Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी ४ फळं, ताकदही वाढते भरपूर आणि हृदयही राहते ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी ४ फळं, ताकदही वाढते भरपूर आणि हृदयही राहते ठणठणीत

Energy boosting and heart-friendly fruits: Fruits to lower bad cholesterol: हृदयाची काळजी घ्यायची असेल तर ही ४ फळं खायला आजपासून सुरुवात करा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2025 17:09 IST2025-07-15T17:05:01+5:302025-07-15T17:09:41+5:30

Energy boosting and heart-friendly fruits: Fruits to lower bad cholesterol: हृदयाची काळजी घ्यायची असेल तर ही ४ फळं खायला आजपासून सुरुवात करा.

4 Fruits to lower bad cholesterol Natural cholesterol-reducing foods strong heart and energy | बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी ४ फळं, ताकदही वाढते भरपूर आणि हृदयही राहते ठणठणीत

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारी ४ फळं, ताकदही वाढते भरपूर आणि हृदयही राहते ठणठणीत

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागते.(Heart Health) आहारात बदल करुन पथ्य देखील पाळावी लागतात. कोलेस्टेरॉलनं अनेकांचा तोंडचे पाणी पळवले आहे.(Bad cholesterol) कोलेस्टेरॉल वाढलं की स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता अधिक वाढते. अशावेळी नसांमध्ये साचलेले कोलेस्टेरॉल साफ करणं जास्त महत्त्वाचे असते. (Heart-healthy fruits)
शरीरात कोलेस्टेरॉल वाढलं की, त्याची लक्षणे सहजपणे दिसून येत नाही.(Foods for strong heart and energy) परंतु, त्याची वाढलेली पातळी हृदयासाठी हानिकारक असते. जेव्हा शरीरात एलडीएलची पातळी वाढते, तेव्हा रक्तप्रवाहामध्ये घाणेरडे कोलेस्टेरॉल साचून शरीराला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होत नाही. ज्यामुळे ब्लॉकेज आणि हृदयविकाराचा झटका येतो.(Best fruits for cardiovascular health) जर आपल्याला देखील हृदयविकाराच्या झटक्यापासून लांब राहायचे असेल. हृदयाची काळजी घ्यायची असेल तर ही ४ फळं खायला आजपासून सुरुवात करा. 

वजन कमी करण्यासाठी रोज चावून खा ही 'हिरवीगार पानं', पोट- मांड्यांवरची चरबी होईल कमी

1. लिंबूवर्गीय फळे 

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचा असेल तर आहारात लिंबूवर्गीय फळांचा समावेश करा. आपण लिंबू, संत्री आणि द्राक्षे खाऊ शकतो. यामध्ये फायबर, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स आणि भरपूर जीवनसत्त्वे असतात. व्हिटॅमिन सी ने समृद्ध असलेले हे फळ नसांमध्ये साचलेली घाण साफ करण्यास मदत करते. तसेच कोलेस्टेरॉल नियंत्रित करते. 

2. एवोकॅडो 

एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते. यात मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. फायबरचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील अतिरिक्त कोलेस्टेरॉल बाहेर निघते. यात अँटीऑक्सिडंट्स असणारे संयुगे असतात जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. 

ChatGPT ची कमाल! पठ्ठयानं दीड महिन्यात केलं ११ किलो वजन कमी, AI ने सांगितलं ४ पदार्थ खाऊ नकाच..

3. सफरचंद 

सफरचंद हे आरोग्यासाठी चांगले मानणारे फळ आहे. यात असणारे फायबर आणि पेक्टिन पचनसंस्था सुधारते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. सफरचंदामध्ये असणारे पॉलीफेनॉलसारखे अँटीऑक्सिडंट्स देखील खराब कोलेस्टेरॉलला ऑक्सिडेशनपासून वाचवतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. 

4. केळी 

कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण केळी खायला हवी. यात असणारे फायबर आणि पोटॅशियम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. ज्यामुळे कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. पचनसंस्था सुरळीत होऊन शरीरातील घाणेरडे कोलेस्टेरॉल बाहेर काढून टाकण्यास मदत करते. केळी खाल्ल्याने रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. 

 

Web Title: 4 Fruits to lower bad cholesterol Natural cholesterol-reducing foods strong heart and energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.