बिग बॉस १३ आणि काटा लगा गर्ल मधील प्रसिद्ध अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.(early signs of heart attack) यापूर्वी देखील बॉलिवूडमधील अनेक स्टार्सना हार्ट ॲटॅकमुळे आपला जीव गमवावा लागला.(cardiac arrest warning symptoms) सध्या हृदयविकाराच्या झटका किंवा स्ट्रोक यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.(signs your heart needs help) ही समस्या वेळीच ओळखणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीत काही बदल देखील करायला हवे.(heart health tips from doctors) स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात कोणती लक्षणे दिसतात जाणून घेऊया.
रक्तातली साखर-कोलेस्टेरॉल कमी करणारं इटुकलं फळ, पंतप्रधान मोदींनीही सांगितले होते त्याचे फायदे
1. कार्डियाक अरेस्ट, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची सुरुवातीची लक्षणे
कार्डियाक अरेस्ट अचानक येतो ज्यामुळे व्यक्तीला चक्कर येऊन ती बेशुद्ध पडते. इतकेच नाही तर अशावेळी श्वास थांबतो आणि हृदयाच्या हालचाली देखील थांबतात. कधीकधी कार्डियाक अरेस्ट येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे पाहायला मिळतात.
- छातीत दुखणे
- श्वास घेण्यास अडचण
- अशक्तपणा जाणवणे
- जोरजोरात श्वास घेणे
- वाढलेले हृदयाचे ठोके
- अशक्तपणा जाणवणे
ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्याच्या आधी पाहायला मिळतात. अशावेळी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
स्ट्रोक आल्यानंतर मेंदूमधील रक्तवाहिन्या फुटतात. मेंदूमध्ये रक्तस्त्राव सुरु होऊन मेंदूवरचा रक्तदाब वाढते. ज्यामुळे मेंदूच्या पेशींचे नुकसान होते. म्हणून वेळीच स्ट्रोकची लक्षणे ओळखता यायला हवी.
1. स्ट्रोकच्या लक्षणांमध्ये चेहऱ्यावरचा रंग बदलतो. चेहरा वाकलेला किंवा हसण्यात अडचणी येतात.
2. हाताला अशक्तपणा दिसून येतो. इतकेच नाही तर हात सुन्न होतात.
3. बोलण्यात अडचणी येतात. डोळ्यांनी पाहण्यात अडचणी येऊ शकतात.
4. स्मरणशक्ती कमकुवत होते किंवा गोष्टींचा गोंधळ उडतो. इतकेच नाही तर डोकेदुखी वाढते.
2. हृदयविकाराची लक्षणे
जेव्हा रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि हृदयाला पुरेशा प्रमाणात रक्त पुरवठा मिळत नाही तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो. उच्च कोलेस्टेरॉल आणि उच्च रक्तदाब हे हृदयविकाराच्या झटक्यापैकी सर्वात मोठे लक्षण आहे.
1. छातीत दुखणे हे हृदयविकाराच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. छातीत खूप वेळ दुखत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
2. शरीराच्या वरच्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी वेदना होतात. कधी हातात, मान किंवा जबड्याला मुंग्या येतात.
3. श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अचानक मळमळ होणे, उलट्या किंवा गरगरल्यासारखे होते.
4. सतत थकवा जाणवणे किंवा अचानक चक्कर येते.