Join us

आपल्याला फॅट्स पचत नाही हे सांगणारी ४ लक्षणं, पचनाचा हा त्रास तर नाही तुम्हाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2022 16:36 IST

What are the symptoms of eating too much fat?: जेवण व्यवस्थित असेल तरीही काही त्रास वारंवार होत असतील, तर या लक्षणांकडे, तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष नकोच..

ठळक मुद्दे त्रास सारखा सारखा होत असेल, तर फॅट्स जास्त होत आहेत हे ओळखावे आणि जेवणात थोडा बदल करायलाच हवा.

बऱ्याच लोकांना स्वत:च्या तब्येतीच्या बाबतीत असा अनुभव येतो. जेवण तर व्यवस्थित जातं, पण मग तरीही तब्येतीच्या छोट्या- मोठ्या कुरबुरी सतत सुरूच असतात. जेवणात किंवा रोजच्या रुटीनमध्ये बदल झाला तर तब्येतीचा थोडा त्रास होणं समजण्यासारखं आहे. पण रोजचं रुटीन व्यवस्थित सुरु असतानाही या लक्षणांपैकी काही लक्षण वारंवार दिसून येत असतील, तर तुम्हाला तुमच्या जेवणातले फॅट्स (excess fat in diet) पचत नाहीयेत, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे आहारात खूप जास्त प्रोटीन्स असले किंवा खूप जास्त कार्बोहायड्रेट्स असले तर त्रास होतो, तसाच त्रास जेवणात गरजेपेक्षा जास्त प्रमाणात फॅट्स (symptoms of eating excess fat) घेतल्यानेही होतो. म्हणूनच पुढील प्रकारचा त्रास सारखा सारखा होत असेल, तर फॅट्स जास्त होत आहेत हे ओळखावे आणि जेवणात थोडा बदल करायलाच हवा. (What are the health problems if you have too much fat?)

 

जेवणात फॅट्स जास्त होत आहेत हे सांगणारी लक्षणं १. छातीत कायम जळजळ होणे जेवण झाल्यानंतर ३ ते ४ तासांनंतर छातीत वारंवार जळजळ होत असेल तर अन्नातले फॅट्स व्यवस्थित पचत नाहीयेत. हा त्रास अधूनमधून होत असेल किंवा खूप तेलकट, मसालेदार जेवणानंतरच होत असेल, तर चिंता करण्याचं कारण नाही. पण नेहमीप्रमाणे जेवण करूनही वारंवार छातीत जळजळ होत असेल तर मात्र एकदा आहारातील फॅट्सचं प्रमाण तपासून घ्यावं.

 

२. बरगड्यांच्या खाली दुखणे  फॅट्स पाण्यात विरघळत नाहीत. ते रक्तात मिसळावे, यासाठी आपल्या शरीराला एका विशिष्ट प्रकारचे enzymes तयार करावे लागतात. जेवढे जास्त फॅट्स तेवढं जास्त enzymes तयार होतात. जेव्हा हे अतिरिक्त enzymes तयार होणं शरीरासाठी अवघड होतं, तेव्हा या प्रकियेमधून गॅसनिर्मिती होते आणि त्यामुळे जेवणानंतर छातीमध्ये बरगड्यांच्या खाली वेदना जाणवू शकतात. 

 

३. डागाळलेली त्वचा जर चेहऱ्यावर वारंवार पिंपल्स येऊन त्याचे डाग दिसत असतील आणि हे डाग लवकर जात नसतील तर ते जेवणातले फॅट्स पचत नसल्याचं एक लक्षण आहे. बऱ्याचदा अशी समस्या असेल तर कितीही बाह्य उपचार करूनही पिंपल्स येणं कमी होत नाही. त्यासाठी आहारातूनच काही बदल करणं गरजेचं आहे. यासाठी जेवणातल्या फॅट्सवर कंट्रोल केलंच पाहिजे.  

 

४. वजन वाढणे निरोगी शरीरासाठी आहारातून योग्य प्रमाणात फॅट्स मिळणं खूप गरजेचं आहे. खूप जास्त फॅट्स होत असतील तर वजन वाढीचा त्रासही होऊ शकतो. यासाठीच तुमच्या आहारात प्रोसेस्ड फॅट्स, तळलेले पदार्थ यातून मिळणाऱ्या फॅट्सऐवजी शेंगदाणे, बीन्स, तूप या माध्यमातून मिळणारे हेल्दी फॅट्स असावेत.  

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न