Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिमाेग्लोबिन नेहमीच कमी असतं? डाॅक्टर सांगतात ४ पदार्थ खा-वाढवा एचबी झटपट-थकवा जाईल पटपट

हिमाेग्लोबिन नेहमीच कमी असतं? डाॅक्टर सांगतात ४ पदार्थ खा-वाढवा एचबी झटपट-थकवा जाईल पटपट

Natural Sources Of Iron: तुमच्या शरीरातही नेहमीच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खा...(how to get rid of anemia?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 18:21 IST2025-04-05T14:15:07+5:302025-04-05T18:21:47+5:30

Natural Sources Of Iron: तुमच्या शरीरातही नेहमीच हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर डाॅक्टरांनी सांगितलेले काही पदार्थ नियमितपणे खा...(how to get rid of anemia?)

4 superfood for improving iron or hemoglobin level, best food for increasing hemoglobin level, how to get rid of anemia, Natural sources of iron | हिमाेग्लोबिन नेहमीच कमी असतं? डाॅक्टर सांगतात ४ पदार्थ खा-वाढवा एचबी झटपट-थकवा जाईल पटपट

हिमाेग्लोबिन नेहमीच कमी असतं? डाॅक्टर सांगतात ४ पदार्थ खा-वाढवा एचबी झटपट-थकवा जाईल पटपट

Highlightsहे पदार्थ तुमच्या आहारात असतील तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सप्लिमेंट्स घेण्याची वेळ येणार नाही. 

आपल्या आसपास आपण असे अनेक लोक पाहातो ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असते. यामध्ये महिलांचे आणि शाळा- महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण खूप जास्त आहे. त्यामुळे असे लोक नेहमीच खूप थकलेले दिसतात. त्यांच्यामध्ये कायम अशक्तपणा असतो. यालाचा आपण ॲनिमिया असंही म्हणताे. ॲनिमियाचा त्रास कमी करून हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी अनेक जण काही सप्लिमेंट्स घेतात. पण त्यापेक्षाही जास्त गुणकारी ठरणारे अनेक पदार्थ तुमच्या स्वयंपाक घरातच आहेत (4 superfood for improving iron or hemoglobin level). ते जर तुम्ही योग्य प्रमाणात नियमितपणे खाल्ले तर नक्कीच हिमोग्लोबिन वाढून ॲनिमियाचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.(Natural Sources Of Iron)

 

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरणारे पदार्थ

हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त ठरतात याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ mammaslifestyle या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये डॉक्टरांनी जे काही पदार्थ सांगितले आहेत ते नियमितपणे खाऊन पाहा..

रामनवमी २०२५ : रामरायाच्या नैवेद्यासाठी कोणता प्रसाद करावा? ५ सोपे पदार्थ- होतील झटपट

१. शरीरातली लोहाची कमतरता कमी करण्यासाठी डाॅक्टरांनी सांगितलेला पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर चहा पिण्याच्या आधी १ अंजीर आणि १ खजूर १ कप दुधासोबत घ्या. तुम्ही त्याचा मिल्कशेक करूनही घेऊ शकता. हे दोन्ही पदार्थ हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात.

 

२. बीट, गाजर आणि डाळिंब हे तिन्ही पदार्थ समप्रमाणात घेऊन त्यांचा ज्यूस करा आणि तो काही दिवस नियमितपणे पिऊन पाहा. हिमोग्लोबिन वाढविण्याचा हा एक अतिशय उत्तम उपाय आहे.

साडी नेसल्यावर वयस्कर दिसता? ब्लाऊजचा पुढचा गळा शिवताना 'या' चुका टाळा- दिसाल स्मार्ट, आकर्षक

३. डॉक्टर असंही सांगत आहेत की जर पालकाचे वेगवेगळे पदार्थ तुमच्या आहारात नियमितपणे असतील तर त्याचाही उपयोग हिमोग्लोबिन वाढण्यासाठी होऊ शकतो. दररोज रात्री जेवणापुर्वी पालकाचे सूप प्यायल्यास अधिक चांगले. हे पदार्थ नेमाने तुमच्या आहारात असतील तर हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सप्लिमेंट्स घेण्याची वेळ येणार नाही. 


Web Title: 4 superfood for improving iron or hemoglobin level, best food for increasing hemoglobin level, how to get rid of anemia, Natural sources of iron

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.