Join us

सणासुदीला कामाची दगदग, पाऊलं ठणकतात - पोटऱ्या दुखतात? ५ टिप्स- दुखणं थांबेल, कामं होतील भरभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2025 16:09 IST

5 Tips to Get Relief From Leg Cramps: रात्री झोपल्यानंतर पाय ओढल्यासारखे होणे, पोटऱ्या दुखणे असे त्रासही तुम्हालाही होतात का?(how to avoid leg cramps?)

ठळक मुद्दे विपरित करणी, ताडासन या पद्धतीचे पायांचे आणि विशेषत: पोटऱ्यांचे स्नायू ताणले जातील असे व्यायाम करा. यामुळेही पोटऱ्यांच दुखणं कमी होण्यास मदत होते.

गौरी- गणपतीचा सण प्रत्येक घरात प्रचंड आनंद आणि उत्साह घेऊन येतो. याशिवाय या दिवसांत घरातल्या प्रत्येकाच्या मागचीच कामं खूप जास्त वाढलेली असतात. त्यात स्त्रियांच्या मागची कामं तर विचारून नका. अगदी सजावटीपासून ते नैवेद्यापर्यंंत प्रत्येक आघाडीवर त्यांना सगळं सांभाळून घ्यावं लागतं. हे सगळं करताना प्रचंड दमछाक होते. दिवसभर उत्साहाच्या भरात काही जाणवत नाही. पण रात्री मात्र अंथरुणाला पाठ टेकली की मग थकल्यासारखं होतं. त्यात काही जणींचे पाय तर खूप जास्त दुखतात. पोटऱ्यांमध्ये गोळे येऊन ते ओढल्यासारखे होतात. यामुळे मग रात्री शांत झोपही येत नाही (how to avoid leg cramps?). हा त्रास कमी करण्यासाठी या काही खास टिप्स..(5 tips to get relief from leg cramps)

 

पोटऱ्या दुखत असतील तर काय उपाय करावे?

१. सणासुदीच्या काळात कामाची धावपळ असल्याने अनेक जणींचे खाण्यापिण्याकडे लक्ष नसते. असं करू नका. व्यवस्थित जेवण करा आणि भरपूर पाणी प्या. पाणी कमी प्यायल्यामुळेही अंगातली ताकद कमी होते आणि पाय दुखतात.

रोज कुकर लावताना ४ गोष्टी नक्की तपासा, कुकरचा स्फोट होऊन दुर्घटना होण्याचा धोका टळेल 

२. पाय खूप दुखत असतील तर आहारातले पोटॅशियम वाढवा. केळी खाणे हा पोटॅशियम वाढविण्याचा एक उत्तम उपाय आहे.

३. रात्री झोपण्यापुर्वी तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल थोडं गरम करा आणि त्याने पोटऱ्यांना वरून खाली यापद्धतीने मसाज करा. मसाज केल्यामुळे तेथील रक्तपुरवठा सुरळीत होताे आणि पोटऱ्या दुखणं कमी होतं.

 

४. विपरित करणी, ताडासन या पद्धतीचे पायांचे आणि विशेषत: पोटऱ्यांचे स्नायू ताणले जातील असे व्यायाम करा. यामुळेही पोटऱ्यांच दुखणं कमी होण्यास मदत होते. 

मुलांच्या डब्यासाठी करा इंस्टंट रवाबेसन मसाला इडली! नाश्त्यासाठी परफेक्ट मेन्यू-घ्या रेसिपी

५. तुमच्या आहारात जर कॅल्शियम आणि मॅग्नेशियमयुक्त पदार्थ कमी प्रमाणात असतील तर त्यामुळेही पोटऱ्यांचा त्रास वाढतो. यासाठी हिरव्या पालेभाज्या, तीळ, सुकामेवा, सब्जा, चिया सीड्स, ताजी फळं असे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढवा. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीअन्नगणपती उत्सव २०२५