Join us
Daily Top 2 Weekly Top 5

सतत गॅसेस होण्याची ४ कारणं, कायम पोट डब्ब-फुगलेलंच असतं कारण रोज होणाऱ्या चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2026 15:44 IST

4 reasons for constant gas, stomach is always bloated? , home remedies : सतत गॅस होत असेल तर त्याची कारणे जाणून घ्या.

पोटात सतत गॅस होणे, पोट फुगणे, ढेकर येणे किंवा जडपणा जाणवणे हा अनेकांना होणारा त्रास आहे. बदललेली जीवनशैली, वेळेवर न खाणे, बाहेरचे पदार्थ जास्त खाणे आणि ताणतणाव यामुळे हा त्रास वाढू शकतो. काही लोकांना तर रोजच गॅसची समस्या जाणवते.(4 reasons for constant gas, stomach is always bloated? , home remedies) त्यामुळे कामात लक्ष लागत नाही आणि सतत अस्वस्थ वाटत राहते. मात्र काही साध्या सवयी बदलल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.

अनेकदा आपण घाईघाईत जेवतो किंवा अन्न नीट चावत नाही. त्यामुळे अन्नासोबत जास्त हवा पोटात जाते आणि गॅस तयार होतो. शांतपणे आणि नीट चावून खाल्ल्यास पचन सुधारण्यास मदत होते. तसेच वारंवार तेलकट, तिखट आणि जंक फूड खाल्ल्यास पोटावर ताण येतो. त्यामुळे शक्यतो हलका आणि संतुलित आहार घेणे चांगले मानले जाते.

भारतीय स्वयंपाकात वापरले जाणारे जिरं, हिंग आणि ओवा हे पदार्थ पचनासाठी फायदेशीर समजले जातात. हे पदार्थ अन्न पचण्यास मदत करतात आणि पोटातील जडपणा कमी करण्यास उपयोगी ठरू शकतात. तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणेही खूप गरजेचे आहे. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर पचन मंदावू शकते आणि त्यामुळे गॅसचा त्रास वाढू शकतो.

बराच वेळ उपाशी राहणे किंवा वेळेवर जेवण न करणे हे ही गॅस वाढण्याचे एक कारण असू शकते. त्यामुळे ठराविक वेळेत खाण्याची सवय ठेवणे आवश्यक आहे. जेवणानंतर लगेच झोपण्याऐवजी थोडं चालल्यास पचन सुधारण्यास मदत होते. नियमित चालणे, हलका व्यायाम किंवा योगा केल्याने पोट हलके राहू शकते. जेवल्यावर एक फेरफटका मारायचाच असा नियम करुन घ्या. 

मानसिक ताणतणावाचाही परिणाम पचनावर होत असतो. सतत चिंता, अपुरी झोप आणि ताण यामुळे अॅसिडिटी आणि गॅसची समस्या वाढू शकते. त्यामुळे शरीरासोबत मनाची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

जर गॅसचा त्रास सतत होत असेल, पोटात खूप दुखत असेल, वारंवार अॅसिडिटी होत असेल किंवा इतर त्रास जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. काही वेळा पचनसंस्थेशी संबंधित इतर कारणांमुळेही हा त्रास होत असतो. तसेच गॅस जर जास्तच वाढला तर त्याचा ताण हृदयावर येतो. अगदी कार्य बंद पडण्यापर्यंतही प्रकरण जाऊ शकतं. त्यामुळे दुर्लक्ष करु नका.  

English
हिंदी सारांश
Web Title : Constant Gas: Causes and Simple Lifestyle Changes for Relief

Web Summary : Frequent gas, bloating, and indigestion often stem from lifestyle choices like irregular eating and stress. Simple changes like mindful eating, balanced diets, and timely meals, along with managing stress, can alleviate discomfort. Consult a doctor for persistent issues.
टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यहोम रेमेडीसोशल व्हायरल