टाचेचं दुखणं (heel pain) ही आजकाल खूप सामान्य समस्या झाली आहे. सुरुवातीला हलकंसं वाटणारं हे दुखणं अनेकदा दुर्लक्ष केल्यामुळे वाढत जातं आणि चालणं-उभं राहणंही त्रासदायक होतं. अनेकांना वाटतं की हे अचानक होतं, पण प्रत्यक्षात आपल्या रोजच्या काही सवयी यामागे मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. (5 daily habits that cause heel pain, change them immediately, otherwise it will be difficult to walk or stand in the future)सर्वात मोठी चूक म्हणजे चुकीची चपल किंवा शुज वापरणं. खूप फ्लॅट चपल, खूप उंच हिल्स किंवा पायाला योग्य सपोर्ट न देणारे शूज वापरल्यामुळे टाचांवर ताण येतो. दीर्घकाळ अशा चपला वापरल्यास दुखणं वाढतं.
जास्त वेळ उभं राहणं ही दुसरी मोठी सवय आहे. कामानिमित्त अनेकजण तासनतास उभे राहतात, पण मधे मधे विश्रांती घेत नाहीत किंवा त्यांना विश्रांती घेता येत नाही. पायांना त्याची सवय होऊन जाते. मात्र हळूहळू कुरकुर सुर होतेच. यामुळे टाचांवर सतत दबाव येतो आणि वेदना वाढतात. वजन वाढणं देखील टाचेच्या दुखण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. शरीराचं अतिरिक्त वजन थेट पायांवर, विशेषतः टाचांवर पडतं. त्यामुळे चालताना किंवा उभं राहताना जास्त ताण येतो.
सकाळी उठल्यावर अचानक चालायला सुरुवात करणं हीसुद्धा एक सामान्य चूक आहे. झोपेतून उठल्यानंतर पायाचे स्नायू आणि लिगामेंट्स कडक झालेले असतात. अचानक वजन टाकल्याने टाचेला झटका बसतो आणि दुखणं जाणवतं. व्यायाम करताना चुकीची पद्धत वापरणं किंवा योग्य वॉर्मअप न करणं यामुळेही टाचेवर परिणाम होतो. विशेषतः धावणं, उडी मारणं किंवा जास्त चालणं अशा क्रिया करताना योग्य काळजी न घेतल्यास दुखणं वाढू शकतं.
कडक किंवा थंड जमिनीवर अनवाणी चालण्याची सवयही टाच दुखण्याचं कारण ठरु शकते. पायाला योग्य कुशनिंग न मिळाल्यामुळे टाचेला थेट चटका बसतो. पाणी कमी पिणं आणि शरीरातील लवचिकता कमी होणं यामुळे स्नायू कडक होतात, ज्याचा परिणाम टाचांवर होतो. तसेच, लांब वेळ बसून राहणं आणि अचानक हालचाल करणंही दुखणं वाढवू शकतं. टाचेचं दुखणं टाळायचं असेल तर या छोट्या सवयींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. योग्य चपला वापरणं, वजन नियंत्रणात ठेवणं, नियमित हलका व्यायाम करणं आणि पायांना विश्रांती देणं यामुळे हा त्रास कमी करता येतो. वेळेत काळजी घेतली तर टाचेचं दुखणं सहज नियंत्रणात राहू शकतं. पण दुर्लक्ष केल्यास ते दीर्घकालीन त्रासात बदलू शकतं, त्यामुळे शरीर देत असलेले संकेत ओळखणं महत्त्वाचं आहे.
Web Summary : Heel pain is often caused by daily habits like improper footwear, prolonged standing, and sudden movements. Maintaining a healthy weight, wearing supportive shoes, and regular exercise can help prevent it.
Web Summary : एड़ी का दर्द अक्सर अनुचित जूते, लंबे समय तक खड़े रहने और अचानक गतिविधियों जैसी दैनिक आदतों के कारण होता है। स्वस्थ वजन बनाए रखना, सहायक जूते पहनना और नियमित व्यायाम इसे रोकने में मदद कर सकते हैं।