Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

Bad habits that increase blood pressure: Daily habits raising heart attack risk: Habits causing high blood pressure: How bad habits contribute to stroke risk: Lifestyle habits linked to heart disease: Risk factors for high blood pressure and stroke: High blood pressure and stroke prevention tips : Heart attack risk: stroke issue: high blood pressure : या ५ वाईट सवयींमुळे देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2025 08:05 IST2025-02-23T08:00:00+5:302025-02-23T08:05:01+5:30

Bad habits that increase blood pressure: Daily habits raising heart attack risk: Habits causing high blood pressure: How bad habits contribute to stroke risk: Lifestyle habits linked to heart disease: Risk factors for high blood pressure and stroke: High blood pressure and stroke prevention tips : Heart attack risk: stroke issue: high blood pressure : या ५ वाईट सवयींमुळे देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

5 daily bad habits dangerous to health increasing high blood pressure heart attack and stroke risk avoid this mistake | ५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

५ चुकीच्या सवयी, आरोग्यासाठी घातक! भरभर वाढतं ब्लड प्रेशर- हृदयविकाराचा धोकाही

हृदयविकार आणि त्यासंबंधीचे आजार सध्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. या आजारांने दरवर्षी अनेकांचा मृत्यू होतो. यामागे सर्वात मोठे कारण मानले जाते ते उच्च रक्तदाब. (Bad habits that increase blood pressure) सध्या उच्च रक्तदाबाची समस्या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चुकीची जीवनशैली, जास्त प्रमाणात मीठ खाणे, ताण आणि सतत एकाच जागी बसून काम करणे याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. उच्च रक्तदाबाला सायलेंट किलर असे देखील म्हटले जाते. (Daily habits raising heart attack risk)
उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांना कमी मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. पण उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून मीठ कमी करावे लागेलच असे नाही.(How bad habits contribute to stroke risk) या ५ वाईट सवयींमुळे देखील आपल्याला हृदयविकाराचा झटका, उच्च रक्तदाब आणि स्ट्रोकच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. 

युरिक ॲसिड वाढलंय, सांधे दुखतात? उपाशीपोटी ‘हे’ पाणी प्या, दुखणं व्हायला लागेल कमी

उच्च रक्तदाब म्हणजे काय? 


उच्च रक्तदाब ही धोक्याची स्थिती आहे. जेव्हा आपल्या धमन्यांमध्ये रक्तदाबाचे प्रमाण वाढते, ज्यामुळे हृदयाला अधिक प्रमाणात काम करावे लागते. या क्रियेला अति उच्चरक्तदाब म्हणतात. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता अधिक असते. 

1. प्रक्रिया केलेले पदार्थ 


बाजारात  पॅक केलेले अन्नपदार्थ अतिप्रमाणात विकले जातात. यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढते. या पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. यामध्ये चरबी वाढवणारे घटक आणि रसायने असतात. 

2. दारु 


दारु प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारचे नुकसान होते. जर आपल्याला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मद्यपानाचे करणे टाळावे. यामुळे उच्च रक्तदाब वाढू शकतो. दारु प्यायल्यानं रक्तवाहिन्या रुंद होतात. हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त काम करावं लागते, ज्यामुळे रक्तदाब वाढतो. 

3. लठ्ठपणा 


जास्त खाणे  आणि बैठ्या जीवनशैलीमुळे आपल्याला लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावं लागतं. यामुळे वजन वाढणे, अति लठ्ठपणा येऊन हृदयावर दबाव येतो. ज्यामुळे उच्च रक्तदाबाची परिस्थिती निर्माण होते. तसेच यामुळे आपल्या मज्जासंस्थेवर देखील परिणाम होतो. लठ्ठपणा वाढल्यास आपल्या संपूर्ण शरीराचे आरोग्य धोक्यात येते. त्यासाठी आपला आहार संतुलित ठेवायला हवा. 

4. अतिरिक्त ताण


कामाचा किंवा सतत एखाद्या गोष्टीचा विचार केल्याने आपल्याला ताण येतो. ज्यामुळे आपल्याला उच्च रक्तदाबाच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. ताण आल्यानंतर शरीर ॲड्रेनालाईन हार्मोन सोडते, ज्यामुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढतो. ज्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक येऊ शकतो. 

5. धुम्रपान 


धुम्रपानामुळे उच्च रक्तबाची समस्या अधिक वाढते. वारंवार धुम्रपान करणाऱ्या लोकांना हृदयविकाराच्या झटक्याला सामोरे जावं लागतं. तसेच उच्च रक्तदाब वाढून स्ट्रोकचा धोका देखील वाढतो. 

Web Title: 5 daily bad habits dangerous to health increasing high blood pressure heart attack and stroke risk avoid this mistake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.