बऱ्याच लोकांना चहा- कॉफी खूप जास्त प्रमाणात घेण्याची सवय असते. सकाळी घरी असताना २- ३ वेळा चहा किंवा कॉफी, ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकदा, दुपारच्या जेवणानंतर एकदा, त्यानंतर सायंकाळी पुन्हा एकदा आणि थकून घरी गेल्यानंतर पुन्हा एकदा... असे चहाचे किंवा कॉफीचे कपावर कप रिचवले जातात. यामुळे वजन आणि शुगर तर वाढतेच पण आरोग्यावरही कित्येक वाईट परिणाम होतात. त्यामुळे आपलं चहा - कॉफी पिण्याचं प्रमाण जरा कमी केलं पाहिजे असं आपलं डोकं तर आपल्याला सांगत असतं पण वेळ झाली की आपोआप तल्लफ लागते आणि चहा घेण्याची इच्छा होते (how to overcome over consumption of tea and coffee?). पण जर तुम्हाला खरंच तुमच्या आरोग्याची काळजी असेल आणि त्यासाठी चहा- कॉफी पिण्याची सवय कमी करायची असेल तर पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा...(3 Tips to Overcome Tea and Coffee Addiction)
चहा- कॉफी पिण्याची सवय कमी करण्यासाठी उपाय
१. कोणतीही आवडीची गोष्ट एकदम सुटत नसते हे पक्कं लक्षात घ्या आणि एकदम चहा- कॉफी बंद करण्याचा किंवा अगदी एकाच कपावर येण्याचा निर्णय घेऊ नका. कारण हा प्रयोग तुम्ही फक्त काही दिवसच करू शकता आणि नंतर पुन्हा ते तेवढ्याच जोरात सुरू होऊ शकतं.
त्यामुळे जर तुम्ही दिवसांतून ६ वेळा चहा घेत असाल तर ते प्रमाण निम्म्यावर आणा. सुरुवातीला काही दिवस दिवसांतून ३ किंवा ४ वेळाच चहा प्या.
२. जेव्हा चहा किंवा कॉफी पिण्याची खूप इच्छा होईल तेव्हा हर्बल टी, ग्रीन टी असं काही प्या. तुळशीचा काढा, आल्याचा काढा, हळदीचा काढा अशा पर्यायांचा विचारही तुम्ही करू शकता. यामुळे चहाची आठवण थोडी विसरली जाईल.
३. यासोबतच एक्सपर्ट असं सांगतात की जर तुम्ही रात्री पुरेशी शांत झाेप घेतली तर आपोआप चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा कमी होत जाते.
तसेच प्रोटीनयुक्त नाश्ता केल्याने शुगर लेव्हल नियंत्रित राहाते आणि क्रेव्हिंग्स कमी होतात. थकवा कमी होतो त्यामुळे आपोआपच मग चहा- कॉफी कमी प्यायलं जातं. मॅग्नेशियम भरपूर असणारे पदार्थ खाल्ल्यानेही चहा- कॉफीची तल्लफ कमी होते.
Web Summary : Reduce tea and coffee gradually by half. Substitute with herbal teas. Ensure good sleep, protein-rich breakfast, and magnesium intake to minimize cravings and fatigue.
Web Summary : चाय और कॉफी का सेवन धीरे-धीरे आधा करें। हर्बल चाय से बदलें। अच्छी नींद, प्रोटीन युक्त नाश्ता और मैग्नीशियम का सेवन सुनिश्चित करें ताकि लालसा और थकान कम हो।