वय वाढू लागलं की एकेक दुखणं डोकं वर काढायला लागतं. हल्ली तर वाढत्या वयाचा आणि दुखण्यांचा काही संबंध राहिलेला नाही असं म्हटलं तरी चालेल. कारण बीपी, हृदयरोग, शुगर असे आजार जसे कमी वयातच होत आहेत तसंच कमी वयातच हाडांचं दुखणंही मागे लागत आहेत. हाडं ठिसूळ झाले की मग म्हातारपण कठीण जातं. उठताबसताही हाल होतात. चालणं- फिरणं बंद होतं आणि शिवाय फ्रॅक्चर होण्याचा धोकाही असतोच. हे सगळं टाळायचं असेल तर हाडं बळकट राहायला हवीत आणि त्यासाठी काही गोष्टी अगदी तरुण वयापासूनच नियमितपणे करायला हव्या.(5 ways to keep your bones health strong and reduce risk of fractures)
हाडं बळकट राहण्यासाठी ५ महत्त्वाच्या गोष्टी
हाडांचं आरोग्य जपायचं असेल तर कोणत्या गोष्टी कटाक्षाने केल्या पाहिजेत, याविषयीची माहिती तज्ज्ञांनी doctoramirkhan या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्या ५ गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..
१. वेट लिफ्टिंग व्यायाम नियमितपणे केले पाहिजेत. यामुळे हाडांवर गरजेनुसार प्रेशर तयार होतं आणि हाडं मजबूत, दणकट होतात. त्याशिवाय रनिंग, जाॅगिंग, सायकलिंग, स्विमिंग असे काही व्यायामही दररोज २० ते २५ मिनिट करायला हवे.
काही केल्या केस गळणं थांबेना? 'या' काळ्या बिया खा, केस होतील दाट, लांब
आहारातले कॅल्शियमचे प्रमाण वाढवा. हाडं ठिसूळ होण्यामागे किंवा वाढत्या वयासोबत फ्रॅक्चर होण्यासारख्या घटना वाढण्यामागे शरीरातली कॅल्शियमची कमतरता हे एक महत्त्वाचे कारण असते. त्यामुळे दूध, दही, हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली असे कॅल्शियम भरपूर प्रमाणात देणारे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असू द्या.
कॅल्शियमप्रमाणेच शरीरात व्हिटॅमिन डी देखील पुरेशा प्रमाणात हवे. कारण शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे असते. व्हिटॅमिन डी अपुरे असेल तर कॅल्शियमयुक्त पदार्थांचा योग्य तो लाभ शरीराला होत नाही. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही व्हिटॅमिन डी सप्लिमेंटही घेऊ शकता.
पोटावरची, कंबरेवरची चरबी खूपच वाढली? 'बॉडी ट्विस्ट' करा- काही दिवसांतच व्हाल स्लीम..
हाडं आणि स्नायू यांचं आरोग्य जपण्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात प्रोटीन्स असणंही खूप गरजेचं आहे. त्यामुळे प्रोटीनयुक्त पदार्थही अधिकाधिक प्रमाणात खा. बहुसंख्य शाकाहारी लोकांच्या शरीरात प्रोटीन्सची कमतरता असते. हाडं ठणठणीत ठेवायची तर शरीरातले प्रोटीन्सही वाढवायला हवे.
स्मोकिंग, ड्रिंक्स घेणे या सवयींचाही वाईट परिणाम तुमच्या हाडांवर होत असतो. त्यामुळे या सवयी शक्य तितक्या टाळलेल्या बऱ्या. महिलांच्या बाबतीत मेनोपॉजच्या काळातही हाडं ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळेच त्यांनीही या काळात स्वत:ची थोडी अधिक काळजी घ्यावी आणि वर सांगितलेले पदार्थ खाणं वाढवावं.