Join us   

Lingerie Mistakes : अंडरगारमेंट्स घालताना तुम्हीही 'या' ५ चूका करता? आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतोय पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2021 12:52 PM

5 Common Lingerie Mistakes : जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अंडरगारमेंट्स खरेदी  करताना कोणतीही चूक करू शकत नाही. तर हा गैरसमज वेळीच दूर व्हायला हवा.

ठळक मुद्दे स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे अंडरगारमेंट्स  तुमच्या आरोग्याशी अनेक प्रकारे खेळू शकतात. याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे यीस्टची वाढ होण्यासाठी उत्तम वातावरण तयार होते. घट्ट अंडरवेअरमुळे रक्ताभिसरणही मंदावते. ज्यामुळे अंगात सुन्नपणा आणि जळजळ होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, त्वचेवर जळजळ, त्वचारोग आणि फॉलिक्युलायटीस असे आजार घट्ट अंडरवेअर किंवा ब्रा घालण्यामुळे उद्भवले आहेत.

अंडरगारमेंट्स ही एक अशी गोष्ट आहे जी आपण सर्वजण वय, लिंग आणि शारीरिक स्वरूपाच्या आधारावर विकत घेतो. ही प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. काही लोक स्वस्त अंडरगारमेंट खरेदी करतात, तर काही स्वतःला आकर्षक वाटण्यासाठी या कपड्यांवरही खूप खर्च करतात. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही अंडरगारमेंट्स खरेदी  करताना कोणतीही चूक करू शकत नाही. तर हा गैरसमज वेळीच दूर व्हायला हवा. काही चुकांकडे वेळीच लक्ष दिल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होऊ शकते. 

१) घट्ट  अंडरवेअर घालू नका

जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना घट्ट अंडरवेअर घालायला आवडतात, तर ही सवय त्वरित बदला. घट्ट अंडरवेअर वापरणं नुकसानकराक ठरतं. स्वच्छता राखण्यासाठी आणि स्वतःला संसर्गापासून वाचवण्यासाठी पुरेशी हवा आवश्यक आहे. परंतु जेव्हा तुम्ही घट्ट अंडरवेअर घालता, तेव्हा हवा या अवयवांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त असते. 

 रात्री नखं कापली तर काय होतं? नखं कापण्याची योग्य वेळ अन् पद्धत कोणती; जाणून घ्या

व्यायाम करताना घट्ट अंडरवेअर घालणे तुम्हाला वाटते त्यापेक्षा जास्त धोकादायक असू शकते. खरं तर, तुमच्या शरीराचे तापमान वाढल्यावर तुम्हाला घाम येतो. ज्यामुळे ओलावा तयार होतो आणि त्या भागात संसर्गजन्य जीवाणूंची वाढ होते.

घट्ट अंडरवेअरमुळे रक्ताभिसरणही मंदावते. ज्यामुळे अंगात सुन्नपणा आणि जळजळ होऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, त्वचेवर जळजळ, त्वचारोग आणि फॉलिक्युलायटीस असे आजार घट्ट अंडरवेअर किंवा ब्रा घालण्यामुळे उद्भवले आहेत.

२) रंगीत अंडरगारमेंट्स  वापरणं

कृत्रिम रंगांनी रंगवलेले अंडरगार्मेंट्स तुमच्या शरीरासाठी विषापेक्षा कमी नाहीत. एजो डाईने रंगवलेले अंडरगारमेंट्स घालण्याचे अनेक तोटे आहेत. या रंगांमुळे त्वचेवर रिएक्शन येण्याची शक्यता जास्त असते. यामुळे त्वचेवर पुरळ, सुजेच्या पुळ्या आणि खाज येऊ शकते. बहुतेक प्रकरणांमध्ये, आपले अंडरगारमेंट्स  यीस्टच्या संसर्गास कारणीभूत असतात. हे हानिकारक रंगित अंडरगारमेंट्स  तुमच्या त्वचेच्या थेट संपर्कात येत असल्याने, संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

३) स्वस्त अंडरगारमेंट्सचे तोटे

स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचे अंडरगारमेंट्स  तुमच्या आरोग्याशी अनेक प्रकारे खेळू शकतात. याचे अनेक दुष्परिणाम देखील आहेत. योग्य स्वच्छतेच्या अभावामुळे यीस्टची वाढ होण्यासाठी उत्तम वातावरण तयार होते. अशा स्थितीत, पुन्हा पुन्हा घाणेरडे कपडे परिधान करून, आपण अनवधानाने मागील बॅक्टेरियाला तयार होण्याची संधी देता.  

स्वस्त ब्रा तुमच्या दुधाच्या नलिकांना ईजा पोहोचवू शकतात. बाळाला दूध पाजताना स्तनपान करणारी ब्रा घालणे अतिशय आरामदायक मानले जाते. साधी ब्रा खूप घट्ट असल्याने आणि त्यांना तार जोडलेले असल्याने ते दुधाच्या प्रवाहात अडथळा आणते.

हॉट लुकिंग मिलिंद सोमण खातो तरी काय? ताेच सांगतोय, त्याच्या फिटनेसचं रहस्य..

ज्यामुळे तुमच्या स्तनांमध्ये दूध जमा होऊ शकते. स्वस्त आणि कमी दर्जाच्या ब्रा सामान्यतः मानदुखी आणि डोकेदुखीशी जोडल्या गेल्या आहेत. कारण ते तुमच्या मानेवर आणि खांद्यावर जास्त दबाव टाकतात. यामुळे मानदुखी आणि डोकेदुखी होऊ शकते.  

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य