Health Tips : आर्टिफिशिअल इंटॅलिजन्स (AI) चा वापर अलिकडे अनेक ऑफिसेसमध्ये भरपूर वाढला आहेच, सोबतच लोक एआयकडे आपल्या खाजगी जीवनाबाबत किंवा आरोग्याबाबतही सल्ले मागत आहेत. म्हणजे अमूक समस्या असेल तर काय करायलं हवं, तमूक झालं असेल तर काय? आणि एआयकडून जे सल्ले दिले जातात, ते लोक डोळे झाकून फॉलो करू लागतात. पण असं करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं किंवा जीवघेणंही ठरू शकतं, याचा कुणी विचारही करत नाहीत. अलिकडेच असं करणं किती महागात पडू शकतं याचं एक उदाहरण समोर आलं आहे. आयरलॅंडमधील एका व्यक्तीला आपल्या तब्येतीबाबत एआयवर अवलंबून राहणं चांगलंच महागात पडलं.
एका रिपोर्टनुसार, 37 वर्षीय वॉरेन टियरनीको याला काही गिळण्यास त्रास होत होता. पण त्यानं आपलं डोकं चालवलं आणि डॉक्टरऐवजी ChatGPT चा सल्ला घेतला. एआयनं त्याला चुकीचं सांगितलं की, त्याला असलेली समस्या सामान्य आहे आणि कॅन्सर असण्याचा धोकाही कमी आहे.
टेस्टमध्ये निघाला कॅन्सर
डॉक्टरऐवजी एआयचा सल्ला घेणं या व्यक्तीला चांगलंच महागात पडलं. काही दिवसांनंतर सत्य समोर आलं आणि समजलं की, त्याला स्टेज 4 चा इसोफेगस कॅन्सर आहे. म्हणजे त्याला अन्ननलिकेचा एडेनोकार्सिनोमा कॅन्सर आहे.
वॉरेन हा दोन मुलांचा वडील आहे आणि मनोवैज्ञानिकही राहिला आहे. त्यानं हे मान्य केलं की, त्यानं डॉक्टरांकडे जाण्यास उशीर केला. कारण त्याला एआयवर विश्वास होता. हीच त्याची मोठी चूक झाली. एआयमुळे त्याला त्याचा गंभीर आजार समजू शकला नाही.
एआयनं काय दिला होता सल्ला?
ChatGPT ने त्याला सांगितलं होतं की, त्याची लक्षण कॅन्सर असल्याचं दाखवत नाहीत. जर हा कॅन्सर असेल तर आपण सामना करू, जर नसेल तर काही काळजी करण्याची गरज नाही.
अन्ननलिकेच्या या कॅन्सरमध्ये पाच वर्ष जगण्याचा सरासरी दर केवळ 5 ते 10 टक्के आहे. तरी सुद्धा वॉरेननं हार मानली नाही. त्याची पत्नीनं जर्मनी किंवा भारतात उपचारासाठी GoFundMe अभियान सुरू केलं आहे.
याआधीही घडल्या अशा घटना
अमेरिकेतील एका 60 वर्षीय व्यक्तीनं ChatGPT च्या सल्ल्यानुसार जेवणातील मीठ कमी करून सोडिअम ब्रोमाइड खाणं सुरू केलं होतं. पण याचा परिणाम असा झाला की, त्याच्या शरीरातील आयोडिन कमी झालं आणि त्याला आयसीयूमध्ये दाखल करावं लागलं.
एकंदर काय तर एआयचा वापर आपल्या कामांसाठी करणं ठीक आहे. पण आरोग्यासंबंधी समस्या दूर करण्यासाठी सल्ले घेणं महागात पडतं. एका रिपोर्टमध्ये कंपनीनं स्पष्ट केलं आहे की, आमच्या सेवा कोणत्याही आरोग्यासंबंधी समस्येच्या उपचारासाठी नाहीत.