पावसाळ्यात आपल्याला आरोग्याची काळजी घ्यावी लागते. कारण या ऋतूमध्ये अनेक आजार डोकं वर काढतात.(Monsoon Care Tips) चुकीच्या आहारामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. सतत बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात.(monsoon diet tips for digestion:) पोटाचे आरोग्य बिघडून अपचनाचा त्रासही होतो. (foods that cause indigestion)
पावसाळ्यात आपल्याला उघड्यावरचे अन्न खाण्यास मनाई केली जाते. या ऋतूमध्ये माश्या आणि डासांची संख्या अधिक प्रमाणात वाढते.(stomach problems in monsoon) परंतु अनेकदा आपण घरातही असे अनेक अन्नपदार्थ खातो. ज्यामुळे आजारी पडण्याची शक्यता अधिक असते.(what not to eat in rainy season) पावसाळ्यात बाजारात अनेक रानभाज्यांची चव चाखायला मिळते. परंतु या काळात अशा अनेक भाज्या आहेत ज्या खाऊ नये.(avoid gas-causing vegetables) यामुळे आपले आरोग्य बिघडण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. पाहूया कोणत्या भाज्या खाऊ नये. (unhealthy veggies for monsoon )
पावसाळा सुरु होताच घरोघर माणसं आजारी, व्हायरल तापानं हैराण? पाहा तुमची तब्येत कशानं बिघडते..
1. पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाऊ नका. यामध्ये पालक, मेथी, फ्लॉवर, कोबीसारख्या भाज्या खाणे टाळा. या ऋतूमध्ये चिखल, कीटक आणि ओलावा असतो. ज्यामुळे भाज्या लवकर संक्रमित होतात.आपण या भाज्या कितीही स्वच्छ पाण्याने धुतल्या तरी आपल्याला इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक जास्त असते.
2. मशरुम हे शरीरासाठी पौष्टिक असले तरी पावसाळ्यात खाऊ नका. याचे सेवन करणे धोकादायक ठरु शकते. पावसाळ्यात भरपूर ओलावा असतो. ज्यामुळे मशरुम खूप लवकर खराब होतात आणि कुजतात. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. पावसाळ्यात मशरुम खूप काळजीपूर्वक खा.
3. ब्रोकोली या क्रूसिफेरस या भाज्या आरोग्यासाठी चांगल्या असल्या तरी पावसाळ्यात खाणे टाळायला हवे. यामुळे आरोग्य बिघडू शकते. पावसाळ्यात ओलावा आणि कीटक सहजपणे यामध्ये अडकतात. या कीटकांना स्वच्छ करणे कठीण होते. या भाज्या योग्यपद्धतीने शिजवल्या नाहीतर पचनसंस्थेला त्रास होऊ शकतो.
4. पावसाळ्यात वांगी खाणे टाळायला हवा. ही भाजी चविष्ट आणि पौष्टिकतेने समृद्ध असते. पावसाळ्यात ही भाज्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. पावसाळ्यात ओलावा आणि मातीमुळे वांग्यांमध्ये लवकर किड लागते.