Join us

रोज सकाळी पोट नीट साफ न होण्याला कारणीभूत दिवसभरातल्या ‘या’ ५ चुका, मागे लागतं जन्मभराचं आजारपण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2025 17:16 IST

5 Reasons Why You Feel Constipated Every Morning Know From Doctor : 5 Reasons For Constipation Every Morning : 5 Common Causes Of Constipation Daily : Lifestyle Habits Causing Constipation : How To Prevent Morning Constipation : टॉयलेटमध्ये तासंतास बसून, जोर लावूनही पोट साफ होत नाही, मग तुम्ही करत असाल ६ चुका...

सकाळी उठल्यावर व्यवस्थित पोट साफ न होणे, ही एक अतिशय सामान्य पण त्रासदायक समस्या आहे. आपल्यापैकी बऱ्याचजणांना दिवसभर याच कारणामुळे अस्वस्थ वाटते, आणि अनेक शारीरिक समस्यांनाही ( 5 Reasons For Constipation Every Morning) सामोरे जावे लागते. पोटाचे आरोग्य (5 Common Causes Of Constipation Daily) थेट आपल्या एकूण आरोग्याशी जोडलेले असते, पण तरीही आपण नकळत काही अशा चुका करतो, ज्यामुळे पचनसंस्थेवर ताण येतो आणि सकाळी पोट साफ होण्यात अडचण येते. सकाळी उठल्या उठल्या जर आपले पोट व्यवस्थित साफ झालेच नाही, तर दिवसभर त्यामुळे पोट फुगल्यासारखं वाटतं, पोटात गॅस, अजीर्ण किंवा जडपणा जाणवतो(5 Reasons Why You Feel Constipated Every Morning Know From Doctor).

जर दररोज सकाळी उठल्यावर शौचास साफ होत नसेल तर त्यामागे आपल्या डेली रुटीनमधील काही लहान - सहान चुका कारणीभूत असतात. जर आपले पोट व्यवस्थित साफ नसेल तर (Lifestyle Habits Causing Constipation) याचा परिणाम आपली ऊर्जा, मूड आणि आरोग्यावरही होतो. पोट साफ नसल्यामुळे आपण व्यवस्थित काही खाऊ-पिऊही शकत नाही. या संदर्भात, प्रसिद्ध व्हॅस्कुलर सर्जन डॉ. सुमित कपाडिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर ( How To Prevent Morning Constipation) एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये, डॉक्टरांनी पोट साफ न होण्याची काही सामान्य कारणे सांगितली आहेत, या कारणांमध्ये सुधारणा करून आपण या त्रासाला नैसर्गिकरित्या दूर करु शकता. 

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ न होण्याची कारणं... 

१. पाण्याची कमतरता :- डॉक्टर सांगतात की, जर तुम्ही दिवसभर पुरेसं पाणी प्यायले नाहीत, तर आतड्यांमधील मल हळूहळू कठीण होऊ लागते आणि ते  सहजपणे बाहेर पडत नाही. अशा परिस्थितीत, सकाळी पोट चांगले साफ होण्यासाठी दिवसभर पुरेसं पाणी प्या.

लघवीचा बदललेला रंग सांगतो किडनी आजारी पडतेय, ‘असा’ रंग असेल तर लगेच गाठा डॉक्टर...

२. जास्त चहा-कॉफी पिणे टाळा :- आपल्यापैकी अनेकांना चहा - कॉफी पिण्याचे व्यसनच असते. हे देखील पोट योग्यप्रकारे साफ न होण्याचे एक कारण असू शकते.डॉ. कपाडिया सांगतात, चहा आणि कॉफी जास्त प्रमाणात प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होते आणि शरीरातील आतड्यांची नैसर्गिक हालचालीत बिघाड होतो. त्यामुळे, चहा-कॉफी पिणे कमी करा किंवा टाळा. 

३. फायबरची कमतरता :- शरीरात फायबरची कमतरता देखील पोट साफ न होण्याचे किंवा बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण असू शकते. फायबर शरीरातील मल नरम बनवते आणि त्यात वाढ करते, ज्यामुळे मलत्याग करणे सोपे होते. यासाठी, आहारात ताजी फळे, भाज्या, सुकामेवा आणि पौष्टीक बियांचा समावेश करणे गरजेचे असते. 

भयानकच! सुंदर दिसण्यासाठी नाकातल्या केसांचं वॅक्सिंग कोण करतं, पण तिने केलं-पाहा व्हायरल व्हिडिओ...

४. शौचास जाण्याची इच्छा दाबून ठेवणे :- सकाळी घाईघाईत अनेकदा आपण शौचास जाण्याचे टाळतो. वारंवार असं केल्याने शरीर तो संकेत देणं बंद करतं. त्यामुळे, या सवयीमध्ये सुधारणा करणे गरजेचे असते. शौचास आल्यास लगेच जाऊन यावे, टाळाटाळ करु नये. 

५. ताण आणि अपुरी झोप :- या सगळ्यांशिवाय, डॉक्टर सांगतात की, पोट आणि मेंदूचं खूप जवळचं नातं असतं. जेव्हा मेंदू तणावात असतो किंवा झोप पूर्ण होत नाही, तेव्हा पचनक्रिया सुद्धा मंद होते. त्यामुळे, स्वतःला स्ट्रेसपासून दूर ठेवा आणि रोज ७ ते ८ तास चांगली झोप घ्या. डॉ. सुमित कपाडिया सांगतात, या सवयींमध्ये सुधारणा करून आपण नैसर्गिक पद्धतीने पचनक्रिया चांगली करू शकता. यामुळे सकाळी सहजपणे मलत्याग करता येईल आणि तुमची तब्येत चांगली राहील.

प्या कपभर कडीपत्त्याच्या  चहा! केसांची खुंटलेली वाढ, केसगळती होईल कमी - केस वाढतील भराभर... 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स