एखाद्या दिवशी कधीतरी आपलं नेहमीपेक्षा खूप जास्त काम होतं. किंवा काही दिवस खूप कामाची खूप गडबड असते. धावपळीत असताना आपल्याला जाणवत नाही. पण जेव्हा ही गडबड संपते तेव्हा मग खूप थकवा जाणवायला लागतो. अगदी गळून गेल्यासारखं होतं. खूप दगदग झाल्यानंतर काही वेळासाठी असं होणं साहजिक आहे. पण काही जण असे असतात ज्यांना जास्तीचं कोणतंही काम न करताही नेहमीच खूप गळून गेल्यासारखं होतं. खूप थकवा आलेला असतो. या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका (why do you always feel weakness, tired and lazy?). कारण हार्वर्डने याविषयी काही अभ्यास केला असून ही एखाद्या आजाराची लक्षणं असू शकतात, असं सुचवलं आहे.(5 Diseases In Which Body Remains Tired All Day)
नेहमीच थकल्यासारखं होत असेल तर...
१. नेहमीच थकल्यासारखं होत असेल तर कदाचित तुमचे हृदय पुर्ण शक्तीने काम करत नाही, असाही त्याचा अर्थ असू शकतो. कारण हृदयातून रक्त पंपिंग करणं व्यवस्थित होत नसेल तर श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यामुळे ऑक्सिजनच्या कमरतेमुळे थकवा जाणवू शकतो.
महाश्रीमंत एलन मस्क म्हणजे कडक शिस्तीचा बाप, त्यांच्या मुलांना कराव्याच लागतात रोज ७ गोष्टी
२. शरीरात व्हिटॅमिन बी १२ कमी असेल तरीही तुम्हाला नेहमीच थकवा, आळस, अशक्तपणा जाणवू शकतो.
३. ज्यांच्या शरीरात लोह कमी असते, ज्यांना ॲनिमियाचा त्रास असतो म्हणजेच ज्यांचे हिमोग्लोबिन कमी असते त्यांनाही नेहमीच थकवा जाणवतो.
४. हायपोथायरॉईडचा त्रास असेल तर रक्तातील थायरॉईडचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चयापचय क्रियाही मंदावते आणि थकल्यासारखे किंवा आळसावल्यासारखे वाटते.
चैत्रगौरीच्या डेकोरेशनसाठी पाहा सुंदर आयडिया! तुमच्या घरची सजावट पाहून सगळे होतील खुश
५. महिलांच्या बाबतीत सांगायचं झाल्यास जेव्हा शरीरातील इस्ट्रोजीन आणि इतर हार्मोन्समध्ये असंतुलन येते, तेव्हाही थकवा येण्याचा, अशक्तपणा जाणवण्याचा त्रास होतो.