लिव्हर हा आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे.(Liver damage urine symptoms) ज्यामुळे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.(Urine color liver disease) तसेच रक्त स्वच्छ करुन पचनक्रिया सुरळीत करण्याचे काम यकृताचे असते.(Signs of liver problems in urine) ज्यावेळी लिव्हर आपल्या शरीरात योग्यरित्या काम करत नाही तेव्हा शरीरात अनेक बदल दिसून येतात.(Dark urine liver damage)
आपली लघवी सामान्यपेक्षा जास्त गडद पिवळा किंवा लालसर दिसत असेल तर लिव्हरची काळजी घ्यायला हवी.(How liver damage affects urine) अनेकदा आपल्याला लघवी करताना जळजळ होते किंवा जास्त प्रमाणात लघवी होत नाही अशावेळी डॉक्टरांचे मत जरुर घ्या.(Urine changes liver disease) लिव्हर योग्यरित्या कार्य करत नसेल तर वेळीच काळजी घ्या. लिव्हर खराब झाले असेल तर शरीर आपल्याला कोणते ४ संकेत देते पाहूया.
महिन्याभरात वजन होईल झरकन कमी! रोजच्या आहारात खा आयुर्वेदिक ५ गोष्टी, पोटाचा घेर राहिल नियंत्रणात
1. लघवीतून फेस येणे
लघवीला फेस येत असेल आणि सतत हे होत असेल तर वेळीच काळजी घ्या. शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढण्याचा संकेत आहे. जर सामान्यापेक्षा जास्त फेस दिसत असेल तर शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढले असेल. यावर वेळीच योग्य तो उपचार घ्या.
2. लघवीचा वास येणे
लघवीतून फेस येण्यासह त्याचा खूप जास्त वास येत असेल तर लिव्हर खराब असण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ज्यावेळी लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ योग्यरित्या बाहेर टाकू शकत नाही. तेव्हा मूत्रपिंड किंवा लघवीद्वारे ते बाहेर टाकले जाते. यामुळे लघवीतून दुर्गंधी येते.
3. लघवी करताना जळजळ होणे
लिव्हर खराब झाल्यावर शरीरातील अमोनियाची पातळी वाढू शकते. ज्यामुळे लघवी करताना जळजळ होऊ शकते. जर वारंवार लघवी करताना जळजळ होत असेल तर दुर्लक्ष करु नका.
4. वारंवार लघवी होणे
अनेकदा उन्हाळी लागल्यावर आपल्याला लघवीला होते. पण याव्यतिरिक्त जर लिव्हरचे आरोग्य बिघडले असेल तर वारंवार लघवी होऊ शकते. लिव्हरचा आजार हा हळूहळू वाढतो पण वेळीच काळजी घेतली नाही तर गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते. आपल्या शरीरातील छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करु नका.