Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > शरीराला येणारी दुर्गंधी गायब करतात ३ घरगुती उपाय, भरमसाठ स्प्रे मारणे टाळा आणि करा सोपे उपाय

शरीराला येणारी दुर्गंधी गायब करतात ३ घरगुती उपाय, भरमसाठ स्प्रे मारणे टाळा आणि करा सोपे उपाय

3 home remedies to reduce body odor, avoid using spray a lot and do simple remedies : शरीराची दुर्गंधी करा कमी. फक्त ३ सोपे उपाय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2026 12:55 IST2026-02-09T12:54:12+5:302026-02-09T12:55:16+5:30

3 home remedies to reduce body odor, avoid using spray a lot and do simple remedies : शरीराची दुर्गंधी करा कमी. फक्त ३ सोपे उपाय.

3 home remedies to reduce body odor, avoid using spray a lot and do simple remedies | शरीराला येणारी दुर्गंधी गायब करतात ३ घरगुती उपाय, भरमसाठ स्प्रे मारणे टाळा आणि करा सोपे उपाय

शरीराला येणारी दुर्गंधी गायब करतात ३ घरगुती उपाय, भरमसाठ स्प्रे मारणे टाळा आणि करा सोपे उपाय

शरीराला येणारी दुर्गंधी ही अनेक लोकांसाठी संकोचाची बाब ठरते. ही समस्या केवळ स्वच्छतेपुरती मर्यादीत नसून अनेकदा शरीरातील आतल्या असंतुलनाचं लक्षण असते. घाम येणं हे नैसर्गिक असलं तरी त्यामधील जंतू, शरीरातील विषारी घटक, पचनाचे दोष किंवा काही सवयी यामुळे घामाला उग्र वास येऊ लागतो. (3 home remedies to reduce body odor,  avoid using spray a lot and do simple remedies)अनेक जण यावर तातडीचा उपाय म्हणून सतत डिओडरंट, सेंट किंवा बॉडी स्प्रे वापरतात. मात्र हे उपाय वास फक्त काही वेळासाठी कमी करतात. तो कायमचा घालवत नाहीत.

सतत स्प्रे आणि सेंट वापरल्यामुळे त्वचेची छिद्रं बंद होतात. घाम बाहेर पडण्याची नैसर्गिक प्रक्रिया अडते आणि त्यामुळे घाम आत साचतो. यामुळे बॅक्टेरिया वाढून दुर्गंधी अधिक तीव्र होऊ शकते. काही वेळा यामुळे त्वचेला खाज, लालसरपणा, पुरळ किंवा काळपट छटा येतात. दीर्घकाळ रसायनांचा वापर केल्यास त्वचेची नैसर्गिक समतोल शक्ती कमी होते आणि शरीर स्वतःहून वास नियंत्रित करु शकत नाही. म्हणूनच दुर्गंधीवर उपाय करताना नैसर्गिक मार्गांचा विचार करणं अधिक योग्य ठरतं.

आयुर्वेदात शरीरशुद्धीला खूप महत्त्व दिलं आहे. कडीनिंबाचा पाला जंतुनाशक गुणधर्मांनी भरलेला असतो. त्यामुळे तो वापरा तसेच पळसाची कोवळी पानं उकळून त्याचं पाणी आंघोळीसाठी वापरल्यास त्वचेवरील जंतू कमी होतात आणि घामाचा उग्र वास हळूहळू कमी होतो. विशेषतः काख, मान, पाय आणि मांड्यांच्या भागात येणाऱ्या दुर्गंधीवर हा उपाय उपयुक्त ठरतो.

मीठ हा अतिशय साधा पण प्रभावी उपाय मानला जातो. मीठामध्ये जंतुनाशक आणि शोषक गुणधर्म असतात. आंघोळीच्या पाण्यात थोडं खडे मीठ घातल्यास त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट होण्यास मदत होते. पायांना येणारी दुर्गंधी, टाचांमध्ये साचलेला वास आणि सतत ओलसर राहणाऱ्या भागांमधील वास कमी करण्यासाठी हा उपाय उपयोगी ठरतो.

त्रिफळा हा आयुर्वेदातील एक अत्यंत महत्त्वाचा घटक असून तो शरीर आतून स्वच्छ ठेवण्याचं काम करतो. तसेच त्रिफळा पावडर पाण्यात मिसळून पेस्ट तयार करुन लावली आणि मग आंघोळ केली तरी त्वचेवरील दुर्गंधी कमी होते. त्याचबरोबर नियमितपणे त्रिफळा घेतल्यास पचन सुधारतं आणि शरीरात साचलेली घाण बाहेर पडण्यास मदत होते. पचन सुधारल्यामुळे शरीरातून येणारा वास आपोआप कमी होऊ लागतो. 
 

Web Title : शरीर की दुर्गंध दूर करने के घरेलू उपाय; स्प्रे का प्रयोग कम करें।

Web Summary : शरीर की दुर्गंध केवल स्वच्छता नहीं, आंतरिक असंतुलन का संकेत हो सकती है। छिद्र बंद करने वाले स्प्रे से बचें। नीम, नमक स्नान या त्रिफला से दुर्गंध कम करें और पाचन सुधारें।

Web Title : Home remedies eliminate body odor; skip sprays for simple solutions.

Web Summary : Body odor can stem from internal imbalances, not just hygiene. Avoid excessive sprays that clog pores. Try neem, salt baths, or Triphala to naturally reduce odor and improve digestion for lasting freshness.