.

कोलेस्टेरॉल कमी करणारी फळं

डॉक्टर सांगतात की, ही पिवळी फळं खाऊन टेस्ट तर मिळतेच, सोबतच आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. तसेच ही फळं नियमितपणे खाऊन तुम्ही शरीरात जमा झालेलं बॅड कोलेस्टेरॉल सुद्धा बाहेर काढू शकता.

केळी

केळ्यांमध्ये पोटॅशिअम भरपूर असतं. तसेच यात फायबरही भरपूर असतं. नियमितपणे जर तुम्ही केळी खाल्ली तर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासही मदत मिळते. तसेच आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्टेरॉल सुद्धा बाहेर निघतं.

अननस

अननसामध्ये ब्रोमलेन आणि व्हिटामिन सी भरपूर प्रमणात असतं. या फळातील अ‍ॅंटी-इन्फ्लामेटरी गुण शरीरातील सूजही कमी करतात. अननस नेहमीच खाल्ल्यानं कोलेस्टेरॉल कमी करण्यासही मदत मिळते. 

लिंबू

पिवळ्या लिंबामध्ये भरपूर अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि पेक्टिन असतात. जे रक्तवाहिन्या साफ करतात. अशात लिंबामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यास खूप मदत मिळते.

संत्री

संत्र्याना व्हिटामिन सी चं पावर हाऊस म्हटलं जातं. तसेच यात फायबरही भरपूर असतं. संत्र्यातील तत्वांमुळे ऑक्सीडेटिव स्ट्रेसही कमी होतो. तसेच कोलेस्टेरॉल शरीरातून बाहेर काढण्यास मदत मिळते.

पपई

पपईमध्ये बीटा कॅरोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. पपईतील तत्वामुळे शरीराचं नुकसान करणारे फ्री रॅडिकल्स न्यूट्रिलाइज होतात. तसेच नियमितपणे पपई खाल्ल्यानं हृदयासंबंधी समस्याही दूर होतात.

शरीरात का वाढतं कोलेस्टेरॉल

शरीरात कोलेस्टेरॉल वाढण्याची कारणं वेगवेगळी असतात. सगळ्यात मोठं कारण म्हणजे खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी. जास्त तेलकट, मसालेदार आणि फॅट असलेले पदार्थ खाल्ल्यानं शरीरात कोलेस्टेरॉल खूप वाढतं.

तसेच लठ्ठपणा अधिक असल्यानं देखील शरीरात कोलेस्टेरॉल वाढतं. शरीराची काहीच हालचाल करत नसाल आणि एकाच जागी बसून राहत असाल तर कोलेस्टेरॉल शरीरात जमा होतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लठ्ठपणाही कमी करावा लागेल.

जास्त मानसिक तणावामुळे सुद्धा हाय कोलेस्टेरॉलची समस्या होते. त्याशिवाय मद्यसेवन आणि स्मोकिंग देखील कोलेस्टेरॉलची कारणं आहेत..

Web Title: 5 yellow fruits to reduce high cholesterol bad cholesterol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.