lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..

पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..

5 Foods That Cause Belly Bloating : अपचन, गॅसेस यांचा त्रास वाढवणारे ५ पदार्थ..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2023 04:55 PM2023-12-19T16:55:57+5:302023-12-19T16:56:48+5:30

5 Foods That Cause Belly Bloating : अपचन, गॅसेस यांचा त्रास वाढवणारे ५ पदार्थ..

5 Foods That Cause Belly Bloating | पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..

पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..

ब्लोटिंग (Bloating) ही एक अशी समस्या आहे, ज्यामुळे पोट तर फुगतेच, शिवाय दिवसभर अस्वस्थ वाटते. मुख्य म्हणजे खाण्यापिण्यात काही बदल झालेत की, ही समस्या वाढत जाते. यामध्ये पोटात जळजळ, पोट फुगल्यासारखे वाटणे, गॅस किंवा पोट दुखण्याची समस्या वाढते. बऱ्याच जणांना ब्लोटिंगचा त्रास होतो. वेळीच यावर लक्ष न दिल्यास पोटाच्या समस्या आणखी वाढू लागतात.

काही वेळेला विशिष्ट पदार्थ खाल्ल्यानंतर ब्लोटिंगची समस्या वाढते. जर आपल्याला ब्लोटिंगची समस्या छळत असेल तर, वेळीच आहारातून काही पदार्थ वगळणे पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल (Bloating and Gas Problem). कोणते पदार्थ खाल्ल्याने ब्लोटिंगची समस्या वाढेल? कोणते पदार्थ आहारातून वगळावे? याची माहिती पोषणतज्ज्ञ लवनीत कौर यांनी शेअर केली आहे(5 Foods That Cause Belly Bloating).

ब्लोटिंगची समस्या होऊ नये म्हणून काय कोणते पदार्थ खाणं टाळावे?

- फरसबी खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या वाढू शकते. कारण त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. शिवाय त्यात ऑलिगोसॅकराइड्स असतात, ज्यामुळे अन्न लवकर पचण्यास अडचण निर्माण होते.

वजन कमी करण्याचे सारे फंडे फेल? किचनमधल्या ४ मसाल्यांचे एक खास ड्रिंक, वजन घटणारच

- कार्बोनेटेड पेयांमध्ये कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जास्त असते. जेव्हा आपण हे कोल्डड्रिंक्स पितो, तेव्हा ड्रिंक्ससह वायू देखील गिळतो. ज्यामुळे पोटात गॅस तर निर्माण होतेच, शिवाय ओटीपोटात हा गॅस जमा होऊ लागतो. ज्यामुळे पोट फुगण्याची समस्या वाढते.

- जर आपल्याला वारंवार पोट फुग्ण्याचा त्रास होत असेल तर केळी, ब्रोकोली आणि कोबी खाऊ नका. ही एक क्रूसीफेरस भाजी आहे. यामध्ये रॅफिनोज असतात.  रॅफिनोज एक प्रकारची साखर असते. जी गॅस निर्माण करते ज्यामुळे पोटदुखीचा त्रास होतो.

- कांदा, लसूण खाल्ल्याने देखील पोट फुग्ण्याचा त्रास होऊ शकतो. कांद्यामध्ये फ्रुक्टोन असते, जे एक विरघळणारे फायबर आहे. ज्यामुळे पोट फुग्ण्याचा त्रास होतो.

बैठ्या कामाच्या नोकरीने बसून बसून मागचा भाग वाढला? फक्त १० मिनिटं करा १ सोपा व्यायाम

- कच्चे भाज्या खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. पण यामुळे पोटात गॅसही निर्माण होऊ शकते. कारण कच्च्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. अशावेळी ब्लोटिंगचा त्रास होतो.

- जर आपल्याला जेवण केल्यानंतर ब्लोटिंगचा त्रास होत असेल तर, पाण्यात ओवा, जिरे आणि बडीशेप उकळवून प्या. यामुळे नक्कीच फायदा होईल.

Web Title: 5 Foods That Cause Belly Bloating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.