भारतात मधुमेहाच प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्यामुळेच तर भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखलं जातं. कोणताही आजार का असेना सुरुवातीला आपलं शरीर आपल्याला त्याबाबत थोड्याफार सूचना नक्कीच देत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. किंवा हा त्रास आपल्याला नेमका कशामुळे होत आहे, हे अज्ञानामुळे आपल्या लक्षातच येत नाही. असंच मधुमेहाचं असतं. आपल्या शरीरातली साखर वाढत आहे, याची सूचना शरीर देतं असतं. ती लक्षणं नेमकी कोणती आहेत ते पाहूया..(5 Signs That You Have Too Much Sugar In Your Body)
तुमच्या शरीरातली साखर वाढत आहे हे सांगणारी लक्षणं
१. सगळ्यात पहिलं लक्षण आहे रात्रीची झोप शांत नसणं. जर तुम्हाला रात्री वारंवार जाग येत असेल आणि विशेषत: मध्यरात्री ३ नंतर जाग येऊन अजिबातच शांत झोप लागत नसेल तर याचं कारण म्हणजे रक्तातील साखर वाढून तुमची नर्व्हस सिस्टिम जास्त स्टिम्युलेट होत आहे.
५ सवयींमुळे गृहिणी दिसतात गबाळ्या, रुटीनमध्ये 'हे' बदल करा- दिवसभर काम करूनही दिसाल स्टायलिश, आकर्षक
२. दुसरं लक्षण म्हणजे खूप तहान लागणे आणि वारंवार लघवीला जावे लागणे. याचे कारण म्हणजे जर रक्तातील साखर वाढली असेल तर किडनी ती लघवीद्वारे बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते.
३. वारंवार गोड खाण्याची इच्छा होणे हे देखील रक्तातील साखर वाढण्याचं एक लक्षण आहे.
४. चौथं लक्षण म्हणजे शरीरावर वारंवार खाज येणे. हा आपल्याला त्वचेचा त्रास वाटू शकतो. पण रक्तातील साखर वाढल्याने अनेक सुक्ष्म रक्तवाहिन्या खराब होतात आणि त्यामुळे शरीरावर सतत खाज येते.
सकाळी पाेट साफ व्हायला खूप त्रास होतो? रामदेव बाबा सांगतात ५ उपाय- गॅसेस, ॲसिडीटीही कमी होईल
५. रक्तातील साखर वाढली आहे हे सांगणारं पाचवं लक्षण म्हणजे सतत होणारी अंगदुखी. वाढलेल्या साखरेचा परिणाम नर्व्हस सिस्टिमवर आणि स्नायूंवरही होतो. त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होणं, अंग दुखणं, जड पडणं असा त्रासही शुगर वाढलेल्या व्यक्तीला होतो. वरील लक्षणं जाणवल्यास चटकन रक्त तपासणी करून लवकरच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Web Summary : High blood sugar shows through restlessness, thirst, and sweet cravings. Itching and body aches may occur. Early blood tests and doctor's advice are essential for prevention.
Web Summary : उच्च रक्त शर्करा बेचैनी, प्यास और मीठे की लालसा के माध्यम से दिखाता है। खुजली और शरीर में दर्द हो सकता है। रोकथाम के लिए शुरुआती रक्त परीक्षण और डॉक्टर की सलाह जरूरी है।