हृदय हा शरीराचा अतिशय महत्त्वाचा अवयव असून ते निरोगी ठेवणे फार गरजेचे असते. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि हालचालींचा अभाव यामुळे आजकाल हृदयविकारांचा धोका वाढलेला दिसतो. त्यामुळे हृदय हेल्दी आहे की नाही हे वेळोवेळी तपासणे आणि ते निरोगी ठेवण्यासाठी योग्य उपाय करणे गरजेचे ठरते.(3 signs that your heart is not working properly, it will betray you any time) हृदय हेल्दी आहे की नाही याची काही संकेतांवरुन प्राथमिक ओळख करता येते. रोजच्या दैनंदिन कामात जास्त थकवा जाणवत नसेल, थोडे चालल्यावर किंवा जिने चढल्यावर धाप लागत नसेल, छातीत दुखणे, जडपणा किंवा जळजळ जाणवत नसेल, तर साधारणपणे हृदय नीट काम करत नसल्याचे संकेत मानले जातात. हृदयाचे ठोके वाढणे, अचानक चक्कर येणे किंवा घाम फुटणे या गोष्टी हृदयाचे आरोग्य ठीक नसल्याचे संकेत असतात. मात्र हे फक्त प्राथमिक संकेत असून खात्रीसाठी तपासण्या महत्त्वाच्या ठरतात.
हृदयाच्या आरोग्याची खात्री करण्यासाठी काही चाचण्या उपयुक्त ठरतात. नियमित रक्तदाब तपासणे फार महत्त्वाचे आहे, कारण वाढलेला किंवा खूप कमी रक्तदाब हृदयावर ताण देतो. रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी, विशेषतः LDL आणि HDL यांचे प्रमाण तपासणे गरजेचे असते. साखरेची पातळी वाढलेली असल्यास ती हृदयविकाराचा धोका वाढवू शकते. काही वेळा डॉक्टर ECG, 2D इको किंवा ट्रेडमिल टेस्टसारख्या तपासण्या सुचवतात, ज्यामुळे हृदयाची कार्यक्षमता समजते. हृदय आरोग्यदायी ठेवण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, फळे, संपूर्ण धान्ये, कडधान्ये आणि सुकामेवा, बिया यांचा समावेश असावा. तेलकट, तिखट, तळलेले पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ टाळणे फायदेशीर ठरते. मीठाचे प्रमाण मर्यादित ठेवल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ, जसे की अक्रोड, जवस हे हृदयासाठी उपयुक्त मानले जातात.
नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकल चालवणे, योगासने किंवा हलका व्यायाम केल्यास हृदय मजबूत राहते. व्यायामामुळे रक्ताभिसरण सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि ताणतणाव कमी होतो. मात्र अचानक जड व्यायाम सुरु न करता, शरीराच्या क्षमतेनुसार आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने व्यायाम करणे योग्य ठरते. धूम्रपान, तंबाखूचे सेवन आणि मद्यपान हे हृदयाचे मोठे शत्रू आहेत. या सवयींमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यामुळे शक्यतो या सवयी पूर्णपणे टाळाव्यात किंवा सोडून देण्याचा प्रयत्न करावा. एकूणच, हृदय हेल्दी आहे की नाही याची लक्षणांवरुन थोडीफार कल्पना येऊ शकते, पण नियमित तपासण्या आणि वैद्यकीय सल्ला महत्त्वाचा असतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, ताणमुक्त जीवनशैली आणि चुकीच्या सवयींवर नियंत्रण ठेवल्यास हृदय दीर्घकाळ निरोगी ठेवणे नक्कीच शक्य आहे. आज घेतलेली काळजीच उद्याच्या हृदयविकारापासून संरक्षण करते, हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
Web Summary : Recognize heart trouble signs early: fatigue, breathlessness. Regular checkups, healthy diet, exercise vital. Control stress, avoid smoking for long-term heart health.
Web Summary : थकान, सांस फूलना जैसे हृदय संबंधी समस्याओं के संकेतों को पहचानें। नियमित जांच, स्वस्थ आहार, व्यायाम जरूरी है। तनाव कम करें, धूम्रपान से बचें।