Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शरीराची दुर्गंधी कमी करणारे पारंपरिक ३ उपाय, साईड इफेक्ट आणि महागड्या अत्तर परफ्यूमचा खर्च शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2026 12:19 IST

3 traditional remedies to reduce body odor, side effects and zero cost of expensive perfumes : शरीराला सारखी दुर्गंधी येत असेल तर करा घरगुती उपाय.

घाम येणे ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे, पण घामासोबत येणारा बॉडी ऑडर म्हणजेच शरीराची दुर्गंधी अनेकांसाठी त्रासदायक ठरते. बाजारात मिळणारे सेंट, परफ्युम, डिओडरंट्स यामुळे वास तात्पुरता जातो, मात्र त्यातील केमिकल्समुळे त्वचेला अ‍ॅलर्जी, खाज, रॅशेस किंवा त्वचा कोरडी पडण्याचा धोका असतो.  (3 traditional remedies to reduce body odor, side effects and zero cost of expensive perfumes) त्यामुळे बॉडी ऑडर कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय हे अधिक सुरक्षित आणि दीर्घकालीन परिणाम देणारे ठरतात.

बॉडी ऑडर का होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. घामाला वास नसतो, पण त्वचेवर असलेल्या जंतूंशी घामाचा संपर्क आला की दुर्गंधी निर्माण होते. अपुरी स्वच्छता, जास्त मसालेदार अन्न, पाणी कमी पिणे, हार्मोनल बदल किंवा सिंथेटिक कपडे यामुळे हा त्रास वाढू शकतो. यावर नैसर्गिक पद्धतीने उपाय केल्यास फायदा होतो.

आंघोळीच्या पाण्यात थोडेसे  कडीनिंबाची पाने घातल्यास जंतुनाशक गुणधर्मामुळे दुर्गंधी कमी होते. आठवड्यातून दोन-तीन वेळा असा उपाय केल्यास त्वचा स्वच्छ राहते. अंघोळीनंतर काखेत, पायांवर किंवा जिथे जास्त घाम येतो तिथे मुलतानी माती हलक्या हाताने लावल्यास ओलसरपणा कमी होतो आणि वास आटोक्यात राहतो.

लिंबू हा बॉडी ऑडर कमी करण्यासाठी प्रभावी नैसर्गिक उपाय मानला जातो. लिंबामधील अ‍ॅसिडिक गुणधर्म जंतूंची वाढ रोखतात. अंघोळीनंतर काखेत किंवा पायांवर थोडा लिंबाचा रस लावून काही मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा, त्यामुळे दुर्गंधी कमी होते. मात्र संवेदनशील त्वचा असणार्‍यांनी हा उपाय टाळावा.

आहाराचाही या दुर्गंधीवर मोठा परिणाम होतो. जास्त लसूण, कांदा, फार मसालेदार किंवा तिखट पदार्थ नियमित खाल्ल्यास घामाचा वास वाढू शकतो. पालेभाज्या, फळे, दही, ताक आणि भरपूर पाणी पिणे यामुळे शरीर आतून स्वच्छ राहते आणि दुर्गंधी कमी होते. क्लोरोफिलयुक्त पदार्थ, जसे की पालक, कोथिंबीर शरीराचा वास कमी करण्यास मदत करतात.

कपड्यांची निवडही महत्त्वाची आहे. कॉटन किंवा लिननसारखे नैसर्गिक कापड घाम शोषून घेतात आणि त्वचेला आराम देतात. सिंथेटिक कपडे घाम धरुन ठेवतात, त्यामुळे दुर्गंधी वाढते. कपडे नियमित धुणे आणि पूर्ण वाळवणेही आवश्यक आहे. तसेच त्रिफळा वपरणे फायद्याचे ठरते. जास्त परफ्युम वापरणे टाळा आणि सवयी बदला नक्कीच फायदा होतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Traditional remedies to reduce body odor: Zero cost, no side effects.

Web Summary : Fight body odor naturally! Kadi leaf baths, multani mitti, and lemon juice help. Diet changes, natural fabrics, and hygiene are crucial. Avoid strong perfumes.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीब्यूटी टिप्स