Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'हे' ५ पदार्थ खाल्ले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाणारच नाही - न्यूट्रिशनिस्ट देतात महत्वाचा सल्ला...

'हे' ५ पदार्थ खाल्ले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाणारच नाही - न्यूट्रिशनिस्ट देतात महत्वाचा सल्ला...

5 Foods You Should Avoid If You Have High Blood Pressure : Food to avoid with high blood pressure : Worst Foods for High Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 22:05 IST2025-06-26T22:00:00+5:302025-06-26T22:05:02+5:30

5 Foods You Should Avoid If You Have High Blood Pressure : Food to avoid with high blood pressure : Worst Foods for High Blood Pressure : ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवायचं असेल तर कोणते पदार्थ खाणे टाळावे ते पाहा...

5 Foods You Should Avoid If You Have High Blood Pressure Worst Foods for High Blood Pressure Food to avoid with high blood pressure | 'हे' ५ पदार्थ खाल्ले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाणारच नाही - न्यूट्रिशनिस्ट देतात महत्वाचा सल्ला...

'हे' ५ पदार्थ खाल्ले तर ब्लड प्रेशर नियंत्रणात रहाणारच नाही - न्यूट्रिशनिस्ट देतात महत्वाचा सल्ला...

उच्च रक्तदाबाची समस्या फारच कॉमन असली तरी, ही समस्या कधीही गंभीर होऊ शकते. पूर्वीच्या काळी फक्त वाढत्या वयोमानानुसार वृद्धांना होणारी ही समस्या आजकाल तरुणांमध्ये (Food to avoid with high blood pressure) देखील फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उच्च रक्तदाबामुळे (Worst Foods for High Blood Pressure) हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढतो. उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी, आपण आपला आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा औषधं घेत असूनही रक्तदाब नियंत्रणात राहत नाही, यामागे आपल्या दररोजच्या आहारातले काही चुकीचे पदार्थ कारणीभूत ठरू शकतात(5 Foods You Should Avoid If You Have High Blood Pressure).

तणाव, झोपेची कमतरता यांसोबतच जास्त मीठ, साखर, प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, हे सगळं रक्तदाब वाढवण्यामागचं मुख्य कारण ठरू शकतं. त्यामुळे, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवायच असेल, तर औषधांबरोबरच आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत, आहाराची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते. आपल्या रोजच्या आहारात योग्य अन्नपदार्थ खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवता येतो, पण काही पदार्थ असे असतात, जे खाल्ल्यास ब्लड प्रेशर अधिकच वाढण्याचा धोका निर्माण होतो. न्यूट्रिशनिस्ट किरण कुकरेजा यांनी  इंस्टाग्राम अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर करत ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणते पदार्थ खाऊ नयेत हे सांगितले आहे. 

ब्लड प्रेशर असेल तर हे पदार्थ चुकूनही खाऊ नका... 

१. लोणचं :- ब्लड प्रेशर असणाऱ्यांसाठी लोणचं खाणं हे आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते. लोणचं दीर्घकाळ टिकवण्यासाठी त्यात अतिरिक्त मीठ घातलं जातं. हाच जास्त सोडियमचा स्रोत बीपी वाढवण्यामागचं मुख्य कारण ठरतो. Journal of Preventive Medicine and Public Health या संशोधनातही नमूद केलं गेलं आहे की, लोणचं हे सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब वाढवण्याशी संबंधित आहे आणि यामागचं मुख्य कारण म्हणजे लोणच्यातील जास्तीचे मीठ. यासाठीच बीपी असणाऱ्यांनी लोणचं मर्यादित प्रमाणांत खाणं किंवा शक्यतो टाळणं हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.

सर्वच लोक घरी बीपी मोजताना करतात ‘ही’ चूक, अचूक रीडिंग हवे असेल तर ‘एवढं’ करा...

२. पॅकेजिंग सॉस :- टोमॅटो केचप, सोया सॉस, शेजवान सॉस अशा पॅकबंद सॉसेसचा वापर आजकाल जवळपास प्रत्येक घरात होतो. चव वाढवण्यासाठी हे सॉसेस जरी स्वादिष्ट वाटत असले, तरी त्यामध्ये अत्यंत जास्त प्रमाणात मीठ (सोडियम) असते. विशेषतः जेव्हा हे सॉसेस नियमितपणे खाल्ले जातात, तेव्हा या  सॉसेस मधील मिठाच्या जास्त प्रमाणामुळे रक्तदाब वाढू शकतो. त्यामुळे हाय बीपी असणाऱ्या रुग्णांनी या सॉसेसपासून लांब राहणं किंवा अत्यंत मर्यादित प्रमाणातच त्यांचा वापर करणं आवश्यक आहे. 

गॅसेस, अपचन, पोटफुगी होऊ नये म्हणून कपभर प्या 'असा' चहा,- पोटाच्या तक्रारी गायब, मिळेल आराम...

३. पापड :- हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी पापड खाणे टाळावे. कारण पापड तयार करताना त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ घातलं जातं, जे रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतं. नियमितपणे पापड खाल्ल्यास शरीरात सोडियमचं प्रमाण वाढतं, ज्यामुळे ब्लड प्रेशर वाढतो आणि त्यासोबतच हृदयविकाराचा झटका  आणि स्ट्रोकचा धोका देखील वाढू शकतो. हाय बीपी असणाऱ्यांनी पापड खाणं टाळणं किंवा फार क्वचित व कमी प्रमाणातच त्याचा समावेश आहारात करणं आरोग्यासाठी सुरक्षित ठरेल.

४. बेकिंग सोडा :- न्यूट्रिशनिस्टच्या मते, हाय ब्लड प्रेशर असणाऱ्यांनी बेकिंग सोडा असलेले पदार्थ खाणे टाळावे. यामागचं कारण म्हणजे बेकिंग सोड्यामध्ये  असलेलं उच्च प्रमाणातील सोडियम. बेकिंग सोड्याचा जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरात फ्लूड (पाणी) साचून राहू शकतं, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. हे विशेषतः किडनी नीट काम न करणाऱ्या व्यक्तींसाठी अधिक धोकादायक ठरू शकतं, कारण त्यांचं शरीर अतिरिक्त सोडियम किंवा पाणी योग्य प्रकारे बाहेर टाकू शकत नाही. यासाठीच हाय बीपीचा त्रास असणाऱ्यांनी बेकिंग सोडा असलेले पदार्थ खाणे टाळावे. 

'या' ५ चुकांमुळेच डाएट-व्यायाम करूनही वजन कमी होत नाही! पोषणतज्ज्ञ सांगतात, काय घोळ होतो...

५. प्रोसेस्ड चीज :- प्रोसेस्ड चीजमध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट दोन्हीचे प्रमाण जास्त असते. हे दोन्ही घटक रक्तदाब वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात. विशेषतः जेव्हा प्रोसेस्ड चीज नियमितपणे खाल्ले जाते, तेव्हा ते हाय ब्लड प्रेशर असलेल्या रुग्णांसाठी धोकादायक ठरु शकते, कारण यामुळे हृदयावर ताण वाढतो आणि कोलेस्टेरॉल पातळीतही बिघाड होऊ शकतो.


Web Title: 5 Foods You Should Avoid If You Have High Blood Pressure Worst Foods for High Blood Pressure Food to avoid with high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.