Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

5 Amazing Benefits of Marigold Tea: झेंडूच्या फुलांचे हे काही जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत...(health benefits of marigold tea)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2025 09:20 IST2025-09-10T09:17:47+5:302025-09-10T09:20:02+5:30

5 Amazing Benefits of Marigold Tea: झेंडूच्या फुलांचे हे काही जबरदस्त फायदे तुम्हाला माहिती असायलाच हवेत...(health benefits of marigold tea)

5 amazing benefits of having marigold tea, how to make marigold tea, health benefits of marigold tea | नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

नजर धुसर झाली- स्क्रिन बघताना डोळे दुखतात? झेंडूचा काढा प्या- मिळतील ५ जबरदस्त फायदे 

Highlightsझेंडूच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांसाठी ते अतिशय चांगले आहे.

सणासुदीच्या दिवसात देवाला वाहण्यासाठी किंवा घर सजविण्यासाठी आपण झेंडूची फुलं नेहमीच वापरतो. सणवार आले की आपल्या घरातही अगदी भरभरून झेंडू आणला जातो. कारण घराला तोरण लावण्यापासून ते घरातला प्रत्येक कोपरा सजवून टाकण्यापर्यंत कित्येक वेगवेगळ्या गोष्टींसाठी झेंडू हौशीने वापरला जातो. शिवाय झेंडूचं डेकोरेशन केलं की आपोआपच ती जाग प्रसन्न आणि आनंदी वाटू लागते. मनाला प्रसन्न करून टाकणारं झेंडूचं फुलं आपल्या आरोग्यासाठीही अतिशय उत्तम आहे असं डॉक्टर सांगत आहेत (5 Amazing Benefits of Marigold Tea). झेंडूच्या फुलांचा काढा प्यायल्याने डोळ्यांना काय काय लाभ होतात याविषयीची ही खास माहिती...(health benefits of marigold tea)

झेंडूच्या फुलाचे औषधी उपयोग

 

झेंडूच्या फुलाचे उपयोग सांगणारी माहिती डॉक्टरांनी sowshrirao या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्या असं सांगत  आहेत की झेंडूच्या फुलांमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे डोळ्यांसाठी ते अतिशय चांगले आहे.

अण्णाच्या हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार डोसा घरीच हवा? पिठामध्ये २ पदार्थ मिसळा- डोसा होईल परफेक्ट 

शिवाय त्यामध्ये  रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे व्हिटॅमिन सी देखील असते. नजर धूसर होणे, डोळ्यांवर ताण येणे, स्क्रिन पाहिल्यामुळे डोळे थकल्यासारखे होणे, असे काही त्रास होत असतील तर झेंडूच्या फुलाचा काढा प्यावा. यासाठी गरम पाण्यात १५ मिनिटे झेंडूच्या पाकळ्या बुडवून ठेवाव्या. यानंतर ते पाणी गाळून घ्यावे आणि प्यावे.

 

झेंडूचा काढा पिण्याचे इतर फायदे

- कोणत्याही प्रकारचे फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी उत्तम औषध.

-  अपचन, ॲसिडीटी असा त्रास कमी करण्यासाठी मदत होते.

पैठणीचे काठ चमकदार राहण्यासाठी ४ टिप्स- पैठणी जुनी झाली तरी तिचे काठ नव्यासारखे लखलखतील

- स्नायूंचा थकवा कमी करण्यासाठी झेंडूचा काढा उपयुक्त ठरतो.

- मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठीही झेंडूचा काढा फायदेशीर आहे. 



 

Web Title: 5 amazing benefits of having marigold tea, how to make marigold tea, health benefits of marigold tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.