Join us

तज्ज्ञ सांगतात 'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो; एकदा बघा तुमचंही काही चुकतंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2024 16:10 IST

Health Tips About Diabetes: भारतात मधुमेह होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच अगदी तरुण वयापासूनच काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.(5 mistakes that are responsible for diabetes at young age)

ठळक मुद्दे खूप कमी वयात डायबिटीस झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी आपण नेहमीच करतो अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत आहेत.

आपल्याला माहितीच आहे की आपली प्रत्येकाचीच जीवनशैली खूप बदललेली आहे. त्याचा परिणाम साहजिकच आपल्या आरोग्यावर होतो. त्यामुळेच हल्ली कमी वयातच हृदयविकार, मधुमेह यासारखे आजार मागे लागत आहे. टाईप २ प्रकारचा मधुमेह तर भारतामध्ये खूप जास्त वाढताना दिसतो आहे. पुर्वी वयाचा एक विशिष्ट टप्पा ओलांडल्यानंतरच हा आजार मागे लागायचा. पण आता मात्र खूप कमी वयात डायबिटीस झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी आपण नेहमीच करतो अशा काही गोष्टी कारणीभूत ठरत आहेत (5 mistakes that are responsible for diabetes at young age).  त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आणि डायबिटीस होऊ नये म्हणून स्वत:ला कशा पद्धतीने जपणं गरजेचं आहे, त्याविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...(Health Tips About Diabetes)

 

'या' चुकांमुळे कमी वयातच डायबिटीस होतो..

१. डॉ. राहुल चौडा यांनी न्यूज१८ ला दिलेल्या माहितीनुसार जंकफूड खाण्याचे खूप जास्त वाढलेले प्रमाण हे देखील मधुमेह होण्याचे एक महत्त्वाचे कारण आहे. कारण जंकफूडच्या अतिसेवनामुळे शरीरात योग्य त्या प्रमाणात इन्सुलिन तयार होत नाही. 

 

हिवाळ्यात केस खूप कोरडे होतात? कोरफडीमध्ये 'हा' पदार्थ टाकून लावा, रेशमासारखे मऊ होतील केस

२. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक जण व्यायाम करायला टाळाटाळ करतात. आपण तर अजून तरुण आहे, आपल्याला व्यायामाची काय गरज असा अनेकांचा समज असतो. हा ॲटीट्यूड बदलायला हवा. डायबिटीजसारखे आजार कमी वयातच नको असतील तर नियमितपणे कोणता ना कोणता व्यायाम जरूर करा.

 

३. काही लोकांना कमी वयात डायबिटीस होण्यामागे अनुवंशिकता हे देखील कारण आहे. त्यामुळे आपल्या कुटूंबाचा मधुमेहाचा इतिहास व्यवस्थित जाणून घ्या आणि त्यानुसार आतापासूनच तुमच्या लाईफस्टाईलमध्ये थोडा बदल करा. 

महागडे क्रीम, फेसपॅक लावण्याची गरजच नाही; ६ पदार्थ खा, वय वाढलं तरी त्वचा राहील तरुण

४. मनावर सतत कोणता ना कोणता तणाव असणे हे देखील कमी वयात मधुमेह होण्याचे एक कारण आहे. हल्ली तरुण लोकांना कामाचा, त्यांच्या करिअरचा बराच ताण असतो. या ताणाचा परिणाम रात्रीच्या झोपेवर, आरोग्यावर होतो. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते. त्यामुळेही मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

केस अजिबात वाढत नाही, खूप पातळ झाले? केसांना द्या 'लवंग' टॉनिक! महिनाभरात केस वाढतील

५. नियमितपणे आरोग्य तपासणी करून घेणे अनेक जण टाळतात. बऱ्याचदा आपलं शरीर आपल्याला प्रीडायबेटीक अवस्थेची लक्षणं दाखवून देत असते. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मग काही दिवसांतच बरेच लोक प्री डायबेटीक अवस्थेतून डायबेटीक अवस्थेत जातात.   

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समधुमेह