जेव्हा आपल्याला एखादा आजार होतो, तेव्हा आपले शरीर आधीच आपल्याला अनेक संकेत देऊ लागते. पण आपण अनेकदा त्या संकेतांकडे दुर्लक्ष करतो. पायांमध्ये होणारे बदल हे देखील असेच महत्त्वाचे संकेत आहेत, ज्यांना आपण सहसा गांभीर्याने घेत नाहीत. मात्र, वैद्यकीय संशोधन असे सांगते की, पायांमध्ये दिसणारे छोटे-छोटे बदल डायबिटीज, हृदयविकार आणि रक्तभिसरणाशी संबंधित आजारांचा सुरुवातीचा इशारा असू शकतात(5 foot issues indicate serious health problems signs of disease in feet).
'जर्नल ऑफ डायबिटीज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर' मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, डायबिटिक फूट अल्सर, पायांचे असामान्य तापमान, त्वचेच्या रंगात बदल किंवा सूज यांसारख्या समस्या रक्तभिसरणात बिघाड आणि नर्व्ह डॅमेजचे नुकसान करतात, ज्यामुळे पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. पायांकडे केलेलं दुर्लक्ष भविष्यात हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकसारख्या मोठ्या संकटांना निमंत्रण देऊ शकतं. म्हणूनच, तुमचे पाय तुम्हाला नेमका काय इशारा देत आहेत (foot issues indicate health problems) आणि वेळीच कोणती काळजी घेणे आवश्यक आहे, हे जाणून (5 foot issues that indicate serious health problems) घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
पायांत दिसणारे बदल देतात गंभीर आजारांचा धोका...
१. पायांमध्ये सुन्नपणा आणि मुंग्या येणे :- डायबिटीसचा इशारा :- जर तुम्हाला तुमच्या पायांमध्ये किंवा अंगठ्यामध्ये वारंवार सुन्नपणा, मुंग्या येणे किंवा जळजळ जाणवत असेल, तर हे डायबिटिसचे संकेत असू शकतात. ही समस्या सामान्यतः दीर्घकाळापासून अनियंत्रित असलेल्या डायबिटीजमध्ये दिसून येते. या स्थितीमध्ये नसा हळूहळू कमकुवत होतात, ज्यामुळे वेदना आणि संवेदना कमी होतात. डॉक्टरांच्या मते, वेळेवर उपचार न झाल्यास पायांना दुखापत होण्याचा किंवा जखम होण्याचा धोका वाढतो, ज्याचे पुढे गंभीर संसर्गामध्ये रूपांतर होऊ शकते.
२. पायांत सूज किंवा वेदना :- हृदयविकाराचा इशारा :- पायांत सतत सूज राहणे, वेदना होणे किंवा जडपणा जाणवणे हे हृदयाशी संबंधित आजाराचे संकेत असू शकतात. हार्ट फेल्युअर किंवा 'पेरिफेरल व्हस्क्युलर डिसीज' (Peripheral Vascular Disease) मध्ये पायांवर सूज येणे हे एक सामान्य लक्षण आहे. बऱ्याचदा ही सूज चालताना वाढते आणि विश्रांती घेतल्यावर कमी होते. ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
हाता - पायांत काटा रुतून बसलाय? फक्त २ मिनिटांत वेदनेशिवाय काटा काढण्याचे २ भन्नाट उपाय...
३. त्वचेचा रंग बदलणे किंवा जखम न भरणे :- डायबिटीस व रक्तभिसरणात बिघाड :- पायांची त्वचा अतिशय कोरडी होणे, फाटणे, काळी किंवा निळी पडणे याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच, एखादी जखम दीर्घकाळ भरून येत नसेल, तर ते खराब रक्तभिसरण (Blood Circulation) किंवा संसर्गाचे लक्षण असू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ही स्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते. संशोधनानुसार, 'डायबिटिक फूट अल्सर'मुळे पुढे गंभीर संसर्ग होऊन अगदी पाय कापण्याची वेळही येऊ शकते.
४. पाय थंड पडणे :- रक्तभिसरणाची समस्या :- पाय अनेकदा थंड राहणे किंवा त्यावर निळसर/लालसर छटा दिसणे हे 'पेरिफेरल आर्टरी डिसीज' (PAD) चे लक्षण असू शकते. जेव्हा पायांकडे रक्त नेणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा येतो, तेव्हा हा आजार होतो. एका अभ्यासानुसार, PAD ने त्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका सामान्य लोकांच्या तुलनेत दुप्पट असू शकतो.
शुगर वाढण्याची भीती विसरा! रोज फक्त १ कप 'ब्लॅक कॉफी', मधुमेहावर रामबाण उपाय - रहाल कायम फिट...
५. पायांचा आकार किंवा नखांमधील बदल :- डायबिटीसचा इशारा :- पायांचा आकार बदलणे किंवा बोट वाकणे तसेच नखे जाड व बुरशीयुक्त होणे ही केवळ बाह्य समस्या नाही. हे बदल रुमॅटॉइड अर्थ्रायटिस सारखे ऑटोइम्यून आजार किंवा दीर्घकालीन डायबिटीजशी संबंधित असू शकतात.
Web Summary : Changes in feet can indicate diabetes, heart disease, or circulation problems. Numbness, swelling, skin discoloration, cold feet, and nail changes are key signs. Ignoring these could lead to serious complications like heart attack or stroke. Early detection and care are crucial.
Web Summary : पैरों में बदलाव मधुमेह, हृदय रोग या परिसंचरण समस्याओं का संकेत दे सकते हैं। सुन्नता, सूजन, त्वचा का रंग बदलना, ठंडे पैर और नाखूनों में बदलाव महत्वपूर्ण संकेत हैं। इनकी अनदेखी करने से दिल का दौरा या स्ट्रोक जैसी गंभीर जटिलताएँ हो सकती हैं। शीघ्र पता लगाना और देखभाल महत्वपूर्ण है।