आपल्यापैकी असे अनेक लोक आहेत ज्यांना पोटाचा त्रास आहे. ज्यामुळे त्यांना ॲसिडीटी, गॅसेस, पोटफुगीसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.(Home remedies for gas and acidity) पोट व्यवस्थित साफ न झाल्यास आपल्याला अस्वस्थ वाटते. सतत चिडचिड होते किंवा काहीही खाण्याचे मन होत नाही. (Natural cure for constipation)
खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, कॅफिन-साखरेचे -मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्याने आतड्यांना त्रास होतो.(Ayurvedic remedies for gas) तसेच आपण नीटसे चावून खाल्ले नाही किंवा फायबरचे आणि पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास बद्धकोष्ठतेच्या समस्येला सामोरे जावे लागते.(Yoga for constipation relief)यामुळे आपले पोट नीट साफ होत नाही. योगतज्ज्ञ सांगतात की, काही घरगुती टिप्स फॉलो केल्या तर बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून आपली सुटका होईल तसेच पोटही साफ होईल. (Best yoga for acidity and bloating)
सकाळी पोट साफ करण्यासाठी काही योगासने
1. योगतज्ज्ञ म्हणतात जर आपल्याला पचनाशी संबंधित काही त्रास असतील तर बद्धकोष्ठतेच्या समस्या उद्भवतात. अशावेळी सकाळी मलासनात बसा, २ ग्लास गरम पाण्यात मीठ आणि लिंबाचा रस घालून ते पाणी प्या. मलासन करताना दोन्ही पाय वेगळे ठेवून जमिनीवर बसा आणि हातांना नमस्काराच्या स्थितीत आणा. कोपऱ्यांना गुडघ्यांच्या बाजूंना स्पर्श होईल अशा स्थिती बसा.
2. उदराकर्षणासन ही योग स्थिती देखील पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला एका पायाचा गुडघा जमिनीवर ठेवून शरीर डावीकडे वाकवायला हवे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सारख्या स्थितीमध्ये बसा. यामध्ये संपूर्ण शरीराच्या हालचालीकडे लक्ष द्या. या स्थितीमध्ये किमान ५ ते १० मिनिटे रहा.
3. ताडासन करण्यासाठी सरळ उभे रहा. नंतर दोन्ही हात डोक्याच्या वर आणा आणि संपूर्ण शरीर वर खेचा. ताडासन ५ वेळा करा. त्यानंतर त्रेयक ताडासन करा, यात हात वर ठेवून प्रथम शरीर उजवीकडे आणि नंतर डावीकडे वळवा. ही योगासने नियमितपणे केल्यास पोट साफ होण्यास मदत होईल.
घरगुती उपाय करा
1. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात चमचाभर तूप घालून प्या. यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल.
2. आवळ्याचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते,ज्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही.
3. दह्यामध्ये अळशी मिक्स करुन खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होऊ शकतात. यामुळे शरीराला फायबर मिळते, ज्यामुळे पोट साफ होते.