सकाळी उठल्यापासून प्रत्येकाचीच आपापली कामं सुरू असतात. ज्या महिलांना ऑफिसला जावं लागतं त्यांची तर जरा जास्तच धावपळ असते. अगदी धावत पळत प्रत्येक काम उरकून ऑफिस गाठायचं. तिथे पुन्हा एकदा स्वत:ला कामाला जुंपून घ्यायचं हे रोजचंच. या सगळ्या धावपळीला ब्रेक लागतो तो दुपारच्या जेवणानंतर. निवांत पोटभर जेवण केलं की डोळे आपोआप जड पडू लागतात. अंगात आळस येऊ लागतो आणि आता पुढचं काम अजिबातच करायला नको असं वाटू लागतं. सरळ पांघरुण घेऊन झोपण्याची इच्छा होते. जे लोक लंचनंतर घरीच असतात त्यांना थोडी डुलकी मारणं शक्य आहे (what to do if we feel sleepy after lunch?). पण वर्किंग लोकांचं काय म्हणूनच त्यांच्यासाठी ३ खास टिप्स..(3 Tips To Control Sleepiness After Lunch) यामुळे त्यांना दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटेल आणि झोप येणार नाही.(how to stop feeling drowsy after lunch?)
दुपारच्या जेवणानंतर आळस, सुस्ती येऊ नये म्हणून काय करावे?
दुपारच्या जेवणानंतर आळस येऊ नये म्हणून दुपारच्या जेवणात काय सोपे बदल करता येऊ शकतात, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी nutrilicious.byritajain या इंस्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.
१. यामध्ये त्या सांगत आहेत की दुपारच्या जेवणामध्ये पोळी, भाकरी, भात असे कार्बोहायड्रेट्स असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नका. त्याऐवजी ओट्स, भाज्या, मल्टीग्रेन पराठे, पनीर, टोफू असे पदार्थ खाण्यास प्राधान्य द्या. कारण यामुळे रक्तातील साखर पटकन वाढत नाही. आणि त्यामुळे मग आळस, गुंगी, सुस्ती येत नाही.
२. अनेक जणांना दुपारच्या जेवणात ताक पिण्याची सवय असते. ताकामुळे मेलॅटोनिन हार्मोन वाढतो. या हार्मोनमुळे आपल्याला एकदम शांत, रिलॅक्स वाटतं. त्यामुळे मग झोप आल्यासारखी होते. म्हणूनच ज्यांना दुपारी जेवल्यानंतर खूप सुस्ती येते त्यांनी जेवणात ताक पिणं टाळायला हवं.
श्रावणानिमित्त बाजारात आले कमी वजनाच्या चांदीच्या जोडव्यांचे सुंदर डिझाईन्स! बघून सांगा कोणतं आवडलं?
३. जेवण झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे चाला. चालल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण एकदम वाढत नाही. त्यामुळे मग आळस, सुस्ती येत नाही. शिवाय अन्नपचनही चांगले होते. या काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर दुपारच्या जेवणानंतरही फ्रेश वाटून तुम्ही उत्साहाने कामे उरकाल.