lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits : कशात असते ई जीवनसत्त्व? कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2024 05:24 PM2024-04-28T17:24:01+5:302024-04-28T17:25:12+5:30

4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits : कशात असते ई जीवनसत्त्व? कोणते पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला फायदा मिळतो?

4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits | रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

रोज खा व्हिटॅमिन ई असलेले ४ पदार्थ; हाडं- केस आणि त्वचेवर येईल नैसर्गिक ग्लो-आरोग्यही सुधारेल..

उत्तम आरोग्यासाठी व्हिटॅमिन, खनिजे आणि मिनरल्सची आवशक्यता शरीराला असते (Health Benefits). बऱ्याच व्हिटॅमिनमध्ये अनेक घटक असतात (Vitamins). जे शरीराला पोषण देतात. ज्यामुळे गंभीर आजारांचा धोका टळतो. ज्यात व्हिटॅमिन ईचा देखील समावेश आहे. व्हिटॅमिन ई हे एक जीवनसत्व आहे, जे चरबीमध्ये विरघळते. व्हिटॅमिन ई हे वनस्पती तेल, धान्य, फळे, भाज्या यासह इतर खाद्यपदार्थांमध्ये आढळते.

व्हिटॅमिन ई हे शरीरातील अनेक अवयवांच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. हे एक अँटिऑक्सिडंट देखील आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत, केस, त्वचा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. पण व्हिटॅमिन ई नेमकं कोणत्या पदार्थात आढळते, हे बहुतांश लोकांना ठाऊक नाही. व्हिटॅमिन ई नेमकं कोणत्या पदार्थात असते. पाहूयात(4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits).

बदाम

बदाम हे व्हिटॅमिन ईचे उत्तम स्त्रोत आहे. दिवसभरात आपण ४ ते ५ बदाम खाऊनही त्याची कमतरता दूर करू शकता. त्यात व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त इतरही पौष्टीक घटक असतात. त्यात प्रथिनेही असते. यामुळे मेंदूचे आरोग्य सुधारते. शिवाय मसल्स आणि आरोग्यही सुधारते.

ना वाटण - ना झंझट, कपभर सोया चंक्सची करा चमचमीत भुर्जी; १० मिनिटात प्रोटीन रिच डिश रेडी

किवी

व्हिटॅमिन ई ची कमतरता किवीच्या सेवनाने भरून काढता येते. त्यात व्हिटॅमिन ई व्यतिरिक्त अँटिऑक्सिडंट्स, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असते. किवीचे सेवन शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. १०० ग्रॅम किवीमध्ये १.५ मिलीग्राम व्हिटॅमिन ई असते.

पालेभाज्या

काही हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ई असते. पालक, मेथी आणि मोहरीची पानांमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. आपण आपल्या आहारात व्हिटॅमिन ईयुक्त पालेभाज्यांचा आहारात समावेश करू शकता.

अरे हे काय? लघवीचे डाग असलेली जीन्स पॅन्ट कोण विकते? किंमत ऐकून चकित व्हाल, ही कसली फॅशन

आंबा

व्हिटॅमिन ईची कमतरता भरून काढण्यासाठी आपण आपल्या आहारात आंब्याचा समावेश करू शकता. उन्हाळ्यात आंब्याचा सिझन सुरु होतो. त्यात इतर पौष्टीक घटकासह व्हिटॅमिन ई देखील आढळते. जे शरीरासाठी आवश्यक असतात.

Web Title: 4 Vitamin E Rich Foods And Its Amazing Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.