Join us
Daily Top 2 Weekly Top 5

Vitamin B12, D3 आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी ३ अगदी सोपे घरगुती उपाय- आजच करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2025 16:37 IST

Health Tips: बहुतांश लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२, डी ३ आणि कॅल्शियमची कमतरता असते. ती कशी भरून काढायची याविषयी ही खास माहिती...(How to get rid of vitamin b12, vitamin d3 and calcium deficiency?) 

ठळक मुद्दे शरीरातली व्हिटॅमिन बी १२, डी ३ आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात?

बऱ्याचदा असं होतं की आपलं आपल्या खाण्याकडे अजिबात लक्ष नसतं. बाहेरचं चटकमटक अन्न खाण्याच्या नादात आपण त्याची पौष्टिकता पाहातच नाही. त्यामुळे मग शरीरात अनेक पौष्टिक घटकांची कमतरता निर्माण होते. बहुतांश शाकाहारी लोकांमध्ये तर व्हिटॅमिन बी १२, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ३ या घटकांची कमतरता असतेच. त्यामुळे मग आरोग्याच्या कित्येक वेगवेगळ्या तक्रारी डोकं वर काढू लागतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी अगदी साधे- सोपे घरगुती उपायही करता येतात. ते नेमके कोणते ते पाहूया..(How to get rid of vitamin b12, vitamin d3 and calcium deficiency?)

 

Vitamin B12, D3 आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी उपाय

शरीरातली व्हिटॅमिन बी १२, डी ३ आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी काय उपाय करता येऊ शकतात, याविषयीची माहिती आयुर्वेद अभ्यासकांनी adarshayurvedicpharmacy या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी एकूण ३ उपाय सुचविले आहेत.

आठवडाभरात २- ३ किलो वजन उतरेल, रामदेव बाबा सांगतात खास उपाय- वजन घटून व्हाल फिट

१. व्हिटॅमिन डी ३ जर शरीरात कमी प्रमाणात असेल तर ते वाढविण्यासाठी गायीचं तूप खूप उपयुक्त ठरतं. यासाठी १ चमचा गायीचं तूप, १ चमचा तिळाचं तेल आणि ८ चमचे मध एकत्र करा. हे मिश्रण सकाळी किंवा संध्याकाळी एकेक चमचा ग्लासभर दुधासोबत घ्या. व्हिटॅमिन डी ३ ची कमतरता दूर होईल.

 

२. कॅल्शियमची कमतरता असेल तर ती भरून काढण्यासाठी चुना खूप उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी चुटकीभर चुना दुधासोबत किंवा दह्यासोबत घ्या. किंवा चुना लावलेलं विड्याचं पान रोज खा. विड्याच्या पानातून कॅल्शियम तर मिळतेच, पण त्यासोबतच इतरही कित्येक पौष्टिक घटक मिळतात.

आरीवर्कचं ब्लाऊज वापरताना ५ गोष्टींची काळजी घ्या, ब्लाऊजचं डिझाईन वर्षांनुवर्षे राहील नव्यासारखं सुंदर...

३. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असेल तर एक वाटी ताजं दही घ्या. त्यावर थोडा गरम भात किंवा गरम पोळी ठेवा आणि हे दोन्ही ८ ते १० तास झाकून ठेवा. त्यानंतर ते खा. शरीरातलं व्हिटॅमिन बी १२ वाढण्यास मदत होईल. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Simple home remedies to overcome Vitamin B12, D3, and Calcium deficiency.

Web Summary : Address vitamin deficiencies with these easy home remedies: ghee for vitamin D3, lime with milk for calcium, and yogurt with rice for vitamin B12, as suggested by Ayurveda experts.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सअन्न