'स्तनं' हा महिलांच्या शरीरातील एक महत्वाचा आणि सगळ्यांत नाजूक अवयव असतो. इतर अवयवांप्रमाणेच महिलांनी आपल्या स्तनांची देखील तितकीच काळजी घेणे अतिशय आवश्यक असते. आजही अनेक महिलांना आपल्या स्तनांची (3 lifestyle practices for better breast health) काळजी कशी घ्यावी याबद्दल फारशी माहिती नसते. महिलांच्या सौंदर्यामध्ये अर्थातच स्तनांचाही (Breast Care Tips Every Woman Needs) तितकाच महत्त्वाचा भाग असतो. आपले स्तन उभारलेले, शेपमध्ये आणि व्यवस्थित दिसावे यासाठी अनेकजणी फार वेगवेगळ्या प्रकारचे उपायही करुन पाहतात, परंतु स्तनांच्या सुंदर आणि आकर्षक सौंदर्याबरोबरच ते तितकेच आतून हेल्दी आणि निरोगी असणे देखील फार गरजेचे असते(Breast Care Hacks You May Not Have Known About).
अनेकजणी स्तनांच्या सौंदर्याकडे विशेष लक्ष देतात परंतु त्यांची आवश्यक ती योग्य देखभाल करत नाहीत. याच कारणांमुळे मग स्त्रियांना स्तनांशी संबंधित अनेक आजारांचा तसेच समस्यांचा सामना करावा लागतो. यासाठीच वेळच्यावेळीच स्तनांची योग्य ती आवश्यक तपासणी, देखभाल आणि काळजी घेणे गरजेचे असते. स्तनांची योग्य पद्धतीने काळजी घेण्यासाठी दिवसांतील फक्त ३ मिनिटे स्वतःला देणे गरजेचे आहे. yogawithkamya_ या इंस्टाग्राम अकाऊंटवरून महिलांनी आपल्या स्तनांची योग्य ती देखभाल करण्यासाठी दिवसांतील फक्त ३ मिनिटे स्वतःला देऊन कोणते व्यायाम प्रकार करावेत हे याबद्दल अधिक माहिती शेअर केली आहे.
१. हेल्दी ब्रेस्टसाठी काय करावं ?
१. काखेत ३० सेकंद टॅपिंग करावे :- हेल्दी ब्रेस्टसाठी वेगवेगळ्या एक्सरसाइज करताना, प्रत्येकी ३० सेकंद याप्रमाणे काखेत हलकेच टॅपिंग करुन घ्यावे. यासाठी आपला एक हात वर करून दुसऱ्या हाताची मूठ करुन या मुठीने हलकेच काखेत ३० सेकंदांसाठी टॅपिंग करुन घ्यावे. अशीच कृती परत दुसऱ्या बाजूला देखील करावी.
२. काखेत गोलाकार पद्धतीने मसाज करावा :- स्तनांच्या उत्तम आरोग्यासाठी काखेत गोलाकार पद्धतीने मसाज करावा. यासाठी हात वर करून दुसऱ्या हाताच्या तळव्याने काखेत गोलाकार आकारात ३० सेकंद मसाज करून घ्यावा.
३. काखेत खालच्या दिशेने मसाज करावा :- स्तनांच्या आरोग्याची काळजी घेताना काखेत वरुन खालच्या दिशेने मसाज करत यावे.
खूप वर्ष सतत गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यानं स्तनांचा आकार वाढतो का? स्त्रीरोग तज्ज्ञ सांगतात...
२. हे छोटे एक्सरसाइज करण्याचे फायदे...
१. आपल्या स्तनांतील लिम्फॅटिक ड्रेनेज लिम्फॅटिक सिस्टमला उत्तेजित करते, जे स्तनांतील विषारी द्रव पदार्थ काढून टाकण्यास उपयोगी ठरते.
२. दिवसांतून फक्त ३ मिनिटे हे एक्सरसाइज केल्याने स्तनांतील सूज कमी करण्यास आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करू शकते, ज्यामुळे स्तनांची त्वचा उजळ आणि अधिक तेजस्वी दिसू लागते.
३. स्तनाग्रांना येणारी सूज कमी करण्यात मदत करा आणि निरोगी दुधाच्या नलिकांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात, ज्यामुळे स्तनपान करणे सोपे होऊ शकते.
४. लिम्फॅटिक ड्रेनेज मसाज स्तनाच्या कर्करोगाच्या उपचारानंतर लिम्फेडेमा असलेल्या स्त्रियांमध्ये वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करू शकते.
५. याचबरोबर स्तनाच्या ऊतींमधील द्रव पदार्थांचे संतुलन नियंत्रित करते आणि हानिकारक पदार्थ फिल्टर करते.
९९% लोकांना माहीतच नाही की ते चुकीच्या पद्धतीने चहा करतात! पाहा ३ कॉमन चुका...
३. तुमची ब्रेस्ट हेल्दी असण्याची काही खास लक्षणं...
१. तुमच्या स्तनांची त्वचा गुळगुळीत आणि ओबडधोबड नसून सपाट आहे, किंवा ती संत्र्याच्या सालीसारखी खरखरीत दिसत नाही.
२. तुमचे स्तन तुमच्या शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच उबदार वाटतात.
३. मासिक पाळीच्या आधी किंवा दरम्यान ब्रेस्टमध्ये हलक्या वेदना होणे किंवा दुखणे सामान्य आहे. याचबरोबर जर तुमच्या स्तनांमध्ये वारंवार वेदना होत नसतील तर तुमचे स्तन हेल्दी आहेत.
४. तुमच्या स्तनांतून कोणत्याही प्रकारचा स्त्राव वाहत नाही.
५. दोन्ही स्तनांना हात लावल्यावर तुम्हाला दोन्ही स्तनांमध्ये थोडासा गुळगुळीतपणा जाणवत असेल तर तुमचे स्तन हेल्दी आहेत असे समजावे.