प्रत्येकाच्याच आरोग्याच्या काही ना काही समस्या सतत चाललेल्या असतात. तब्येतीमध्ये जरा काही खुट्ट झालं की बहुतांश लोकांचा कल लगेचच गोळ्या- औषधी घेण्याकडे असताे. पण असं वारंवार औषधं घेणं आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यामुळे असे काही उपाय करावेत ज्यामुळे आपली तब्येत तर ठणठणीत राहीलच पण त्याचा अन्य कोणताही दुष्परिणाम तब्येतीवर होणार नाही. असाच एक उपाय योग तज्ज्ञांनी सुचविला आहे (4 drops of ghee can help to boost immunity). यामध्ये आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुपाचा कशा पद्धतीने वापर करावा, याविषयीची माहिती सांगितली आहे.(4 places of your body where you must apply ghee)
तुपाचे आरोग्यदायी फायदे
आपल्या शरीराचे असे चार भाग आहेत जिथे जर तुम्ही नियमितपणे तूप लावून मालिश केली तर त्यामुळे अनेक त्रास कमी होऊ शकतात. ते भाग नेमके कोणते याविषयीची माहिती wellnesswithmanisha या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
जोर लावूनही पोट साफ होत नाही? २ पदार्थ रोज खा- बद्धकोष्ठतेचा त्रास कायमचा जाईल
१. डोळे
हात स्वच्छ धुवून शुद्ध तूप थोडेसे बोटावर घ्यावे आणि काजळ लावल्याप्रमाणे बोट फिरवावे. अशा पद्धतीने डोळ्यात थेंबभर तूप घातल्यास डोळ्यांचा थकवा कमी होतो. स्क्रिन पाहून हल्ली अनेकांच्या डोळ्यांवर ताण येतो, डोळे कोरडे पडतात. हा त्रास कमी करण्यासाठीही थेंबभर तूप उपयोगी ठरते.
२. नाक
एक थेंब तूप बोटाला लावावे आणि ते नाकाला आतून लावावे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास कमी होतो. तसेच मानसिक ताण कमी होण्यासाठी मदत होते.
कितीही पौष्टिक असले तरी रात्रीच्या जेवणात 'हे' पदार्थ खाणं टाळा- तब्येत बिघडून वजनही वाढेल
३. नाभी
थेंबभर तूप बेंबी म्हणजेच नाभीमध्ये घातल्यास प्रजनन संस्था तसेच पचन संस्थेचे कार्य अधिक चांगले होण्यास मदत होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच केस आणि त्वचेचे आरोग्यही सुधारते.
४. तळपाय
थोडेसे तूप घेऊन रात्री झोपण्यापुर्वी तळपायाला मालिश करावी. यामुळे मन शांत होण्यास मदत होते. मनातले विचार कमी होतात तसेच संपूर्ण शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते.