आपल्यापैकी बऱ्याचजणांना अॅसिडीटीची (Herbal Teas for Acid Reflux) समस्या कायम सतावते. अॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि त्यानंतर डोकेदुखी, उलट्या हा सगळा त्रास असह्य असतो. खाण्याच्या अनियमित वेळा, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव, मसालेदार आणि तेलकट सतत खाल्ल्यामुळे अशाप्रकारच्या अपचनाच्या तक्रारी वाढतात आणि शरीरात आम्ल तयार होते. हे आम्ल जोपर्यंत शरीराबाहेर पडत नाही तोपर्यंत आपल्य़ाला (4 Herbal Teas That Can Cure Acidity Problem) आराम मिळत नाही. अॅसिडीटीची ही समस्या लहान वाटत असली तरीही काहीवेळा खूपच त्रासदायक ठरते. अशावेळी अॅसिडीटी कमी करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या, औषध असे अनेक उपाय (Herbal tea for acidity) करून पाहतो. परंतु ही वारंवार होणारी अॅसिडीटीची समस्या आणि ती बरी होण्यासाठी घेतली जाणारी औषध या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला हानिकारक ठरु शकतात. यासाठीच, अॅसिडीटी कमी करण्यासाठी नेहमी औषध - गोळ्या घेण्यापेक्षा काहीवेळा काही सोपे पण घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते(Home Remedies To Deal With Acidity Problems).
अॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी 'हर्बल टी' पिणे खूपच उपयुक्त मानले जाते. 'हर्बल टी' पिण्यामुळे पोटातील आम्ल संतुलित करण्यास, पचन सुधारण्यास आणि आम्लता दूर ठेवण्यास खूप मदत होते. एवढंच नव्हे तर हर्बल टी सामान्यतः वजन कमी करण्यास किंवा चांगली झोप येण्यास देखील मदत करते. हर्बल टी मुळे अॅसिडिटीच्या (Acidity) समस्येपासूनही आराम मिळतो. केंद्र सरकारच्या रुग्णालयातील ESIC रुग्णालयाच्या आहारतज्ज्ञ रितू पुरी यांनी अॅसिडिटीची समस्या कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारची हर्बल टी प्यावी आणि ती कशी फायदेशीर आहे हे सांगितले आहे.
अॅसिडिटीसाठी हर्बल टी फायदेशीर...
१. कॅमोमाइल हर्बल टी :- रात्री झोपण्यापूर्वी कॅमोमाइल हर्बल टी प्यायल्यास तुम्हाला चांगली झोप येते कारण त्यामुळे ताण कमी होण्यास खूप मदत होते. पण याशिवाय, कॅमोमाइल हर्बल टी अॅसिडिटीचा सामना करण्यासाठी उपयुक्त आहे. खरंतर, कॅमोमाइल पोटाच्या अस्तरांना आराम देते आणि यामुळे अॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. यासाठी, १ कॅमोमाइल टी बॅग किंवा वाळलेली कॅमोमाइल फुले गरम पाण्यात ५ मिनिटे भिजवा आणि मग अशी हर्बल टी प्या, यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास अधिक मदत होते.
ऑफिसमधून दमून आल्यावर, सायंकाळी अंगात त्राण नसतात? थकवा फार? 'हा' उपाय करा, ५ मिनिटांत रिफ्रेश...
२. पेपरमिंट हर्बल टी :- आपल्या शरीराला थंडावा मिळवूंन देण्यासाठी पुदिना खाल्ला जातो. पुदिन्यात असणाऱ्या या खास गुणधर्मामुळे अॅसिडिटीची समस्या कमी करण्यास मदत होते. अपचनामुळे होणारी जळजळ आणि आम्लपित्त यापासून आराम देण्यासाठी पेपरमिंट हर्बल टी पिणे फायदेशीर ठरते. अॅसिडिटी कमी करण्यासाठी ताजी पुदिन्याची पाने गरम पाण्यात ५ ते ७ मिनिटे भिजवा आणि त्यानंतर हे पाणी थंड किंवा गरम असतानाच प्या. यामुळे अॅसिडिटी कमी होऊन पोटात - छातीत होणारी जळजळ दूर करुन पोटाला थंडावा मिळतो.
३. जिऱ्याचा हर्बल टी :- पचनाच्या बाबतीत, जिऱ्याचा चहा पिणे अधिक फायदेशीर मानले जाते. पचनाशी संबंधित समस्या आणि आम्लपित्त यावर जिरे हा एक चांगला उपाय आहे. यामुळे पचन सुधारते, पोटफुगीची समस्या कमी होते आणि पोटातील आम्ल कमी करण्यास मदत करते. जिऱ्याची चहा बनवण्यासाठी, १ चमचा जिरे पाण्यात ५ मिनिटे उकळवा. ते गाळून घ्या आणि जेवणानंतर प्या. यामुळे अॅसिडिटी कमी होते.
जेमतेम १० वर्षाच्या मुलीला मासिक पाळी येते? मासिक पाळी लवकर येण्याची ६ कारणं...
४. आल्याचा हर्बल टी :- आले त्याच्या दाहक-विरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. आल्यात असणारे पचनाशी संबंधित गुणधर्म तुमच्या पोटाची काळजी घेतात. आल्यामुळे पोटातील आम्ल निष्क्रिय करण्यास मदत केली जाते यामुळे पोट फुगण्याची समस्या कमी होते . आल्याची चहा बनवण्यासाठी, ताज्या आल्याचे काही तुकडे पाण्यात ५ ते १० मिनिटे उकळवा आणि नंतर ते गाळून घ्या. आता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात मध मिसळू शकता. आता हा आल्याचा हर्बल टी गरम गरम प्या. यामुळे अॅसिडिटीची समस्या कमी होण्यास मदत मिळते.