आजकाल वाढता ताण, चुकीच्या खाण्या - पिण्याच्या सवयी आणि बैठी लाईफस्टाईल यामुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढताना दिसत आहे. सध्या हार्ट अॅटॅक येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, हे आता केवळ वृद्धांपुरतेच मर्यादित न राहता सर्व वयोगटातील लोकांसाठी एक मोठा धोका बनले आहे. अनेकांना वाटते की हार्ट अॅटॅक अचानक येतो, पण वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते तसे नाही(5 warning signs before heart attack).
अमेरिकेतील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट (signs heart gives before cardiac arrest) कुणाल सूद यांनी सोशल मिडीयावर माहिती शेअर करताना सांगितले की, कार्डियाक अरेस्ट किंवा हार्ट अॅटॅक कधीही अचानकपणे येत नाही. त्यापूर्वी आपले शरीर आपल्याला काही विशिष्ट संकेत देत असते. दुर्दैवाने, बहुतेक लोक या लक्षणांकडे सामान्य थकवा किंवा गॅस समजून दुर्लक्ष करतात. हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी शरीर देत असलेली ही ५ प्रमुख लक्षणं कोणती ? आणि वेळीच ही लक्षणे ओळखली, तर जीव वाचवणे सहज शक्य होऊ शकते. हार्ट अॅटॅक (heart attack symptoms you should not ignore) येण्यापूर्वी शरीर देत असलेली ५ प्रमुख लक्षणं कोणती ते पाहा...
हार्ट अॅटॅक येण्यापूर्वी शरीर दाखवते ५ प्रमुख बदल...
लक्षण १ :- पायांना किंवा तळव्यांना सूज येणे :- डॉक्टरांच्या मते, दिवस संपता-संपता पायांच्या खालच्या भागात किंवा घोट्याजवळ सूज दिसू लागते. हा संकेत शरीरात फ्लुइड (द्रव) साचत असल्याचे दर्शवतो, ज्याला एडीमा असेही म्हणतात. अशी लक्षणे हार्ट अटॅक किंवा किडनीच्या समस्यांची सुरुवातीची चिन्हे असू शकतात. हृदय रक्त योग्य प्रकारे पंप करू शकत नसल्यास रक्तप्रवाह कमी होतो आणि द्रव पायांपर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे टिश्यूमध्ये द्रव साचून सूज दिसू लागते.
बिनसाखरेचा चहा बिंधास्त प्यायल्यानेही होते आहे आरोग्याचे नुकसान, डॉक्टर सांगतात, हे एक चुकतं कारण...
लक्षण २ :- हृदयाची धडधड वाढणे :- जर वारंवार हृदयाची धडधड वेगाने होणे किंवा अनियमित ठोके जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती अनेकदा अॅरिदमिया (Arrhythmia) चे लक्षण असते, ज्यामध्ये हृदयाची धडधड सामान्य लयीत राहत नाही. अॅरिदमियाचा एक सामान्य प्रकार म्हणजे फिब्रिलेशन (Fibrillation), ज्यामध्ये हृदय अतिशय वेगाने आणि असामान्य पद्धतीने पंप करु लागते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फिब्रिलेशन झाल्यास स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअरच्या धोक्याचे प्रमाण अधिक जास्त वाढते.
लक्षण ३ :- छातीपासून हातापर्यंत दुखणं वाढत :- हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सूद यांच्या मते, जर छातीतील दुखणे हात, जबडा, मान किंवा पाठीपर्यंत पसरत असेल, तर ते सामान्य गॅस किंवा स्नायूंचे दुखणे नसू शकते. हे एनजाइना (Angina) किंवा हार्ट अॅटॅकचे संकेत असू शकतात. आपण या वेदनेला जडपणा, अतिरिक्त दबाव किंवा छातीत वेदना किंवा जडपणा वाटणे असे वाटते. हे शारीरिक हालचाल किंवा मानसिक तणावामुळे सुरू होऊ शकते. चिंतेची बाब तेव्हा असते जेव्हा हे दुखणे विश्रांतीच्या स्थितीतही सुरू होते आणि आराम केल्यावरही बरे होत नाही.
भात खाणं सोडू नका, फक्त तांदूळ बदला! वजन घटवण्यासाठी 'व्हाईट' की 'ब्राऊन', कोणता तांदूळ आहे बेस्ट?
लक्षण ४ :- हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढणे आणि बेशुद्ध पडणे :- जर हृदयाचे ठोके वेगाने वाढण्यासोबतच लगेच बेशुद्धी येत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, अशी प्रकरणे हृदयाच्या ठोक्यांशी संबंधित गंभीर समस्या दर्शवतात. डॉक्टर सांगतात की ही स्थिती टाकीकार्डिया (Tachycardia) किंवा हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी (Hypertrophic Cardiomyopathy) सारख्या समस्यांशी संबंधित असू शकते. वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या बेशुद्धीला 'कार्डियाक सिंकोप' (Cardiac Syncope) म्हणतात.
नको कडू काढे आणि डाएटचे पाढे, हा घ्या बॉडी डिटॉक्सचा सोपा आणि निवांत उपाय तो ही फुकट...
लक्षण ५ :- नाडी वेगाने चालणे :- जर तुम्हाला तुमच्या नाडीचा वेग (पल्स) अचानक वाढल्याचे किंवा अनियमितपणे चालत असल्यासारखी जाणवत असेल, विशेषतः याआधी असा अनुभव कधीच आला नसेल, तर हे हृदयाशी संबंधित गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, ही स्थिती अनेकदा एट्रियल फिब्रिलेशन (Atrial Fibrillation/AFib) चे लक्षण असते. एट्रियल फिब्रिलेशन हा जगभरात आढळणारा सर्वात सामान्य हार्ट रिदम डिसऑर्डर मानला जातो. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, AFib असल्यास स्ट्रोकचा धोका जवळपास पाचपट वाढू शकतो. त्यामुळे हे लक्षण दुर्लक्षित करणे चुकीचे ठरू शकते.
Web Summary : Heart attacks aren't sudden. The body gives early signals like swollen feet, palpitations, chest pain radiating to the arm, fainting, and rapid pulse. Ignoring these can be dangerous. Early detection saves lives.
Web Summary : हार्ट अटैक अचानक नहीं आता। शरीर पहले ही पैर में सूजन, धड़कन, छाती में दर्द, बेहोशी और तेज नाड़ी जैसे संकेत देता है। इन्हें अनदेखा करना खतरनाक है। जल्दी पता लगने से जान बच सकती है।